IBPS Full Form In Marathi तुम्ही बऱ्याचदा IBPS, IBPS PO किंवा IBPS SO असे शब्द ऐकले असतील. IBPS परीक्षेचा उल्लेखही तुमच्या ऐकण्यात आला असेल. तर आज आपण IBPS बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. IBPS काय आहे, IBPS म्हणजे काय, IBPS long form म्हणजेच IBPS full form हे सर्व जाणून घेणार आहोत. तर चला बघुया की IBPS म्हणजे काय असते.
आयबीपीएस फुल फॉर्म IBPS Full Form In Marathi
IBPS long form in Marathi | IBPS full form in Marathi
IBPS या शब्दाचा long form हा Institute of Banking PerSOnnel Selection ( इन्स्टिट्युट ऑफ पर्सोनेल सेलेक्शन) असा आहे. IBPS चा अर्थ शुद्घ मराठीमध्ये बँकिंग कर्मचारी निवड संस्था असा होतो.
IBPS म्हणजे काय? | IBPS meaning in Marathi
IBPS हि एक स्वायत्त राष्ट्रीय संस्था आहे. IBPS हि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे PBI (Public Sector Banks ) आणि RBI (Reserved Bank Of India) साठी भरती परीक्षा घेते. PBI मधील SBI बँक वगळता सर्व बँकांमधील कर्मचाऱ्याची भरती ही IBPS ने घेतलेल्या परीक्षेतून होते. IBPS परीक्षेतून बँकेतील सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती आपण पुढे बघुया.
IBPS परीक्षा | IBPS Exams
1. IBPS PO/MT Exam –
IBPS PO परीक्षा PO/MT म्हणजेच Probationary Officer/Management Trainee (प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी ) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी घेतली जाते.
2. IBPS SO Exam –
IBPS SO परीक्षा ही Specialist Officer (स्पेशालिस्ट ऑफिसर) पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी घेतली जाते.
3. IBPS Clerk Exam –
IBPS Clerk हि परीक्षा बँकेतील Clerk (क्लर्क) म्हणजेच लिपिक भरितीसाठी घेतली जाते.
4. IBPS RRB Exam –
IBPS RRB हि भारतीय रिझर्व्ह बँकेत Officers Scale I, II & III and Office Assistant (MultipurPOse) पदावर भरती करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे.
IBPS भरती प्रक्रिया | IBPS Recruitment Process
IBPS भरती प्रक्रिया ही खळीप्रमाने असते.
- सर्वात प्रथम IBPS Registration (रजिस्ट्रेशन) केले जाते.
- त्यांनतर IBPS कडून प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्रपणे प्रवेशपत्र जारी करण्यात येते. नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड यांचा वापर करून अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.
- त्यानंतर IBPS परीक्षा होते. IBPS परीक्षेतील सर्व टप्पायची परीक्षा होते आणि प्रत्येकाचा निकाल लावला जातो. अगोदरच्या टप्प्यात पास झाले तर पुढच्या टप्प्यातील परीक्षा देता येते.
- त्यानंतर पूर्ण परीक्षेचा निकाल लावला जातो आणि गुणवत्तेनुसार भरती केली जाते.
IBPS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to apply for IBPS exams?
IBPS परीक्षेसाठी अर्ज खालीलप्रमाणे करावा.
- IBPS च्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच ibos.in या वेबसाईट वर जावे.
- “Apply Online” (ऑनलाईन अर्ज करा) यावर क्लिक करा.
- तिथे आवश्यक असलेली सर्व माहिती भरून परीक्षेसाठी registration (रजिस्ट्रेशन) म्हणजेच नोंदणी करावी.
- त्यांनतर registration id (रजिस्ट्रेशन आयडी) आणि पासवर्ड निर्माण करण्यात येईल तो लक्षात ठेवावा.
- आपला पासपोर्ट साइजचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून ते अपलोड करावे.
