ईडी फुल फॉर्म ED Full Form In Marathi

ED Full Form In Marathi ED या शब्दाने जणू काही काळापासून वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन वर राज्यच केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वादाचा सर्वात जास्त मोठा विषय हा ED ची चौकशी हाच आहे. ED ही देशातील कोणत्या दर्जाची संस्था आहे याविषयी आपल्याला माहिती नसते तरी देखील आपण ED विषयी चर्चा करत असतो.

ED Full Form In Marathi

ईडी फुल फॉर्म ED Full Form In Marathi

चला तर मग आज आपण ED शब्दाचा फुल फॉर्म, ED म्हणजे काय, ED काय कार्ये करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ED चे अधिकार काय असतात आणि ED ही केंद्र सरकार चालवते का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

ED Full Form in Marathi । ED Long Form In Marathi

ED ही भारतातील एक तपास संस्था आहे. या संस्थेचा दर्जा हा खूप उच्च आहे. ED चा इंग्रजी भाषेत full form हा Directorate of enforcement हा आहे. थोडंस उलट जरी असेल तरी देखील सध्या राजकारण्यांच्या आणि व्यवसायिकांच्या मागे लागणाऱ्या तपास संस्थेचा हाच फुल फॉर्म आहे. ED या शब्दाचा मराठी भाषेत फुल फॉर्म किंवा मराठी नाव हे अंमलबजावणी संचालनालय असा होतो.

ED म्हणजे काय? What is ED in Marathi?

आपल्याला ED एखाद्या छोट्या केसेस मध्ये कधीच बघायला मिळत नाही मात्र जिथे महसूल, वित्त याविषयी गुन्हेगारी घडते अशा ठिकाणी हाय प्रोफाइल केसेस मध्ये ED या केंद्र सरकारच्या अंतर्गत चालणाऱ्या तपास संस्थेचा वाटा येतो.

एखाद्या ठिकाणी मणी लौंड्रींग सारख्या घटना जर घडत असतील तर तेव्हा ED चा संबंध येतो. परदेशातून गैरपणे आलेली मालमत्ता आणि भारतात राहून असलेली गैर मालमत्ता यांच्या विषयी चौकशी करण्याचे अधिकार हे ED या संस्थेला असतात. ED ही एक गुप्तपणे कार्य करणारी संस्था आहे असे म्हणायला काही हरकत नाही. ED जेव्हा देशात मोठे व्यवहार होतात तेव्हा ते सुरळीत आणि कायदेशीर घडविण्यासाठी कार्य करत असते.

आर्थिक विषयाशी संबंधित मग वित्त आणि मालमत्ता यांशी निगडित जे काही गुन्हे किंवा प्रकरणे असतात यांच्या तपासाची जबाबदारी ही ED या संस्थेची असते. शक्यतो सर्व कामे ही ED कडे न जाता आधी ती इतर संस्थांकडे असतात मात्र केस जास्त हाय प्रोफाइल असेल तर ED कडे तिचा तपास दिला जातो.

ED चा इतिहास

ED या संस्थेविषयी आपण सुरुवातीला काही माहिती जाणून घेतली मात्र या संस्थेचा इतिहास काय आहे? याविषयी आता जाणून घेऊयात. ED या भारत सरकारच्या अंतर्गत चालणाऱ्या संस्थेची स्थापना ही 1 मे 1956 रोजी करण्यात आली. ED संस्थेची स्थापना भारतातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी करण्यात आली होती. फेमा 1973 या कायद्यानुसार काही काळ ED चे सुरू होती मात्र पुढे जाऊन याला जोड म्हणून फेमा 1999 आला आणि आता ED या संस्थेचे काम हे दोन्ही अंतर्गत चालते.

ED ची कार्यालये

ED या संस्थेचे कार्यालय हे दिल्ली येथे असून इथून देशभरातील इतर 4 मुख्य कार्यालयांवर देखरेख ठेवली जाते. दिल्ली येथे असलेल्या कार्यालयाला ED चे मुख्य कार्यालय म्हणले जाते. मात्र याशिवाय इतर 4 प्रादेशिक कार्यालयांना देखील मुख्य कार्यालय असेच संबोधले जाते. हे प्रादेशिक कार्यालय मुंबई, चंदीगड, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये आहे.

मुख्य कार्यालयाशिवाय ED ची क्षेत्रीय आणि उपक्षेत्रीय कार्यालये भारतात विखुरलेली आहेत. अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, कोची, पणजी, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, चंदीगड, दिल्ली, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, श्रीनगर आणि पटना या शहरांमध्ये ED ची क्षेत्रीय तर भुवनेश्वर, इंदूर, मुदुराई, नागपूर, कोझिकोडे, रायपूर, इस्लामाबाद, डेहराडून, रांची, सुरत, विशाखापट्टणम, शिमला व जम्मू इथे उप क्षेत्रीय कार्यालय आहे.

ED ची मुख्य उद्दिष्टये

ED ही संस्था वर सांगितलेले 2 कायदे पाळण्यासाठी बनविण्यात आली होती. मात्र सध्याच्या काळात मणी लौंड्रींग सारख्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळे काही काळापूर्वी ED या संस्थेचे काम वाढले आहे. फेमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट होय. या फेमा 1973 आणि 1999 अंतर्गत विदेशी चलन आणि विदेशी व्यवहार यावर ED ला नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

PLMA 2002 हा एक नवीन कायदा आल्यानंतर याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील ED कडे देण्यात आली. PLMA म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लौंड्रींग ऍक्ट होय. यामध्ये मनी लौंड्रीग सारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचे काम ED कडे देण्यात आले आहे. सध्या राजकारणात ED च्या ज्या काही धाडी पडत आहेत त्या मनी लौंड्रींग साठी असलेल्या PLMA 2002 अंतर्गत पडत आहेत.

ED मधील अधिकारी

ED ही संस्था सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत कार्यरत होती आणि तोपर्यंत ED मध्ये अधिकारी नेमणूक करण्याचे काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे असे. मात्र आता ED ही संस्था भारत सरकारच्या महसूल विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. महसूल विभागाकडून UPSC सारख्या स्पर्धा परिक्षांमधून येणारे अधिकारी ED मध्ये नेमलेले असतात. यामध्ये कस्टम, पोलीस, प्राप्तिकर इत्यादी विभागांतील अधिकारी असतात.

निवडलेले अधिकारी हे IAS, IPS, IRS दर्जाचे असल्याने ते निर्भीड असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव नसतो. त्यांच्यासाठी शिस्त आणि कायदा हे सर्वस्व असते. त्यामुळे हे संस्था कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्य करू शकते.

FAQ (Frequently Asked Questions)

ED चे मुख्य कार्यालय भारतात कोठे आहेत?

भारतात ED ची एकूण 5 कार्यालये मुंबई, चेन्नई, कोलकाता, चंदीगड आणि दिल्ली इथे आहेत.

ED ची स्थापना कधी झाली?

1 मे 1956 रोजी ED या संस्थेची स्थापना झाली.

ED ही संस्था केंद्र सरकार अंतर्गत चालते का?

होय, ED ही गुप्त पणे कार्य करणारी संस्था असली तरी देखील ती भारत सरकार अंतर्गत म्हणजेच केंद्रे सरकार अंतर्गत कार्य करते.

ED चे सध्याचे कार्यरत संचालक कोण आहेत?

ED संस्थेचे सध्याचे कार्यरत असलेले संचालक हे संजय कुमार मिश्रा आहेत. संजय कुमार मिश्रा हे IRS अधिकारी आहेत.

Leave a Comment