जी – २० फुल फॉर्म G-20 Full Form In Marathi

G-20 Full Form In Marathi आपल्या भारतामध्ये मागच्या वर्षी ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर ला जी – २० संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात झालेला हा जी – २० संमेलन कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला होता . आजच्या लेखामध्ये आपण याच जी – २० संमलेना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामध्ये आपण जी – २० च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे जी – २० चा फुल्ल फॉर्म काय आहे ? आणि जी – २० संमेलना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

G-20 Full Form In Marathi

जी – २० फुल फॉर्म G-20 Full Form In Marathi

जी – २० फुल्ल फॉर्म (G-20 full form)

जी – २० चा फुल्ल फॉर्म “ग्रुप – २०” असा होतो.

मागच्या वर्षीचे हे जी – २० संमेलन भारतामध्ये आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथे पार पडले होते. या जी – २० संमेलनासाठी जगभरातून विविध देशांचे पंतप्रधान , राष्ट्राध्यक्ष आणि आर्थिक मंत्री आले होते. जी – २० हे संमेलन आहे आणि यामध्ये जगभरातील २० देशांचा समावेश असतो. या संमेलनामध्ये २० देश शामील आहेत ,त्यामुळे या संमेलनाला “जी – २०” असे म्हणले जाते.

जी – २० संमेलनाची सुरवात (Beginning of G-20 summit in Marathi)

१९९९ मध्ये जेव्हा आशिया खंडातील देशामध्ये आर्थिक संकट आले होते ,तेव्हा त्या आर्थिक संकटाविरुद्ध लढण्यासाठी जगभरातील विविध देशांच्या आर्थिक मंत्र्यांनी आणि केंद्रीय बँकेतील गव्हर्नर नी एकत्र येऊन आर्थिक फोरम तयार केला होता. १९९९ मध्ये झालेल्या या  संमेलनामध्ये आर्थिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती.

त्यानंतर २००७ मध्ये संपूर्ण जगाने पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना केला. तेव्हा या जी – २० संमेलनामध्ये देशातील आर्थिक मंत्र्यांसोबत देशाचे राष्ट्राध्यक्ष देखील सहभागी झाले होते . जी – २० संमेलनाची पाहिली बैठक ही २००८ मध्ये अमेरिकेतील “वाशिंगण्टन” येथे घेण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत जी – २० संमेलनाची एकूण १८ बैठक जगाच्या विविध कोपऱ्यात झाली आहेत.

जी – २० संमेलनाची १८ वी बैठक ही मागच्या वर्षी २०२३ मध्ये आपल्या देशात आयोजित करण्यात आली होती. जेव्हा जी – २० ची सुरवात करण्यात आली होती ,तेव्हा या जी – २० संमेलनाच्या बैठकी मध्ये फक्त जगाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा होत होती ; परंतु आता या जी – २० संमेलनाच्या बैठकी मध्ये इतर गोष्टींवर देखील चर्चा होते.

जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणारे देश (Countries participating in G-20 summit in Marathi)

जी – २० संमेलनामध्ये एकूण २० देश सहभागी आहेत.  जी – २० संमेलनाच्या या २० देशामध्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया ,कॅनडा , जपान,चीन ,ब्राझील,फ्रान्स ,जर्मनी ,भारत ,इटली ,इंडोनेशिया ,रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको,रशिया ,सौदी अरेबिया ,दक्षिण आफ्रिका, अमेरिका , युनायटेड किंगडम,तुर्की आणि युरोपातील देश ,इत्यादी देशांचा समावेश आहे. तसेच जी – २० च्या संमेलनामध्ये दरवर्षी इतर काही देशांना पाहुणे म्हणून बोलवले जाते.

जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणाऱ्या या २० देशांची अर्थव्यवस्था ही संपूर्ण जगाच्या ८५% एवढी आहे. तसेच जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणाऱ्या देशांची लोकसंख्या ही जगाच्या २/३ एवढी आहे. जी – २० संमेलनामध्ये जगातील मोठमोठे देश सहभागी आहेत ,त्यामुळे जी – २० मध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो.

जी – २० ची अध्यक्षता (Chairmanship of G-20 in Marathi)

जी – २० संमेलनाची अध्यक्षता ही मागील अध्यक्ष ,वर्तमान अध्यक्ष आणि भविष्यातील अध्यक्ष या तींघाद्वारे ठरवली जाते. भारत देश हा जी – २० संमेलनाचा वर्तमान अध्यक्ष आहे आणि जी – २० संमेलनाचा पुढील अध्यक्ष हा ब्राझील देश असणार आहे.

