GST Full Form In Marathi तुम्ही अनेकदा GST हा शब्द ऐकला असेल. गेल्या काही काळात GST हा विषय अगदीच चर्चेत होता. खूप जणांना हा प्रश्न पडला असेल की GST म्हणजे काय आणि का एवढा महत्वाचा विषय आहे हा. तर आजच्या लेखात आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. GST long form, GST म्हणजे काय, आणि त्याचा वापर कुठे केला जातो आणि त्याबद्दलची सर्व गरजेची माहिती आपण बघुया.
जीएसटी फुल फॉर्म GST Full Form In Marathi
GST Full Form in Marathi || GST Long Form in Marathi
GST long form म्हणजेच GST शब्दाचा full form हा Goods And Services Tax (गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स) असा होतो. यास शुद्ध मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हंटले जाते.
GST म्हणजे काय ? | GST meaning in Marathi
GST (Goods and Services Tax) हा वस्तू आणि सेवा कर आहे. नावाप्रमाणेच हा वस्तू आणि सेवा यावर लावला जाणार कर आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांवर हा कर लावला जातो आणि ज्या काही वस्तूंची निर्मिती होते आणि खाजगी कंपन्यांकडून जी काही सेवा दिली जात असेल त्यावर हा कर लावला जातो. याबद्दल सविस्तर माहिती आपण बघुया.
GST काय आहे? | What is GST?
29 मार्च 2017 रोजी GST कर पारित करण्यात आला आणि 1 जुलै 2017 पासून हा कर लागू करण्यात आला. जम्मु आणि काश्मीर वगळता हा कर देशभरात सर्व ठिकाणी लागू पडतो. आपण GST ला one nation, one tax (वन नेशन, वन टॅक्स) म्हणजेच एक देश, एक कर संबोधले जाते याचे कारण हे की GST लागू होण्या अगोदर अनेक अप्रत्यक्ष कर आकारले जायचे पण हे सर्व कर हटवून फक्त GST हा एकच कर लागू करण्यात आला म्हणून यास एक देश, एक कर म्हणून संबोधले जाऊ लागले.
आपण अगोदर अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर म्हणजे काय हे जाणून घेऊया.
अप्रत्यक्ष कर ( Direct tax ) – व्यक्तीकडून प्रत्यक्ष घेतला जातो.
प्रत्यक्ष कर हा व्यक्तीकडून थेट घेतला जातो. म्हणजेच त्याचे उत्पन्न, मालमत्ता आणि किमती वस्तू यावर हा कर आकारला जातो आणि तो त्या व्यक्तीने स्वतः भरायच असतो.
प्रत्यक्ष कर ( Indirect tax ) – वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर लावला जातो.
अप्रत्यक्ष कर हा व्यक्तीकडून अप्रत्यक्षरीत्या घेतला जातो. म्हंजे जी व्यक्ती ती वस्तू किंवा सेवा खरेदी करेल त्या व्यक्तीकडून तो कर त्या वस्तू किंवा सेवेच्या किमतीमध्ये समाविष्ट करून घेतला जातो.
GST लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे लागू पडणाऱ्या अनेक अप्रत्यक्ष कराऐवजी एक कर लागू करणे ज्यामुळे करप्रणाली मध्ये सहजता आणि सोपेपणा येईल. GST पूर्वी भारतात कोणतीही वस्तू खरेदी करताना प्रत्येक टप्प्यावर तिच्यावर वेगवेगळा कर आकारला जायचं जसे की त्या वस्तूचा कच्चा माल खरेदी करताना कर, मग ती वस्तू बनवण्यावर कर, त्यानंतर ती वस्तू होलसेल विक्री करण्यावर कर, त्या वस्तूच्या जाहिरातीवर कर अशा प्रकारे प्रतेक टप्प्यावर वस्तूवर कर आकारला जाई. पण आता तसे ना करता वस्तूवर कर हा एकच आकारला जातो फक्त विविध टप्प्यावर तो कर दिला जातो.
GST चे घटक | Components of GST
GST चे 4 घटक आहेत ते खालीलप्रमाणे :
CGST – Central Goods And Services Tax ( केंद्रीय वस्तू आणि सेवा कर )
CGST हा कर केंद्र सरकारला दिला जातो. म्हणजेच तुम्ही जी काही वस्तू खरेदी करत असाल किंवा जी काही सेवा पुरवत असाल तिच्यावर केंद्र GST आकारला जातो, या GST करातील जो भाग केंद्र सरकारला जातो तो म्हणजे CGST.
SGST – State Goods And Services Tax ( राज्य वस्तू आणि सेवा कर)
GST मधील जो भाग राज्य सरकार घेते तो म्हणजे CGST.
