आई.एम.पी.एस फुल फॉर्म IMPS Full Form In Marathi

IMPS Full Form In Marathi काही वर्षांपूर्वी आपल्याला जर आपले पैसे आपल्या बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करायचे असतील, तर आपल्याला बँकेत जावे लागत होते. पूर्वी जर आपल्याला अर्जंट पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पाठवायचे असतील आणि त्या दिवशी बँकांना सुट्टी असेल तर ,आपल्याला त्यादिवशी बँकांना सुट्टी असल्यामुळे पैसे आपल्या बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पाठवता येत न्हवते.

IMPS Full Form In Marathi

आई.एम.पी.एस फुल फॉर्म IMPS Full Form In Marathi

भारत सरकारने जेव्हापासून डिजिटल इंडिया ही मोहीम चालू केली आहे आणि या महिमे अंतर्गत त्यांनी विविध डिजिटल पेमेंट च्या सुविधा चालू केल्या आहेत. या सोयीसुविधांचा वापर करून आपण वर्षाच्या कोणत्याही दिवशी ,तसेच कोणत्याही वेळी आपल्या बँक खात्यातून पैसे डिजिटल स्वरूपात दुसऱ्या बँक खात्यामध्ये पाठवू शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका डिजिटल इंडिया अंतर्गत येणाऱ्या एका सेवेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आपण आई.एम.पी.एस विषयी ,तसेच आई.एम.पी.एस च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

आई.एम.पी.एस फुल्ल फॉर्म (IMPS full form)

आई.एम.पी.एस चा फुल्ल फॉर्म “इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्विसेस” असा होतो. “इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्विसेस” ही डिजिटल इंडिया अंतर्गत येणारी मोबाईल बँकिंग द्वारे त्वरित पैसे ट्रान्स्फर करणारी सेवा आहे. आई.एम.पी.एस अंतर्गत उपभोक्ता मोबाईल बँकिंग किंवा ऑनलाईन फंड ट्रान्स्फर अंतर्गत सहजरीत्या पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पाठवू शकतो.

भारतातील युवा वर्ग सर्वात जास्त या आई.एम.पी.एस सेवेचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहे. तसेच या सेवे अंतर्गत आपण वर्षाच्या कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी मोबाईल वरून आपल्या बँक खात्यातील पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये सहजरीत्या व त्वरित पाठवू शकतो. याचसोबत या सेवे अंतर्गत आपण दुसऱ्या व्यक्तीकडून ऑनलाईन पैश्याची मागणी देखील करू शकतो.

पूर्वी आपल्या बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्याला पाठवायचे असतील तर आपल्याला बँकेत जावे लागत होते ,याला खूप वेळ जात होता ; परंतु जेव्हापासून आई.एम.पी.एस ही सेवा आली आहे ,तेव्हापासून आपण त्वरित एखाद्याला पैसे पाठवू शकतो. या प्रक्रियेमध्ये आपला भरपूर वेळ वाचतो.

काहीवेळा बँकेचा सर्वर डाऊन झाल्यामुळे ऑनलाईन पैसे पाठवताना आपल्याला काही समस्या येऊ शकतात ; परंतु अशी वेळ खूप कमी वेळा येते आणि बँकेचा सर्वर डाऊन झाल्यानंतर काही वेळातच बँकेमध्ये होणारे ऑनलाईन पेमेंट पूर्वीसारखे सुरळीत होऊ लागते.

आई.एम.पी.एस च्या काही विशेषतः (Some special things about IMPS in Marathi)

१) आई.एम.पी.एस हे ऑनलाईन बँकिंग द्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्याचे सुरक्षित माध्यम आहे.

२) याचसोबत आपण आई.एम.पी.एस च्या माध्यमातून त्वरित पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करू शकतो.

३) आई.एम.पी.एस अंतर्गत आपण ऑनलाईन बँकिंग द्वारे पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यासोबत ऑनलाईन शॉपिंग ,ऑनलाईन बिल भरणे ,ऑनलाईन रित्या मुलांच्या कॉलेजची व शाळेची फी भरणे ,ऑनलाईन तिकीट बुक करणे ,यांसारखी कामे देखील करू शकतो.

४) आई.एम.पी.एस सेवेचा लाभ घेण्यासाठी उपभोक्त्याचा मोबाईल नंबर त्यांचा बँक खात्याला लिंक असणे गरजेचा असतो.

