इ.पी.एफ.ओ फुल फॉर्म EPFO Full Form In Marathi

EPFO Full Form In Marathi आपल्या भारत देशामध्ये मध्यम वर्गातील बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह हा नोकरी द्वारे होत असतो. आपण जर नोकरी करत असू ,तर आपल्याला महिन्याला विशिष्ट रक्कम पगार म्हणून मिळते ,तर आपल्या पगारामध्ये काही रक्कम ही पी.एफ म्हणून असते ,जे की आपल्याला काही महिन्याने मिळते.

EPFO Full Form In Marathi

इ.पी.एफ.ओ फुल फॉर्म EPFO Full Form In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण या पी.एफ संबंधी असणाऱ्या संघटने विषयी म्हणजे इ.पी.एफ.ओ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण इ.पी.एफ.ओ चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे इ.पी.एफ.ओ विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

इ.पी.एफ.ओ फुल्ल फॉर्म (EPFO full form)

इ.पी.एफ.ओ चा फुल्ल फॉर्म “एम्पलोयी प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन” असा होतो. इ.पी.एफ.ओ ला मराठी भाषेमध्ये “कर्मचारी भविष्य निधी संघटन” असे म्हणतात. कर्मचारी भविष्य निधी संघटन ची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली होती ,तसेच इ.पी.एफ.ओ चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे.

“कर्मचारी भविष्य निधी संघटन” म्हणजे इ.पी.एफ.ओ हे भारत सरकाच्या रोजगार मंत्रालयाद्वारे कार्य करते. या संघटनेद्वारे कर्मचारी भविष्य निधी अंतर्गत कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध योजना बनवल्या जातात आणि या योजनांचा फायदा कर्मचाऱ्यांना होतो.

इ.पी.एफ चे फायदे (Benefits of EPF in Marathi)

१) जेव्हा एखादा कर्मचारी त्याचे पी.एफ चे खाते उघडतो तेव्हा त्याला इ.पी.एफ.ओ द्वारे मोफत इन्शुरन्स ची सुविधा दिली जाते. तसेच इ.डी. एल.आई योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स द्वारे ६ लाख रुपये पर्यंतचा लाभ होऊ शकतो.

२) इ.पी.एफ चे खाते दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे चालू खाते आणि दुसरा प्रकार म्हणजे बंद खाते. चालू खात्यामध्ये सतत गुंतवणूक होत असते आणि बंद खात्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून गुंतवणूक झालेली नसते ; जोपर्यंत कर्मचारी निवृत्त होत नाही तोपर्यंत इ.पी.एफ च्या चालू आणि बंद खात्यावर व्याज मिळते.

३) इ.पी.एफ चा मोठा फायदा हा की ,“इ.पी.एफ.ओ संघटनेद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नंतर मिळणाऱ्या फंड मध्ये कोणतेही टॅक्स भरावे लागत नाही.”

४) जे कर्मचारी निवृत्त व्हायच्या अगोदर पी.एफ खात्यातून कोणतीही रक्कम काढत नाहीत ,अशा कर्मचाऱ्यांना इ.पी.एफ.ओ संघटने द्वारे

त्यांच्या निवृत्ती नंतर दर महिन्याला विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते.

इ.पी.एफ साठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for EPF in Marathi)

१) इ.पी.एफ योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी हा या योजनांचा सक्रिय सदस्य असणे गरजेचे असते.

२) कर्मचारी ज्या दिवशी एखादी कंपनी जॉईन करतो, त्या दिवसा पासून तो इ.पी.एफ योजनेचा लाभ उचलू शकतो.

३) ज्या कंपनीमध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात ,त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना इ.पी.एफ योजनेचा लाभ देणे गरजेचे असते.

३) ज्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो ,ते सर्व कर्मचारी इ.पी.एफ योजनेचा फायदा उचलू शकतो.

यू.ए.एन नंबर (UAN number in Marathi)

यू.ए.एन नंबर म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर. युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा एक १२ अंकी नंबर आहे ,जो इ.पी.एफ.ओ च्या प्रत्येक सदस्याला दिला जातो. युनिव्हर्सल अकाउंट नंबर च्या मदतीने कर्मचारी पी.एफ ची रक्कम सहजरीत्या आपल्या खात्यातून काढू शकतो.

FAQ

इ.पी.एफ.ओ चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

इ.पी.एफ.ओ चा फुल्ल फॉर्म “एम्पलोयी प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन” असा होतो.

इ.पी.एफ.ओ ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ?

इ.पी.एफ.ओ ला मराठी भाषेमध्ये “कर्मचारी भविष्य निधी संघटन” असे म्हणतात.

इ.पी.एफ.ओ ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती आणि इ.पी.एफ.ओ संघटन कोणत्या मंत्रालयाद्वारे कार्य करते ?

इ.पी.एफ.ओ ची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली होती आणि इ.पी.एफ.ओ संघटन हे भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयाद्वारे कार्य करते.

इ.पी.एफ.ओ संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

इ.पी.एफ.ओ संघटनेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

इ.पी.एफ योजनेचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना होतो ?

कर्मचारी ज्या दिवशी एखादी कंपनी जॉईन करतो ,त्या दिवसापासून तो इ.पी.एफ योजनेचा लाभ उचलू शकतो. तसेच ज्या कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात ,त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना इ.पी.एफ योजनेचा लाभ द्यावा लागतो.

यु.ए.एन नंबर किती अंकी असतो ?

युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू.ए.एन नंबर हा १२ अंकी असतो आणि या यू.ए.एन नंबरच्या मदतीने कर्मचारी आपल्या खात्यातून सहजरीत्या पी.एफ ची रक्कम काढू शकतो.

इ.पी.एफ.ओ संघटने द्वारे कोणत्या योजना येतात ?

इ.पी.एफ.ओ संघटने द्वारे तीन योजना येतात. या तीन योजनांमध्ये कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी भविष्य योजना ,कर्मचारी राज्य विमा योजना ,इत्यादी योजनांचा समावेश असतो.

इ.पी.एफ योजनेचे कोणकोणते फायदे आहेत ?

इ.पी.एफ द्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नंतर मिळणाऱ्या फंड वरती कोणतेही टॅक्स भरावे लागत नाही. तसेच जे कर्मचारी नोकरी करत असताना पी.एफ खात्यातून रक्कम काढत नाहीत ,त्यांना त्यांच्या निवृत्ती नंतर दर महिन्याला विशिष्ट रक्कम ही पेन्शन म्हणून मिळते. याचसोबत जे इ.पी.एफ योजनेचे खाते उघडतात ,त्यांना इ.पी.एफ.ओ संघटने द्वारे इन्शुरन्स चा लाभ देखील दिला जातो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण “कर्मचारी भविष्य निधी संघटन” म्हणजे (इ.पी.एफ.ओ) विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण इ.पी.एफ.ओ चा फुल्ल फॉर्म, इ.पी.एफ चे फायदे, इ.पी.एफ साठी असणारी पात्रता निकष, इ.पी.एफ.ओ विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%A8

२)https://labour.gov.in/hi/organizationsofmole/employees-provident-fund-organisation-epfo

३)https://leverageedu.com/blog/hi/epfo-in-hindi/

४)https://byjus-com.translate.goog/full-form/epfo-full-form/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

५)https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

Leave a Comment