डी.एस.पी फुल फॉर्म DSP Full Form In Marathi

DSP Full Form In Marathi आपल्यापैकी काही लोकांचे स्वप्न पोलीस अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे असते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका पोलिस  पोस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डी.एस.पी चा फुल्ल फॉर्म ,तसेच डी.एस.पी पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

DSP Full Form In Marathi

डी.एस.पी फुल फॉर्म DSP Full Form In Marathi

डी.एस.पी फुल्ल फॉर्म (DSP full form)

डी.एस.पी चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “Deputy Superintendent of Police” असा होतो ,तसेच डी.एस.पी अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये “उप पोलीस अधीक्षक” असा होतो. डी.एस.पी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार असतात. “उप पोलीस अधीक्षक” म्हणजेच डी.एस.पी पद हे “पोलीस अधीक्षक” नंतर दुसरे मोठे पद असते.

आपल्याला जर डी.एस.पी अधिकारी बनायचे असेल तर ,डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे परीक्षा देऊन डी.एस.पी अधिकारी बनने आणि दुसरा मार्ग म्हणजे सब इन्स्पेक्टर किंवा पोलीस हवालदार म्हणून सर्व्हिस मध्ये जाणे आणि चांगली कामगिरी करून प्रमोशन मिळवून डी.एस.पी अधिकारी बनने ; परंतु सब इन्स्पेक्टर आणि पोलीस हवालदार यांना डी.एस.पी अधिकारी बनन्यासाठी साधारण कमीतकमी १५ वर्ष तरी सर्व्हिस करावी लागते ,त्यानंतर त्यांची निवड डी.एस.पी पदासाठी होऊ शकते.

तसेच आपण लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करून देखील डी.एस.पी अधिकारी बनू शकतो. यासाठी आपल्याला लोकसेवा आयोगाची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आपल्याला साधारण दीड ते दोन वर्ष मनापासून अभ्यास करावा लागतो.

काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करतात ,तर काही उमेदवारांना दिवसरात्र अभ्यास करून देखील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करता येत नाही. स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धा खूप वाढली आहे ,त्यामुळे एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांची संख्या देखील खूप कमी असते.

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming DSP officer in Marathi)

१) सर्वप्रथम डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारा उमेदवार डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी पात्र ठरतो.

२) डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३० वर्ष इतकी असते. खुल्या प्रवर्गातील उमेदवार ज्याचे वय ३१ आहे ,तो डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी अपात्र ठरतो.

३) डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३३ वर्ष इतकी असते ,तसेच डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती मधील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३५ वर्ष इतकी असते.

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी शारिरीक योग्यता (Physical eligibility for becoming DSP officer in Marathi)

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी महिलांना आणि पुरुषांना वेगवेगळी शारीरिक योग्यता असते. डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची साधारण १६८ सेंटी मीटर इतकी असावी लागते. १६८ सेंटी मीटर पेक्षा कमी उंची असलेला पुरुष उमेदवार डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी अपात्र ठरतो.

तसेच  डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी पुरुष उमेदवाराची छाती साधारण ८४ सेंटी मीटर इतकी असावी लागते. याचसोबत डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी महिला उमेदवाराची उंची साधारण १५५ सेंटी मीटर इतकी असावी लागते. १५५ सेंटी मीटर पेक्षा कमी उंची असलेली महिला उमेदवार डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी अपात्र ठरते.

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठीची प्रक्रिया (Process of becoming DSP officer in Marathi)

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी आपल्याला लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणारी एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन राऊंड असतात. पहिला राऊंड म्हणजे “प्राथमिक परीक्षा” ,दुसरा राऊंड म्हणजे “मुख्य परीक्षा” आणि तिसरा व शेवटचा राऊंड म्हणजे “मुलखात राऊंड”. या तिन्ही राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवले जाते व त्या उत्तीर्ण उमेदवारांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची निवड लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी केले जाते. या पदामध्ये डी.एस.पी पदाचा देखील समावेश असतो.

डी.एस.पी अधिकाऱ्यांचा पगार (Salary of DSP officers in Marathi)

डी.एस.पी अधिकाऱ्यांचा पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो. जे डी.एस.पी या पदावर खूप वर्षांपासून कार्यरत आहेत ,त्यांचा पगार इतर डी.एस.पी अधिकाऱ्यांच्या तुलनेत जास्त असतो. परंतु डी.एस.पी अधिकाऱ्यांचा  महिन्याचा पगार हा साधारण ५३,१०० ते १,६७,८०० इतका असतो.

FAQ

डी.एस.पी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

डी.एस.पी चा फुल्ल फॉर्म हा “Deputy Superintendent of Police” असा होतो.

डी.एस.पी शब्दाचा मराठी अर्थ काय होतो ?

डी.एस.पी शब्दाचा मराठी अर्थ हा “उप पोलीस अधीक्षक” असा होतो.

डी.एस.पी अधिकाऱ्यांचा महिन्याचा पगार साधारण किती असतो ?

डी.एस.पी अधिकाऱ्यांचा महिन्याचा पगार हा साधारण ५३,१०० ते १,६७,८०० इतका असतो.

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ?

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी लोकसेवा आयोगाची एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी पात्रता निकष काय असतो ?

डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. तसेच डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३० वर्ष इतकी असते ,तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३३ वर्ष इतकी असते आणि अनुसूचित जाती व जमाती मधील उमेदवारांची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३५ वर्ष इतकी असते. तसेच डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची १६८ सेंटी मीटर आणि छाती ८४ सेंटी मीटर असावी लागते ,तर महिला उमेवारांची उंची १५५ सेंटी मीटर इतकी असावी लागते.

एमपीएससी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एमपीएससी चा फुल्ल फॉर्म हा “महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन” असा होतो.

एमपीएससी परीक्षेचे किती राऊंड असतात ?

एमपीएससी परीक्षेचे तीन राऊंड असतात. पहिला राऊंड म्हणजे “प्राथमिक परीक्षा” ,दुसरा राऊंड म्हणजे “मुख्य परीक्षा” आणि तिसरा आणि शेवटचा राऊंड म्हणजे “मुलाखात राऊंड”. जो उमेदवार हे तिन्ही राऊंड उत्तीर्ण करतो. त्याला ट्रेनिंग साठी पाठवले जाते आणि त्याचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचे विविध पदावर पोस्टिंग केले जाते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण डी.एस.पी पदाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डी.एस.पी चा फुल्ल फॉर्म ,डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, डी.एस.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी शारिरीक योग्यता ,डी.एस.पी अधिकारी बनण्याची प्रक्रिया, डी.एस. पी अधिकाऱ्यांचा पगार ,डी.एस.पी पदाविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे पाहिली.

संदर्भ (Refrence)

१)https://samajik.in/dsp-full-form-in-hindi/

२)https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/Deputy_superintendent_of_police?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

३)https://www.mcpanchkula.org/dsp-ssp-full-form-in-hindi.aspx

४)https://www.pw.live/exams/full-form/dsp/

५)https://www.wizr.in/hi/articles-hindi/dsp-full-form-in-hindi

Leave a Comment