- तिथे विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर माहिती भरावी.
- अशाप्रकारे पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेत काम करण्यास आवडेल त्यांची क्रमवार निवड करावी.
- डाव्या अंगठ्याचा ठसा आणि प्रतिज्ञापत्र upload करावे.
- त्यानंतर शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.
IBPS परीक्षा पात्रता | IBPS Exam Eligibility
IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे पात्रता निकष हे बदलू शकतात तर काही पात्रता निकष हे समान आहेत. आपण सर्व पात्रता निकष बघुया :
- परीक्षार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- कोणत्याही शासनमान्य विद्यापीठातून कोणत्या शाखेतील पदवी असावी.
- वयोमर्यादा – वेगवेगळ्या परीक्षांसाठी असणारी वयोमर्यादा खालीलप्रमाणे :
IBPS PO – 20 ते 30 वर्षे.
IBPS SO – 20 ते 30 वर्षे.
IBPS Clerk – 20 ते 28 वर्षे.
IBPS RRB –
1. Officers Scale I – 18 ते 30 वर्षे.
2. Officers Scale II – 21 ते 32 वर्षे.
3. Officers Scale III – 21 ते 40 वर्षे.
4. Office Assistant (MultipurPOse) – 18 ते 28 वर्षे.
इथे लक्षात घ्यावे की SC/ST वर्गांसाठी 5 वर्षे, अपंगांसाठी 10 वर्षे, मागासलेल्या वर्गासाठी (नॉन-क्रीमी लेयर) वर्गासाठी 3 वर्षे वयात सुट असते.
IBPS परीक्षा स्वरूप | IBPS Exam Pattern
IBPS परीक्षेचे स्वरूप हे प्रत्येक परिक्षेनुसर वेगळे आहे. IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेचे स्वरूप आपण जाणून घेऊया.
IBPS परीक्षा मधे तीन पायऱ्या आहेत –
1. पुर्व परीक्षा (Prelim Exam)
2. मुख्य परीक्षा (Mains Exam )
3. मुलाखत (Interview)
IBPS PO, IBPS SO आणि IBPS RRB Officers-Scale I परीक्षेत वरील तिन्ही टप्पे होतात. IBPS Clerk आणि IBPS RRB Office Assistant (Multipurpose) परीक्षेसाठी मुलाखत घेतली जात नाही. या परीक्षेमध्ये फक्त पूर्व परिक्षा आणि मुख्य परीक्षा अश्या दोनच पायऱ्या असतात. IBPS RRB परीक्षेतील officers scale I आणि officers scale II या पदासाठी फक्त एकच परीक्षा घेतली जाते. मुख्य आणि पूर्व परीक्षा न होता फक्त एक परीक्षा होते.
याप्रमाणे आपण IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व माहिती बघितली आहे. IBPS म्हणजे काय, IBPS long form, IBPS full form, IBPS registration process अशा सर्व प्रकारची माहिती आपण आजच्या लेखात बघितली आहे.
FAQs ( Frequently Asked Questions)
IBPS परीक्षांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
IBPS परीक्षेसाठी मान्यता पात्र विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणे आवश्यक आहे.
IBPS परीक्षा अर्जासाठी किती शुल्क आहे?
IBPS परीक्षेच्या अर्जाच्या फी म्हणजेच शुल्क हे खुला वर्ग आणि इतर (Open Category and other) वर्गासाठी 850 रुपये इतकी आहे तर SC /ST/PWD या वर्गासाठी 175 रुपये इतकी आहे.
IBPS रजिस्ट्रेशन लिंक काय आहे?
IBPS रजिस्ट्रेशन साठी IBPS.in हि लिंक आहे. हि IBPS ची अधिकृत वेबसाईट आहे.
IBPS परीक्षा वर्षातून कितीदा घेतल्या जातात?
IBPS परीक्षा हया वर्षातून एकदाच घेतल्या जातात.