आयएएस फुल फॉर्म IAS Full Form In Marathi

IAS Full Form In Marathi मागच्या आठवड्यात युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. यातील काही उत्तीर्ण उमेदवारांना आयएएस हे पद मिळेल. तुम्ही जर युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला हा प्रश्न विचाराल की, “तुम्हाला युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करून कोणते पद मिळवायचे आहे” ? ,तर निम्म्या पेक्षा जास्त उमेदवारांचे हे उत्तर असेल की ,“युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करून मला आयएएस अधिकारी बनायचे आहे”.

IAS Full Form In Marathi

आयएएस फुल फॉर्म IAS Full Form In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण याच आयएएस अधिकाऱ्यांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण आयएएस च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आयएएस अधिकाऱ्यांविषयी आणि आयएएस च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

आयएएस फुल्ल फॉर्म (IAS full form)

आयएएस चा फुल्ल फॉर्म “इंडियन एडमिनेस्ट्रेटिव सर्व्हिस” असा होतो. मराठी भाषेमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना “भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी” असे म्हणले जाते.

लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आयोजित केली जाते. तसेच लोकसेवा आयोगाद्वारे युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड क्लास ए आणि क्लास बी मधील पदांसाठी केली जाते. या पदांमध्ये आयएएस पदाचा देखील समावेश असतो.

आयएएस अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming IAS officer in Marathi)

१) आयएएस अधिकारी बनण्यासाठी युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे असते. ज्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण नसेल किंवा जे पदवीच्या पहिल्या वा दुसऱ्या वर्षात शिकत आहेत, असे उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरतात.

२) युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्षे ते ३२ वर्षे इतकी असली पाहिजे ; परंतु जातीच्या आधारावर या आयुसीमे मध्ये सूट दिली जाते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३२ वर्षे इतकी असते.

तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३२ वर्षे इतकी असते. याचसोबत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३५ वर्षे इतकी असते आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३७ वर्षे इतकी असते.

३) युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्याची देखील मर्यादा असते. खुल्या प्रवर्गातील उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही ६ वेळा देऊ शकतात. तसेच ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही ९ वेळा देऊ शकतात. याचसोबत एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही कितीही वेळा देऊ शकतात.

आयएएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार (Monthly Salary of IAS officers in Marathi)

आयएएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो. परंतु युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनलेल्या उमेदवाराचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत या मासिक पगारामध्ये देखील वाढ होत जाते. याचसोबत जे आयएएस अधिकारी कॅबिनेट सचिव बनतात ,त्यांचा मासिक पगार हा साधारण २,५०,००० रुपये इतका होतो.

FAQ

आयएएस चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

आयएएस चा फुल्ल फॉर्म हा “इंडीयन एडमिनेस्ट्रेटिव सर्व्हिस” असा होतो.

आयएएस अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये काय म्हणले जाते ?

आयएएस अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये “भारतीय प्रशासनिक सेवा अधिकारी” असे म्हणले जाते.

मी माझे पदवी पर्यंतचे शिक्षण एमबीबीएस मधून केले आहे ? तर मी आयएएस अधिकारी बनू शकतो का ?

हो ,आपल्याला आयएएस अधिकारी बनण्यासाठी युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. युपीएससी च्या या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी आपले कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. तुम्हाला जर आयएएस अधिकारी बनायचे असेल तर ,तुम्हाला कमीतकमी २ वर्षे तरी मनापासून अभ्यास करावा लागेल.

आयएएस अधिकारी बनण्यासाठी आयुसीमा काय असते ?

आयएएस अधिकारी बनण्यासाठी असणारी आयुसीमा ही विविध जातींसाठी वेगवेगळी असते. खुल्या आणि ईडब्ल्यीएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३२ वर्षे इतकी असते. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३५ वर्षे इतकी असते. याचसोबत एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आयुसीमा ही २१ वर्षे ते ३७ वर्षे इतकी असते.

खुल्या प्रवर्गातील उमेदवार हा किती वेळा युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ शकतो ?

खुल्या प्रवर्गातील उमेदवार हा ६ वेळा युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ शकतो.

आयएएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?

आयएएस अधिकाऱ्यांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये इतका असतो. तसेच आयएएस अधिकाऱ्यांना आकर्षक पगारासोबत सरकारकडून विविध सवलती देखील दिल्या जातात.

निष्कर्ष (Conclusion)

युपीएससी च्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच उमेदवारांचे स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे असते. आजच्या लेखामधून आपण आयएएस अधिकाऱ्यांविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आयएएस फुल्ल फॉर्म ,आयएएस अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, आयएएस अधिकाऱ्यांचा मासिक पगार, आयएएस अधिकाऱ्यांविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE

२)https://www.google.com/amp/s/www.tv9hindi.com/education/ias-training-and-posting-top-post-of-ias-officer-dm-salary-details-in-hindi-2306324.html/amp

३)https://leverageedu.com/blog/hi/ias-full-form-in-hindi/

४)https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/career-full-form-in-hindi-know-names-of-upsc-ssc-ias-psc-pcs-ugc-mts-cgl-chsl-ibps-po-ibps-rrb-nda-cds-cms-ctet-afcat-iit-iti-nta-etc-23496269.html

५)https://byjusexamprep.com/upsc-exam/ias-full-form-in-hindi

Leave a Comment