डी.जी.पी फुल फॉर्म DGP Full Form In Marathi

DGP Full Form In Marathi आपल्या भारतामध्ये युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस अधिकारी बनण्याचे खूप लोकांचे स्वप्न असते. आजच्या लेखामध्ये आपण युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मिळणाऱ्या अशाच एका पोलिस खात्याविषयी म्हणजे डी.जी.पी खात्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डी.जी.पी पदाविषयी आणि डी.जी.पी च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

DGP Full Form In Marathi

डी.जी.पी फुल फॉर्म DGP Full Form In Marathi

डी.जी.पी फुल्ल फॉर्म (DGP full form)

डी.जी.पी चा फुल्ल फॉर्म “डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस” असा होतो आणि मराठी भाषेमध्ये डी.जी.पी ला “पोलीस महानिर्देशक” असे म्हणले जाते. डी.जी.पी खाते हे राज्यातील पोलीस खात्यातील प्रमुख खाते असते. डी.जी.पी अधिकाऱ्यांना राज्यामध्ये सुरक्षा  राखण्याची जबाबदारी असते. तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डी.जी.पी अधिकारी प्रयत्न करत असतात.

डी.जी.पी अधिकारी बनण्याची प्रक्रिया (Process of becoming DGP officer in Marathi)

डी.जी.पी हे प्रमोशनल पद आहे आणि डी.जी.पी पदासाठी सरळ भरती होत नाही.

डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी आपल्याला युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. तसेच जे उमेदवार युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करतात आणि ज्यांना आयपीएस पद मिळते आणि कार्यशील आणि अनुभवी आयपीएस अधिकाऱ्यांना डी.जी.पी अधिकारी बनवले जाते.

डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for DGP officer in Marathi)

डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ज्या युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयपीएस हे पद मिळते ,त्यातील काही अधिकाऱ्यांची निवड अनुभवानुसार डी.जी.पी पदासाठी केली जाते.

युपीएससी परीक्षेची प्रक्रिया (Process of UPSC Exam in Marathi)

युपीएससी ची परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. हे तीन चरण खालीलप्रमाणे आहेत :

१) प्राथमिक परीक्षा – युपीएससी परीक्षेचे पहिले चरण म्हणजे “प्राथमिक परीक्षा”. युपीएससी द्वारे दरवर्षी प्राथमिक परीक्षा आयोजित केली जाते. प्राथमिक परीक्षा झाल्यानंतर काही दिवसात अंस्वर की येते आणि काही दिवसानंतर प्राथमिक परीक्षेची लिस्ट लावली जाते. त्या लिस्ट मध्ये युपीएससी च्या प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे असतात. जे उमेदवार युपीएससी ची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्या उमेदवारांची निवड युपीएससी च्या पुढच्या चरणासाठी म्हणजे “मुख्य परीक्षेसाठी” होते.

२) मुख्य परीक्षा – युपीएससी परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे “मुख्य परीक्षा”. मुख्य परीक्षा ही प्राथमिक परीक्षेनंतर काही महिन्यात घेतली जाते. तसेच मुख्य परीक्षा झाल्यानंतर काही दिवसात युपीएससी द्वारे मुख्य परीक्षेची लिस्ट लावली जाते. या लिस्ट मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांची नावे असतात. जे उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड मुलाखत राऊंड साठी केली जाते.

३) मुलाखत राऊंड – जे उमेदवार युपीएससी ची प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांची निवड युपीएससी च्या तिसऱ्या आणि शेवटच्या चरणासाठी म्हणजे “मुलाखत राऊंड” साठी केली जाते.

जे उमेदवार प्राथमिक परीक्षा ,मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड हे युपीएससी चे तिन्ही चरण उत्तीर्ण करतात ,त्या उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. तसेच ज्या उत्तीर्ण उमेदवारांना आयपीएस हे पद मिळते ,त्यातील काही आयपीएस अधिकारी पुढे जाऊन डी.जी.पी अधिकारी बनतात.

युपीएससी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for UPSC Exam in Marathi)

१) युपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

२) युपीएससी परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्ष ते ३२ वर्ष इतकी असते. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आयुसीमेमध्ये ३ वर्षांची सूट दिली जाते ,तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना आयुसीमेमध्ये ५ वर्षाची सूट दिली जाते.

३) खुल्या प्रवर्गातील उमेदवार ६ वेळा युपीएससी ची परीक्षा देऊ शकतात. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवार ९ वेळा युपीएससी ची परीक्षा देऊ शकतात. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार कितीही वेळा युपीएससी ची परीक्षा देऊ शकतात.

डी.जी.पी अधिकाऱ्यांचा मासिक पगार (Monthly Salary of DGP officer in Marathi)

डी.जी.पी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण ९०,००० रुपये ते १,५०,००० रुपये इतका असतो. तसेच डी.जी.पी अधिकाऱ्यांना सरकारकडून विविध सवलती देखील दिल्या जातात. या सवलती मध्ये गाडी ,घर ,नोकर ,इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

FAQ

डी.जी.पी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

डी.जी.पी चा फुल्ल फॉर्म “डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस” असा आहे.

डी.जी.पी अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये काय म्हणले जाते ?

डी.जी.पी अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये “पोलीस महानिर्देशक” असे म्हणले जाते.

डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ?

डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी युपीएससी द्वारे घेण्यात येणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. तसेच डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयपीएस पद मिळवावे लागते.

डी.जी.पी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?

डी.जी.पी अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण ९०,००० रुपये ते १,५०,००० रुपये इतका असतो.

आपण युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून डायरेक्ट डी.जी.पी अधिकारी बनू शकतो का ?

नाही ,डी.जी.पी पद हे प्रमोशनल पद आहे. अनुभवी आयपीएस अधिकाऱ्यांची निवड डी.जी.पी पदासाठी केली जाते.

राज्यातील पोलिस खात्याचे प्रमुख पद कोणते असते ?

राज्यातील पोलीस खात्याचे प्रमुख पद हे “डी.जी.पी पद” असते.

मी माझे पदवीचे शिक्षण कला शाखेतून केले आहे ,तर मी युपीएससी ची परीक्षा देऊ शकतो का ?

हो ,युपीएससी ची परीक्षा देण्यासाठी आपण कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण राज्याच्या पोलीस खात्यातील प्रमुख पदाविषयी म्हणजे “डी.जी.पी” पदाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण डी.जी.पी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? ,डी.जी.पी अधिकारी बनण्याची प्रक्रिया, डी.जी.पी अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष, युपीएससी परीक्षेची प्रक्रिया, युपीएससी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, डी.जी.पी अधिकाऱ्यांचा मासिक पगार, डी.जी.पी पदाविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95

२)https://leverageedu.com/blog/hi/dgp-full-form-in-hindi/

३)https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/career/police-rank-post-full-form-of-dgp-dig-ig-dsp-sp-sho-si-asi-ips-rank-posts-powers-7644773.html

४)https://hindi.nvshq.org/dgp-full-form-in-hindi/

५)https://www-vedantu-com.translate.goog/full-form/dgp-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

Leave a Comment