एचएससी फुल फॉर्म HSC Full Form In Marathi

HSC Full Form In Marathi आपल्याकडे SSC आणि HSC या दोन परीक्षा बोर्डाकडून घेण्यात येतात आणि त्यामुळे या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणून समजले जाते.

HSC Full Form In Marathi

एचएससी फुल फॉर्म HSC Full Form In Marathi

यापैकी HSC म्हणजे नक्की काय, HSC Full Form in Marathi, HSC परीक्षांचे आयोजन कसे केले जाते, HSC मध्ये मुलांना कोणकोणते विषय अभ्यासावे लागतात याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बारावी इयत्तेचा संबंधित सोडता HSC शब्दाचे इतरही काही Full Form आहेत त्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत.

HSC Full Form in Marathi – HSC Long Form in Marathi

आपल्याकडे बारावी बोर्डाच्या परीक्षेला सर्रासपणे HSC म्हणून संबोधले जाते मात्र त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. HSC शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Higher Secondary Certificate असा आहे. याचा उच्चार हायर सेकंडरी सर्टिफिकेट असा केला जातो.

HSC शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा उच्चतर माध्यमिक प्रमाणपत्र असा होतो. आपल्याला काही ठिकाणी म्हणजेच राज्यांमध्ये HSC ला HSSC म्हणलेले बघायला मिळते. तर हे HSSC म्हणजे Higher Secondary School Certificate होय.

HSC म्हणजे काय? – What is HSC in Marathi?

संपूर्ण भारतात इयत्ता बारावीची जी परीक्षा घेतली जाते तिला HSC परीक्षा म्हणून ओळखले जाते. भारतात ही परीक्षा केंद्राकडून आणि राज्यांकडून घेतली जाते. राज्य स्तरावर राज्यातील शिक्षण मंडळे ही परीक्षा घेतात. त्यांच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे ही परीक्षा घेत असतात. केंद्र स्तरावर NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग, CBSE सारख्या संस्थानद्वारे HSC परीक्षा घेतल्या जातात.

HSC परीक्षा ही सर्व बोर्डामार्फत वर्षातून दोन वेळा घेतली जाते. यामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये चालू परीक्षा असतात आणि ऑक्टोबर दरम्यान पुनरपरिक्षा घेतल्या जातात.

HSC परीक्षा कोणत्या राज्यांमध्ये होतात? – Which states conduct HSC Exams?

भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये HSC परीक्षा घेतल्या जातात मात्र त्यातील काही राज्यांमध्ये या परीक्षा वेगवेगळ्या बोर्ड मार्फत घेतल्या जातात त्याविषयी आपण जाणून घेऊयात. गुजरात, केरळ, पंजाब, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये HSC परीक्षा घेतली जाते. प्रत्येक राज्यात एक राज्य शिक्षण मंडळ असते आणि त्या राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत अनेक विद्यापीठे असतात. हे सर्व विद्यापीठ शिक्षण मंडळाच्या मदतीने या HSC परीक्षा घेत असतात. प्रत्येक राज्याला एक बोर्ड आहे आणि त्यात महाराष्ट्र बोर्ड, यूपी बोर्ड, एमपी बोर्ड, बिहार बोर्ड ही काही महत्वाची नावे आहेत.

याशिवाय केंद्र स्तरावरील CBSE, ICSE आणि NIOS बोर्डस देखील संपूर्ण भारतात HSC परीक्षा घेतात. आपल्याकडे जे अभ्यासक्रम या बोर्डाच्या अंतर्गत चालतात त्या विद्यार्थ्यांसाठी या बोर्डकडून HSC परीक्षा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांना मिळणारे HSC प्रमाणपत्र हे त्या बोर्डाकडून देण्यात येते. त्यावर त्या बोर्डचे नाव आणि विद्यार्थ्याला मिळालेले गुण व श्रेणी असतात.

HSC परीक्षेचे विषय – Subjects in HSC Examination

इयत्ता दहावी म्हणजेच SSC परीक्षा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणात दुसऱ्या वर्षात HSC परीक्षा देता येते. आपण दहावी नंतर 3 वेगवेगळी क्षेत्रे निवडत असतो. यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखा आहेत. HSC परीक्षा ही या तिन्ही शाखांसाठी घेतली जाते. त्यामुळे HSC परीक्षा ही वेगवेगळ्या अनेक विषयांची होत असते. आपण हे विषय जाणून घेऊयात.

