आयआरएस फुल फॉर्म IRS Full Form In Marathi

IRS Full Form In Marathi आपल्या भारतातील बऱ्यापैकी लोकांना असे वाटते की ,”युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारे लोक फक्त आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनतात”. परंतु युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड युपीएससी द्वारे विविध पदासाठी केली जाते. यामध्ये आयआरएस पदाचा देखील समावेश असतो. आजच्या लेखामध्ये आपण आयआरएस च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि आयआरएस पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आयआरएस पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

IRS Full Form In Marathi

आयआरएस फुल फॉर्म IRS Full Form In Marathi

आयआरएस फुल्ल फॉर्म (IRS full form)

आयआरएस चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “इंडीयन रेविन्यू सर्व्हिस” असा आहे. तर मराठी भाषेमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांना “भारतीय महसूल सेवा अधिकारी” असे म्हणले जाते. आयआरएस हे पद भारतातील वित मंत्रालया अधीन कार्य करते. जेवढे महत्व आयएएस आणि आयपीएस पदाचे असते. तेवढेच महत्व आयआरएस पदाचे देखील असते.

आयआरएस अधिकाऱ्यांचे कार्य (Work of IRS officer in Marathi)

आयआरएस सर्व्हिस ही दोन विभागामध्ये विभागली आहे. पहिला विभाग म्हणजे “आयआरएस इन्कम टॅक्स” आणि दुसरा विभाग म्हणजे “आयआरएस कस्टम”. “प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या टॅक्स गोळा करणे” ,हे आयआरएस अधिकाऱ्यांचे प्रमुख कर्तव्य असते.

आयआरएस अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for Becoming IRS officer in Marathi)

१) आयआरएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवार हा भारत देशाचा नागरिक असला पाहिजे.

२) आयआरएस अधिकारी बनण्यासाठी युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

३) आयआरएस अधिकारी बनण्यासाठी असणारी आयुसीमा ही विविध जातींसाठी वेगवेगळी असते. युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३२ वर्ष इतकी असते ,तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्षे ते ३५ वर्षे इतकी असते आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारासाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३७ वर्षे इतकी असते.

आयआरएस अधिकारी बनण्यासाठी असणारी निवडक प्रक्रिया (Selection process of IRS officer in Marathi)

आयआरएस अधिकारी बनण्यासाठी आपल्याला युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. युपीएससी दरवर्षी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित करते. हे तीन चरण खालीलप्रमाणे आहेत.

१) प्राथमिक परीक्षा – युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचे पहिले चरण म्हणजे “प्राथमिक परीक्षा”. युपीएससी द्वारे दरवर्षी प्राथमिक परीक्षेचे आयोजन केले जाते. तसेच जे उमेदवार सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात ,त्यांची निवड दुसऱ्या चरणासाठी म्हणजे “मुख्य परीक्षेसाठी” केली जाते ,तर जे उमेदवार प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत ,ते पुढच्या वर्षी होणाऱ्या युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची प्राथमिक परीक्षा देऊ शकतात.

२) मुख्य परीक्षा – युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे “मुख्य परीक्षा”. या मुख्य परीक्षेमध्ये एकूण ९ पेपर असतात. जे उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड युपीएससी द्वारे युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या शेवटच्या चरणासाठी म्हणजे “मुलाखत राऊंड” साठी केली जाते.

३) मुलाखत राऊंड – युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचे शेवटचे चरण म्हणजे “मुलाखत राऊंड”. “उमेदवार सिव्हिल सर्व्हिस अधिकारी बनण्यासाठी खरच पात्र आहे की नाही” ,याची पडताळणी मुलाखत राऊंड मध्ये केली जाते. मुलाखत राऊंड हा एकूण २७५ गुणांचा असतो.

जे उमेदवार युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचे तिन्ही चरण उत्तीर्ण करतात, त्यांना त्यांच्या गुणानुसार पद दिले जाते आणि या पदामध्ये आयआरएस पदाचा देखील समावेश असतो. तिन्ही चरणांमध्ये उत्तीर्ण झालेल्या या उमेदवारांना युपीएससी द्वारे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते आणि उत्तीर्ण उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची निवड विविध पदांसाठी देशातील विविध ठिकाणी केली जाते.

आयआरएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार (Monthly Salary of IRS officer in Marathi)

जे उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करतात आणि ज्यांची निवड आयआरएस पदासाठी केली जाते ,त्यांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत आयआरएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा २,२५,००० रुपये इतका होतो.

FAQ

आयआरएस चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

आयआरएस चा फुल्ल फॉर्म “इंडीयन रेविन्यू सर्व्हिस” असा होतो.

मराठी भाषेमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांना काय म्हणले जाते ?

मराठी भाषेमध्ये आयआरएस अधिकाऱ्यांना “भारतीय महसूल सेवा अधिकारी” असे म्हणले जाते.

आयआरएस अधिकाऱ्यांचे प्रमुख कार्य काय असते ?

“प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या टॅक्स गोळा करणे” ,हे आयआरएस अधिकाऱ्यांचे प्रमुख कार्य असते.

आयआरएस पद हे कोणत्या मंत्रालया अधीन कार्य करते ?

आयआरएस पद हे भारतीय वित्त मंत्रालया अधीन कार्य करते.

युपीएससी द्वारे सिव्हिल सर्व्हिस परीक्षा किती चरणांमध्ये आयोजित केली जाते ?

युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड या तीन चरणांचा समावेश असतो.

आयआरएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा किती असतो ?

आयआरएस अधिकाऱ्यांचा सुरवातीचा मासिक पगार हा ५६,१०० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत आयआरएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा २,२५,००० इतका होतो. याचसोबत सरकारकडून आयआरएस अधिकाऱ्यांना विविध सवलती देखील दिल्या जातात.

आयआरएस अधिकारी बनण्यासाठी पात्रता निकष काय असते ?

आयआरएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवार हा भारत देशाचा नागरिक असला पाहिजे. तसेच आयआरएस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. याचसोबत आयआरएस अधिकारी बनण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३२ वर्ष इतकी असते ,तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३५ वर्षे इतकी असते आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्षे ते ३७ वर्षे इतकी असते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण “भारतीय महसूल सेवा” म्हणजे आयआरएस पदाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आयआरएस चा फुल्ल फॉर्म काय आहे?, आयआरएस अधिकाऱ्यांचे कार्य, आयआरएस अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, आयआरएस अधिकारी बनण्यासाठी असणारी निवडक प्रक्रिया, आयआरएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार, आयआरएस अधिकाऱ्यांविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE_(%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%B8)

२)https://chahalacademy-com.translate.goog/irs-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

३)https://unacademy.com/content/upsc/full-forms/irs/

४)https://byjusexamprep.com/upsc-exam/irs-officer

५)https://www.eliteias.in/irs-full-form/

Leave a Comment