DM Full Form In Marathi आपण जेव्हा शाळेत किंवा कॉलेज मध्ये असतो तेव्हा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्वप्न असते. काहींचे स्वप्न डॉक्टर बनने असे असते ,तर काहींचे स्वप्न इंजिनियर बनने असे असते ,तर काहींचे स्वप्न जिल्हाधिकारी बनण्याचे असते. ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीजण नोकरी करतात ,तर काहीजण पुढील शिक्षण घेण्यासाठी मास्टर साठी एडमिशन घेतात. तर काहीजण युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात.
डीएम फुल फॉर्म DM Full Form In Marathi
यातील काही उमेदवार युपीएससी परीक्षा पास करून जिल्ह्याचा डीएम बनतात. आजच्या लेखामध्ये आपण याच डीएम पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण डीएमचा फुल्ल फॉर्म देखील पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डीएम च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि डीएम पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
डीएम फुल्ल फॉर्म (DM full form)
डीएम चा फुल्ल फॉर्म हा “डिस्ट्रिक्ट मैजेस्ट्रिक” असा होतो. डीएम ला दुसऱ्या भाषेमध्ये “जिल्हाधिकारी” असे देखील म्हणले जाते. याव्यतिरिक्त काहीजण डीएम ला कलेक्टर असे देखील म्हणतात. डीएम अधिकारी जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. तसेच डीएम अधिकारी जिल्ह्यांच्या हितासाठी योग्य ते निर्णय देखील घेतात.
युपीएससी परीक्षा (UPSC Exam)
डीएम अधिकारी बनण्यासाठी आपल्याला युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. सर्वप्रथम युपीएससी परीक्षा देण्यासाठी आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे ,तरच आपण युपीएससी परीक्षेसाठी पात्र ठरतो. डीएम अधिकारी बनण्यासाठी आपण कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे. तसेच डीएम अधिकारी बनण्यासाठी आपण कॉलेजच्या वर्षामध्ये आपण कॉलेजच्या अभ्यासाव्यतिरिक्त युपीएससी परीक्षेचा अभ्यास देखील केला पाहिजे.
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून डीएम अधिकारी बनण्यासाठी आपण साधारण कमीतकमी दोन वर्ष तरी मन लावून अभ्यास केला पाहिजे. काही लोकांच्या मते युपीएससी परीक्षेचा अभ्यास करणे ही एक तपस्या आहे आणि या तपस्याचे फळ खूप कमी लोकांना मिळते.
तुम्ही जर मनलावून युपीएससी परीक्षेचा अभ्यास केला तर तुमची डीएम अधिकारी बनण्याची शक्यता वाढते ; परंतु काहीजण कित्येक वर्ष अभ्यास करून देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत नाहीत. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यामध्ये जेवढी मेहनत महत्वाची असते ,तेवढेच लक देखील महत्वाचे असते.
डीएम अधिकारी बनण्यासाठीची प्रक्रिया (Procedure to become DM officer in Marathi)
डीएम अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युपीएससी परीक्षेचा पहिला राऊंड म्हणजे “प्राथमिक परीक्षा” उत्तीर्ण करावी लागते. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची पुढील राऊंड साठी म्हणजे “मुख्य परीक्षेसाठी” निवड होते. तुम्ही जर मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाला तर ,युपीएससी परीक्षेचा तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंड साठी तुमची निवड होते. युपीएससी परीक्षेचा शेवटचा राऊंड म्हणजे “मुलाखत राऊंड”. मुलाखत राऊंड मध्ये तुम्ही खरच सिव्हिल अधिकारी बनण्यासाठी पात्र आहात की नाही ? ,याची चाचणी घेतली जाते.
मुलाखत राऊंड झाल्यानंतर काही दिवसातच युपीएससी परीक्षेचा निकाल लागतो. त्यानंतर युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लिस्ट लावली जाते आणि या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवले जाते. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची निवड विविध पदासाठी केली जाते आणि या पदामध्ये “डीएम” पदाचा देखील समावेश आहे.
डीएम अधिकाऱ्यांचा पगार (Salary of DM officer in Marathi)
डीएम अधिकाऱ्यांचा पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो ; परंतु डीएम अधिकाऱ्यांचा महिन्याचा पगार साधारण ५६,१०० रुपये ते १,१८,५०० रुपये इतका असतो. अनुभवी डीएम अधिकाऱ्यांचा पगार जास्त असतो. याव्यतिरिक्त डीएम अधिकाऱ्यांना सरकारद्वारे विविध सवलती देखील दिल्या जातात.