आई.एम.पी.एस चे काही फायदे (Some benefits of IMPS in Marathi)

१) आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन उपलब्ध झाला आहे ,त्यामुळे आजकाल बऱ्यापैकी प्रत्येक व्यक्ती आई.एम.पी.एस सेवेचा लाभ घेऊ शकतो.

२)  आई.एम.पी.एस द्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आपल्याकडे बँक खाते नंबर आणि आयएफएससी कोड ची आवश्यकता नसते. आई.एम.पी.एस द्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आपल्याकडे फक्त बँकेला लिंक असणारा मोबाईल नंबर आणि एमएमआईडी कोड असावा लागतो.

३) आई.एम.पी.एस द्वारे पैसे ट्रान्स्फर करताना भरावे लागणारे शुल्क हे त्या बँकेवरती आधारित असते. काही बँका आपल्या उपभोकत्यांना  विना शुल्क २ लाख रुपये पर्यंत पैसे ट्रान्स्फर करण्याची अनुमती देते.

४) पालकांना घरापासून लांब राहत असलेल्या आपल्या मुलाला पैसे ट्रान्स्फर करायचे असतील तर ,त्यांना आपल्या मुलाला पैसे पाठवण्यासाठी बँकेत जायची गरज नाही ,ते आपल्या मोबाईल वरुन आई.एम.पी.एस द्वारे आपल्या मुलाला ऑनलाईन रित्या पैसे पाठवू शकतात.

FAQ

आई.एम.पी.एस चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

आई.एम.पी.एस चा फुल्ल फॉर्म “इमीडियेट मोबाइल पेमेंट सर्विसेस” असा आहे.

आई.एम.पी.एस द्वारे आपण काय करू शकतो ?

आई.एम.पी.एस द्वारे आपण मोबाईल बँकिंग च्या मदतीने ऑनलाईन स्वरूपात एका बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करू शकतो. यासाठी आपल्याकडे फक्त बँक खात्याला लिंक असणारा मोबाईल नंबर आणि एमएमआईडी कोड असावा लागतो. आपल्याला आई.एम.पी.एस द्वारे पैसे पाठवण्यासाठी बँक खाते नंबर आणि आयएफएससी कोड ची आवश्यकता लागत नाही.

आई.एम.पी.एस द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करताना आपल्याला किती शुल्क द्यावा लागतो ?

आई.एम.पी.एस द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करताना भरावा लागणारा शुल्क हा बँकावरती आधारित असतो. काही बँका आई.एम.पी.एस द्वारे २ लाख पर्यंतच्या मनी ट्रान्स्फर वर झीरो रुपये शुल्क आकारतात.

आई.एम.पी.एस च्या विशेषतः कोणकोणत्या आहेत ?

आई.एम.पी.एस द्वारे आपण त्वरित एका बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करू शकतो. तसेच आई.एम.पी.एस द्वारे होणारे ऑनलाईन पेमेंट हे सुरक्षित असते. आपण वर्षाच्या कोणत्याही दिवशी ,म्हणजे सुट्टी दिवशी देखील ,तसेच कोणत्याही वेळी आई.एम.पी.एस द्वारे पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन रित्या पाठवू शकतो. याचसोबत आपण आई.एम.पी.एस द्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यासोबत ऑनलाईन शॉपिंग ,ऑनलाईन बिल भरणे ,ऑनलाईन मुलांच्या शिक्षणाची फी भरणे ,इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकतो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण डिजिटल इंडिया अंतर्गत येणाऱ्या आई.एम.पी.एस विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आई.एम.पी.एस चा फुल्ल फॉर्म आई.एम.पी.एस च्या काही विशेषतः ,आई.एम.पी.एस चे काही फायदे ,आई.एम.पी.एस विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://www.paisabazaar.com/hindi/banking/imps-charges/

२)https://en.m.wikipedia.org/wiki/Immediate_Payment_Service

३)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE

४)https://leverageedu.com/blog/hi/imps-full-form-in-hindi/

५)https://www.google.com/amp/s/www.zeebiz.com/hindi/banking/what-is-the-difference-between-imps-and-rtgs-which-option-will-be-best-for-you-to-transfer-money-98263/amp

Leave a Comment