DIG Full Form In Marathi सीमेवरती दिवसरात्र तैनात राहून सैनिक आपल्या भारत मातेची सेवा करतात. तसेच सण उत्सवामध्ये आपल्या घरी न जाता ,२४ तास आपल्या देशाची सेवा हे आपल्या देशाचे पोलीस बांधव करत असतात. पोलिस अधिकारी बनून देशाची सेवा करणे ,हे खूप लोकांचे स्वप्न असते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका पोलिस खात्यातील एका पदा विषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आपण पोलीस खात्यातील डी.आई.जी या पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

डी.आई.जी फुल फॉर्म DIG Full Form In Marathi
डी.आई.जी फुल्ल फॉर्म (DIG full form)
डी.आई.जी चा फुल्ल फॉर्म हा “डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल” असा होतो. मराठी भाषेमध्ये डी.आई.जी अधिकाऱ्यांना “पोलीस उप महानिरीक्षक” असे म्हणतात.
डी.आई.जी अधिकाऱ्यांची कामे (Works of DIG officer in Marathi)
डी.आई.जी अधिकाऱ्यांची काही कामे खालीलप्रमाणे आहेत:
१) एका विशिष्ठ विभागाची रक्षा करणे ,तसेच त्या क्षेत्रामधील गुन्हेगारीला आळा घालणे, त्या क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणे ,ही डी.आई.जी ची जबाबदारी असते.
२) आपल्या क्षेत्रामधील इतर पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे ,तसेच त्यांना विशिष्ट प्रशिक्षण देणे ,ही देखील डी.आई.जी अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
३) काही डी.आई.जी अधिकाऱ्यांना आतंकवादी संघटनांना पकडण्याची ,आतंकवाद्यांना पकडण्यासाठी विशेष योजना आखण्याची जबाबदारी असते.
डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming DIG officer in Marathi)
१) डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. तसेच उमेदवाराने डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. युपीएससी परीक्षेमध्ये आयपीएस पद मिळालेल्या उमेदवारांची निवड डी.आई.जी अधिकारी पदासाठी केली जाते.
२) डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी आपण शारीरिक रित्या फीट असलो पाहिजे.
डी.आई.जी अधिकारी बनल्यानंतर देण्यात येणारे प्रशिक्षण (Training after becoming DIG officer in Marathi)
युपीएससी मधील सिव्हिल सर्व्हिस परीक्षा जे उमेदवार पास करतात आणि ज्यांना आयपीएस पोस्ट मिळते त्यातील काही उमेदवारांना डी.आई.जी अधिकारी साठी प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो उत्तीर्ण उमेदवार जेव्हा सेवेमध्ये जातो ,तेव्हा त्याला विविध कार्यशाळाद्वारे आणि विविध सेमिनारद्वारे विशेष प्रशिक्षण दिले जाते. तसेच काही डी.आई.जी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी विदेशात पाठवले जाते.
डी.आई.जी अधिकारी बनण्याचे काही फायदे (Some Benefits of becoming DIG officer in Marathi)
डी.आई.जी अधिकारी बनण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत :
१) डी.आई.जी अधिकाऱ्यांना समाजामध्ये मान दिला जातो. काही ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डी.आई.जी अधिकाऱ्यांना विशेष आमंत्रण दिले जाते.
२) सरकारद्वारे देखील डी.आई.जी अधिकाऱ्यांना विशेष सवलती दिल्या जातात. या सवलती मध्ये चिकित्सा सवलत ,राहण्यासाठी सोय ,इत्यादी सुविधांचा समावेश असतो.
३) डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार देखील आकर्षक असतो.
४) डी.आई.जी अधिकाऱ्यांचे जीवन आव्हानात्मक असते. त्यांना दररोज नवनवीन समस्यांचा सामना करावा लागतो.
डी.आई.जी अधिकाऱ्यांसमोर असणारी आव्हाने (Challenges faced by DIG officers in Marathi)
डी.आई.जी अधिकाऱ्यांना दररोज विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. काही वेळा नेत्यांकडून डी.आई.जी अधिकाऱ्यांवर प्रेशर बनवला जातो. अशा वेळी योग्य तो निर्णय घेणे डी.आई.जी अधिकाऱ्यांसाठी कठीण बनते. काही डी.आई.जी अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांना आणि आतंकवादी संघटनांना पकडण्याची जबाबदारी असते. अशावेळी जनतेला हानी न होता ,आतंकवाद्यांना पकडणे हे डी.आई.जी अधिकाऱ्यांपुढे मोठे आवाहन बनते.
बऱ्याच वेळा डी.आई.जी अधिकाऱ्यांचे जीवन हे खूप व्यस्त आणि तणावाणे भरलेले असते. अशावेळी डी.आई.जी अधिकाऱ्यांसमोर आपले वयक्तिक जीवन आणि करीयर यांचा समतोल राखणे मोठे आवाहन बनते.
डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार (Monthly Salary of DIG officer in Marathi)
डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो आणि जसा जसा डी.आई.जी अधिकाऱ्यांचा अनुभव वाढत जातो. तसा तसा त्यांच्या मासिक पगारामध्ये देखील वाढ होत जाते. डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण ३७,००० रुपये ते ६८,००० रुपये इतका असतो.
FAQ
डी.आई.जी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
डी.आई.जी चा फुल्ल फॉर्म “डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल” असा होतो.
मराठी भाषेमध्ये डी.आई.जी अधिकाऱ्यांना काय म्हणले जाते?
डी.आई.जी अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये “पोलीस उप महानिरीक्षक” असे म्हणले जाते.
डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ?
डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी युपीएससी ची “सिव्हिल सर्व्हिस परीक्षा” उत्तीर्ण करावी लागते.
डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी पात्रता निकष काय असतो ?
सर्वप्रथम डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. तसेच डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला युपीएससी ची “सिव्हिल सर्व्हिस परीक्षा” उत्तीर्ण करणे गरजेचे असते. युपीएससी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या उमेदवारांना आयपीएस ही पोस्ट मिळते ,त्यातील काही उमेदवारांची निवड डी.आई.जी पदासाठी केली जाते.
डी.आई.जी अधिकाऱ्यांना कोणकोणती कामे करावी लागतात ?
डी.आई.जी अधिकाऱ्यांना विशिष्ट विभागामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. तसेच काही डी.आई.जी अधिकाऱ्यांना दहशतवादी संघटनाना आणि दहशतवाद्यांना पकडण्याची जबाबदारी असते.
डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?
डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण ३७,००० रुपये ते ६८,००० रुपये इतका असतो.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण “पोलीस उप महानिरीक्षक” म्हणजे डी.आई.जी अधिकारी यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डी.आई.जी चा फुल्ल फॉर्म ,डी.आई.जी अधिकाऱ्यांचे कार्य,
डी.आई.जी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, डी.आई.जी अधिकारी बनल्यानंतर देण्यात येणारे प्रशिक्षण, डी.आई.जी अधिकारी बनण्याचे काही फायदे ,डी.आई.जी अधिकाऱ्यांसमोर असणारी काही आव्हाने ,
डी.आई.जी अधिकाऱ्यांचा मासिक पगार ,डी.आई.जी अधिकाऱ्यांविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.
संदर्भ (References)
३)https://www.wizr.in/hi/articles-hindi/dig-full-form-in-hindi
४)https://leverageedu.com/blog/hi/dig-full-form-in-hindi/
५)https://unacademy.com/content/upsc/full-forms/dig-full-form/