FAQ

जी – २० चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

जी – २० चा फुल्ल फॉर्म “ग्रुप – २०” असा आहे. जी – २० हा जगभरातील २० देशांचा समूह ग्रुप आहे आणि या २० देशांचे दरवर्षी संमेलन भरवले जाते आणि या संमेलनामध्ये आर्थिक गोष्टींवर चर्चा केली जाते.

जी – २० मध्ये किती देश सहभागी आहेत ? आणि जी – २० मध्ये असणाऱ्या देशांची नावे कोणकोणती आहेत ?

जी – २० संमेलनामध्ये एकूण २० देश सहभागी आहेत आणि या २० देशामध्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया ,कॅनडा , जपान,चीन ,ब्राझील,फ्रान्स ,जर्मनी ,भारत ,इटली ,इंडोनेशिया ,रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको,रशिया ,सौदी अरेबिया ,दक्षिण आफ्रिका, अमेरिका , युनायटेड किंगडम,तुर्की आणि युरोपातील देश ,इत्यादी देशांचा समावेश आहे.

जी – २० संमेलनाचा प्रभाव जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा पडतो ?

जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणाऱ्या २० देशांची एकूण लोकसंख्या ही संपूर्ण जगाच्या २/३ एवढी आहे. याचसोबत जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणाऱ्या २० देशांची एकूण अर्थव्यवस्था ही संपूर्ण जगाच्या ८५% एवढी आहे. त्यामुळे जी – २० संमेलनामध्ये घेतलेल्या निर्णयांचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो.

२०२३ चे जी – २० संमेलन कोणत्या देशामध्ये पार पडले होते ?

२०२३ चे जी – २० संमेलन हे भारतामध्ये पार पडले होते. मागच्या वर्षी झालेले जी – २० संमेलन हे भारताच्या दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.

जी – २० चे पहिले संमेलन कोणत्या देशात झाले होते ? तसेच जी – २० चे पहिले संमेलन कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते ?

जी – २० चे पहिले संमेलन हे २००८ मध्ये अमेरिकेच्या वाशिंग्न्टन येथे भरवण्यात आले होते.

२०२४ मध्ये कोणत्या दिवशी जी – २० चे संमेलन भरवण्यात आले होते ?

मागच्या वर्षी भारतात आयोजित झालेले जी – २० संमेलन हे ९ आणि १० सप्टेंबर रोजी भरवण्यात आले होते.

आतापर्यंत एकूण किती वेळा जी – २० संमेलन भरवण्यात आले आहे ?

आतापर्यंत एकूण १८ वेळा जी – २० चे संमेलन भरवण्यात आले आहे आणि जी – २० संमेलनाची १८ वी बैठक ही दिल्ली येथे २०२३ मध्ये भरवण्यात आली होती.

भारतामध्ये झालेल्या जी – २० संमेलनामध्ये पाहुणे देश म्हणून कोणकोणते देश आले होते ?

भारत देशामध्ये झालेल्या जी – २० संमेलनामध्ये भारताने बांगलादेश , मिस्त्र ,मोरिशिस ,सिंगापूर ,स्पेन , युएई , ओमान,नेदरलँड्स ,नायजेरिया ,इत्यादी देशांना पाहुणे म्हणून बोलवले होते.

२०२४ मध्ये कोणत्या देशामध्ये जी – २० संमेलनाची बैठक होणार आहे ?

२०२४ ची जी – २० संमेलनाची बैठक ही ब्राझील देशात होणार आहे.

जी – २० संमेलनामध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा केली जाते ?

जी – २० संमेलनामध्ये आर्थिक मुद्यांवर चर्चा केली जाते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या जी – २० संमेलनाची संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण जी – २० चा फुल्ल फॉर्म, जी – २० संमेलनाची सुरवात, जी – २० संमेलनामध्ये सहभागी असणारे देश, जी – २० ची अध्यक्षता, जी – २० विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6

२)https://www.aajtak.in/amp/india/news/video/what-is-g20-work-how-presidency-determined-working-structure-everything-you-need-to-know-1775405-2023-09-09

३)https://www.google.com/amp/s/www.abplive.com/india-at-2047/what-is-g-20-and-what-is-the-purpose-how-its-members-are-working-know-here-2488283/amp

४)https://www.abplive.com/india-at-2047/what-is-g-20-and-what-is-the-purpose-how-its-members-are-working-know-here-2488283

५)https://www.drishtiias.com/hindi/daily-updates/daily-news-analysis/18th-g20-summit-in-new-delhi

Leave a Comment