IGST – Integrated Goods And Services Tax (एकात्मिक वस्तू आणि सेवा कर)
IGST हा कर तेव्हा लागू पडतो जेव्हा व्यवसाय हा परराज्यात होतो. तेव्हा फक्त IGST आकारला जातो आणि CGST किंवा SGST आकारले जात नाही. अशावेळी GST पूर्णपणे केंद्र सरकार घेते.
UT-GST – Union Territory Goods And Services Tax – हा केंद्रशासित प्रदेशांना लागू पडणारा कर आहे. म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात SGST ऐवजी UT-GST आकारला जातो.
आता आपण CGST, SGST, IGST नीट समजून घेऊया आणि कोणता घटक कुठे आकारला जातो हे समजून घेऊया.
समजा तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि महाराष्ट्रात एखादा व्यवसाय करत आहात आणि तुमचा व्यवसाय फक्त महाराष्ट्रात आहे म्हणजेच तुमची सेवा किंवा वस्तू ही फक्त महारष्ट्र विकली जाते अशावेळी तुम्ही CGST आणि SGST कर भरता. याचाच अर्थ असा की तुम्ही भरलेला GST कराचा अर्धा भाग हा केंद्र सरकारला CGST स्वरूपात जातो आणि अर्धा भाग राज्य सरकारला SGST स्वरूपात जातो.
आता समजा की तुम्ही महाराष्ट्रीय आहात पण तुमचा व्यवसाय आहे हा महाराष्ट्रासह इतर राज्यातही चालतो, म्हणजेच तुमच्या वस्तू किंवा सेवेची विक्री परराज्यात देखील होते अशावेळी तुमच्या सेवेवर किंवा वस्तूवर IGST कर देखील लागू होतो. म्हणजे तुम्ही भरलेल्या GST कर हा IGST म्हणून पूर्णपणे केंद्र सरकारकडे जातो.
म्हणजेच जेव्हा तुमचा व्यवसाय हा तुमच्या राज्याच्या बाहेर होतो तेव्हा GST कर पुर्णतः केंद्र सरकारला दिला जातो. आणि जेव्हा तुमचा व्यवसाय हा तुमच्या राज्यातच केला जातो तेव्हा तो कर 2 विभागांत विभागला जातो आणि त्यातील अर्धा भाग केंद्र सरकार आणि अर्धा भाग राज्य सरकार घेते. अशाप्रकारे तुम्हाला GST मधील हे 3 घटक समजले असतील अशी अपेक्षा.
GST चे फायदे | Benefits of GST
1. GST मुळे अनेक कर आकारणी ऐवजी एकच कर आकारला जाऊ लागला त्यामुळे करपद्धती सोपी झाली.
2. वस्तूंची खरेदी किंमत कमी झाली.
3. देशभर एकच कर लागू झाला.
4. अतिरिक्त कर कमी झाला.
5. देशातील प्रत्येक राज्याला त्यांनी विकत घेतलेल्या वस्तूचा कर हा समप्रमाणात मिळू लागला.
अशा प्रकारे GST चे अनेक फायदे देशाला झाले.
अशाप्रकारे आपण आजच्या लेखात GST full form, GST म्हणजे काय, GST marathi meaning, GST फायदे याबद्दल सविस्तर माहिती बघितली.
FAQ’s
भारतात GST कोणी सुरू केला?
भारतात, GST स्वीकारण्याची कल्पना प्रथम 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने सुचवली होती. राज्याच्या VAT ची रचना करण्याच्या अनुभवावर आधारित, GST साठी एक संरचना तयार करण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी एक अधिकार प्राप्त समिती (EC) स्थापन केली.
जीएसटीचे प्रमुख कोण आहेत?
या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, ज्यांना भारतातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री मदत करतात.
व्हॅट आणि जीएसटी समान आहे का?
GST ने भारतात VAT सारख्या अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. भारतात व्हॅटच्या अंमलबजावणीमुळे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी कर भरावा लागतो, तर GST सह, ग्राहकांना केवळ अंतिम उत्पादनावर कर भरावा लागतो.
CST आणि GST म्हणजे काय?
वस्तू आणि सेवा कराच्या छोट्या स्वरूपाला GST म्हणतात. CST म्हणजे केंद्रीय विक्रीकर. विक्री बीजक तयार केल्यावर किंवा माल विक्रीसाठी हलवल्यानंतर लगेचच मालाच्या विक्रीवर CST/VAT आकारला जातो. वस्तूंच्या वितरणाच्या शेवटच्या टप्प्यावर वस्तू आणि सेवांवर जीएसटी आकारला जातो.