या सवलती मध्ये डीएम अधिकाऱ्याला सरकारकडून गाडी ,गाडी चालक ,राहण्यास घर ,सुरक्षिततेसाठी पोलीस ,व इतर सवलती दिल्या जातात. याव्यतिरिक्त डीएम अधिकाऱ्यांना समाजामध्ये खूप मान असतो. छोट्या खेडेगावामधील जर कोणी उमेदवार डीएम अधिकारी झाला तर ,त्यांचा सत्कार गावामध्ये केला जातो. तसेच काही ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा मान देखील डीएम अधिकाऱ्यांना दिला जातो.
डीएम अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming DM officer in Marathi)
१) डीएम अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
२) जर उमेदवार खुल्या प्रवर्गातून असेल तर त्या उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३० वर्ष इतकी असते. ३० पेक्षा जास्त वय असणारा खुल्या प्रवर्गातील उमेदवार युपीएससी परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरतो.
३) युपीएससी परीक्षा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३३ वर्ष इतकी असते. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट दिली जाते.
४) युपीएससी परीक्षा देण्यासाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३५ वर्ष इतकी असते. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सूट दिली जाते.
५) युपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा ,नेपाळचा आणि भुटान चा नागरिक असला पाहिजे.
६) तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवार युपीएससी ची परीक्षा ही जास्तीत जास्त ६ वेळा देऊ शकतो. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवार युपीएससी ची परीक्षा जास्तीत जास्त ९ वेळा देऊ शकतो. याव्यतिरिक्त एससी ,एसटी आणि अनुसूचित जातीतील उमेदवार कितीही वेळा युपीएससी ची परीक्षा देऊ शकतो.
७) विकलांग उमेदवार देखील कितीही वेळा युपीएससी ची परीक्षा देऊ शकतो.
युपीएससी परीक्षेसाठी निवेदन करण्याची प्रक्रिया (Application Procedure for UPSC Exam in Marathi)
१) युपीएससी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युपीएससी च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
२) युपीएससी च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला विविध परीक्षांची लिस्ट दिसेल. डीएम अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला युपीएससी ची “सिव्हिल सर्व्हिस परीक्षा” द्यावी लागते. युपीएससी चा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही युपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वर असणाऱ्या परीक्षा लिस्ट मध्ये “सिव्हिल सर्व्हिस परीक्षा” या पर्यायावर क्लिक करा.
३) त्यानंतर निवेदन फॉर्म मध्ये असणारी माहिती तुम्ही व्यवस्थित रित्या भरा. या माहितीमध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती विचारली जाईल. ती माहिती तुम्ही योग्य रित्या भरा.
४) माहिती भरल्यानंतर तुम्हाला परीक्षेची फी भरावी लागेल. परीक्षेची फी भरल्यानंतर युपीएससी परीक्षेचा तुमचा निवेदन फॉर्म यशस्वी रित्या सबमिट होईल.
FAQ
डीएम चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
डीएम चा फुल्ल फॉर्म हा “डिस्ट्रिक्ट मैजेस्ट्रिक” असा होतो.
डीएम अधिकाऱ्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात ?
काही लोक डीएम अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी आणि कलेक्टर असे देखील म्हणतात.
डीएम अधिकारी बनण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ?
डीएम अधिकारी बनण्यासाठी युपीएससी ची “सिव्हिल सर्व्हिस” ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
डीएम अधिकाऱ्याला कोणकोणती कामे करावी लागतात ?
डीएम अधिकारी हा जिल्ह्याच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी असतो. आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीएम अधिकारी विविध प्रयत्न करत असतात. तसेच डीएम अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार देखील असतो.
युपीएससी परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष काय असतो ?
युपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे ,तसेच युपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारत ,नेपाल आणि भूतान या देशांचा नागरिक असला पाहिजे.
मी माझे ग्रॅज्युएशन एमबीबीएस मधून केले आहे तर ,मी युपीएससी ची परीक्षा देऊ शकतो का ?
हो ,तुम्ही युपीएससी ची परीक्षा देऊ शकता. युपीएससी ची परीक्षा देण्यासाठी आपले कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
युपीएससी ची परीक्षा किती राऊंड मध्ये घेतली जाते ?
युपीएससी ची परीक्षा ही तीन राऊंड मध्ये घेतली जाते. या तीन राऊंड मध्ये प्राथमिक परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड या तीन राऊंड चा समावेश असतो.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण डीएम अधिकाऱ्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डीएम चा फुल्ल फॉर्म ,युपीएससी परीक्षा, डीएम अधिकारी बनण्याची प्रक्रिया , डीएम अधिकाऱ्यांचा पगार ,डीएम अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष ,युपीएससी परीक्षेसाठी निवेदन करण्याची प्रक्रिया ,डीएम विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.