विज्ञान शाखा-

Physics (भौतिकशास्त्र), Chemistry (रसायनशास्त्र), Mathematics (गणित), Biology( जीवशास्त्र), Electronic Science (इलेक्ट्रॉनिक शास्त्र), Computer Science (संगणक शास्त्र), Dairy Science (डेरी सायन्स), Crop Science (क्रॉप सायन्स)

कला शाखा-

Economics (अर्थशास्त्र), इंग्रजी, Geography (भूगोल), History (इतिहास), Political Science (राज्यशास्त्र),Information Technology, Mathematics and Statistics

वाणिज्य शाखा-

Economics (अर्थशास्त्र), इंग्रजी, Information Technology, Mathematics and Statistics, Organisation Of Commerce and Management (वाणिज्य संघटन व व्यवस्थापन)

महाराष्ट्र राज्य HSC परीक्षा माहिती – Maharashtra HSC Exam Details

 • महाराष्ट्र राज्यात HSC परीक्षा या महाराष्ट्र बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एड्यूकेशन बोर्ड द्वारे घेतल्या जातात.
 • HSC परीक्षेचा फॉर्म हा mahahsscboard.in या वेबसाईट वरून भरता येतो.
 • HSC परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत (नसेल तर सत्यांकित दुसरी प्रत), आधार कार्ड आणि सही सोबत एक पासपोर्ट फोटो गरजेचा असतो.
 • विद्यार्थ्यांचा इमेल आणि फोन नंबर हा आता फॉर्म भरताना लागतो आणि जवळपास सर्व पुढील माहिती विद्यार्थ्यांच्या याच मोबाईल क्रमांकावर पाठवली जाते.
 • HSC परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 500 रुपये फी बोर्डाकडून घेतली जाते.

महाराष्ट्र राज्य HSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा? – How to Submit Maharashtra Board HSC Exam Registration Form?

 1. mahahsscboard.in वेबसाईटवर जा.
 2. पुढे आलेल्या लॉगिन फॉर इन्स्टिट्यूट पर्यायाच्या खाली For HSC Sign In Here बटनावर क्लिक करा.
 3. पुढे पानावर लॉगिन पेज सुरू होईल. आपल्या महाविद्यालयाचे एक खाते इथे असेल. ती माहिती भरून तुम्ही पुढे जाऊ शकता.
 4. प्रत्येक विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना शेवटी त्याचा फोटो आणि त्याची स्वाक्षरी बॉक्स मध्ये टिक करून अपलोड करा.
 5. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झाला की तो फॉर्म पुढे बोर्डाकडे पाठवा.

HSC चे इतर काही Full Form – Other Full Forms of HSC

 • HIV Screening Standard Care
 • Health Sciences Student Council
 • Humane Society of Summit County
 • Home Saving Bank of Silver City
 • Haryana Staff Selection Commission
 • Haryana State Selection Commission
 • High School Summer College
 • Healthcare Sectors skills Council
 • Humane Society Sarasota County
 • Houston Sports and Social Club
 • Hawaii State Student Council
 • Heating sweating Spontaneous Combustion
 • Hydrographic Services and Standards Committee

FAQ

HSC शब्दाचा शिक्षण क्षेत्रातील Full Form काय आहे?

HSC शब्दाचा शिक्षण क्षेत्रात Full Form हा Higher Secondary Certificate असा होतो.

HSC 2023 परीक्षा या ऑफलाईन होतील की ऑनलाइन?

कोरोना संकट जवळपा संपले असून 2022 बोर्डाच्या परीक्षा देखील ऑफलाईन झाल्याने आता HSC 2023 आणि पुढील परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीने होतील.

HSC बोर्डचे मार्क्स महत्वाचे असतात का?

आपल्या विद्यार्थी दशेतील ही सर्वात शेवटची बोर्ड परीक्षा असल्याने यातील गुण आपले पुढील भवितव्य ठरवत असतात. आपले हे गुण आपल्याला कोणत्या क्षेत्रात पुढे शिक्षण घेता येईल हे ठरवत असतात. विज्ञान शाखेत जरी प्रवेश परीक्षा वेगळ्या असल्या तरी देखील 60% गुण HSC बोर्ड परीक्षेत मिळविणे अनिवार्य केलेलं आहे.

HSC बोर्ड मध्ये कमीत कमी किती मार्क मिळवायला हवेत?

HSC बोर्ड परीक्षेत मार्क्स खूप महत्वाचे असतात. तुम्हाला पुढे नोकरीत मग ती सरकारी असो किंवा खाजगी, दोन्ही ठिकाणी कमीत कमी 60% गुण असणे अनिवार्य असते. अनेकदा आपल्याला पुढे चांगले मार्क्स मिळतात मात्र आपले बारावी बोर्डचे म्हणजे HSC चे मार्क्स बघून आपल्या संधी जातात.

Leave a Comment