DBT Full Form In Marathi भारत सरकार देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत असते आणि भारत सरकार द्वारे आणण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ देशातील जनतेला होतो. भारत सरकारकडून योजने अंतर्गत विशिष्ट रक्कम जनतेच्या बँक खात्यावर थेट जमा होते ,या प्रक्रियेला “डी.बी.टी” असते म्हणतात. आजच्या लेखामध्ये आपण याच डी.बी.टी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामध्ये आपण डी.बी.टी चा फुल्ल फॉर्म देखील पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे डी.बी.टी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
डी.बी.टी फुल फॉर्म DBT Full Form In Marathi
डी.बी.टी फुल्ल फॉर्म ( DBT full form )
डी.बी.टी चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर” असा होतो. डी.बी.टी ही भारत सरकार द्वारे चालवण्यात येणारी एक संकल्पना आहे आणि डी.बी.टी च्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा फायदा देशातील जनतेला होतो. जेव्हापासून भारत सरकारने डी.बी.टी ही संकल्पना अमलात आणली आहे ,तेव्हापासून योजनांच्या नावावर होणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रमाण देखील कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
डी.बी.टी अंतर्गत सरकारच्या योजने द्वारे मिळणारी विशिष्ट रक्कम थेट देशातील जनतेच्या बँक खात्यामध्ये जमा होते. डी.बी.टी चा फायदा उचलण्यासाठी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला जोडणे अनिवार्य असते
डी.बी.टी चे उद्देश्य (Motive of DBT in Marathi)
भारत सरकार द्वारे डी.बी.टी संकल्पना आणण्या मागचे मुख्य उद्देश्य हे होते की ,“देशातील जनतेला योजने द्वारे मिळणारी विशिष्ट रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा व्हावी आणि योजनांच्या नावावर होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा.”
डी.बी.टी चा इतिहास (History of DBT in Marathi)
“डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर” म्हणजेच डी.बी.टी ही संकल्पना भारत सरकारकडून १ जानेवारी २०१३ पासून सुरू करण्यात आली होती. जेव्हा ही डी.बी.टी संकल्पना आणण्यात आली होती ,तेव्हा काहीच योजना या डी.बी.टी अंतर्गत येत होत्या ; परंतु वर्तमानात डी.बी.टी अंतर्गत ३१४ हून अधिक योजना येतात ,तसेच या डी.बी.टी अंतर्गत ५४ हून अधिक मंत्रालया सबंधित योजना येतात.
डी.बी.टी योजने अंतर्गत येणाऱ्या काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत :
१) प्रधानमंत्री जन धन योजना
२) प्रधानमंत्री आवास योजना
३) प्रधानमंत्री किसान सन्मान योजना
४) प्रधानमंत्री उज्वला योजना
डी.बी.टी मध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया (DBT account opening process in Marathi)
१) डी.बी.टी मध्ये खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य असते. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर , सर्वात आधी तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करा.
२) आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचा फॉर्म व्यवस्थित रित्या भरा.
३) बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचा फॉर्म भरल्यानंतर काही काळानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला यशस्वी रित्या लिंक होईल.
4) आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाल्यानंतर आपण सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ उचलू शकतो.
५) तुमच्या घराच्या आसपास पोस्ट ऑफिस असेल ,तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन देखील डी.बी.टी चे खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डी.बी.टी चे खाते उघडण्यासाठी तुम्हाला सोबत आधार कार्ड आणि ज्या मोबाईल नंबर ला तुमचे आधार कार्ड लिंक करायचे आहे ,तो नंबर घेऊन जावे लागेल.
आपला डी.बी.टी स्टेटस ला ऑनलाईन चेक करण्याची प्रक्रिया ( Process to Check Your DBT Status Online in Marathi)
१) तुम्हाला तुमचे डी.बी.टी स्टेटस चेक करण्यासाठी “पब्लिक फायनानशियल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS)” यांच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. “पब्लिक फायनानशियल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS)” ही भारत सरकारची डी.बी.टी सबंधित अधिकृत वेबसाईट आहे.
२) या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर “होम पेज” वर तुम्हाला “सर्व्हिसेस” नावाचा पर्याय दिसेल ,त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.
३) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला “डी.बी.टी पेमेंट ट्रॅकिंग” नावाचा पर्याय दिसेल ,त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.
४) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला विविध योजनांची लिस्ट दिसेल. तुम्हाला ज्या योजनेसाठी तुमचे डी.बी.टी चे स्टेटस चेक करायचे आहे , त्या योजेनेचे नाव तुम्ही त्या लिस्ट मध्ये चेक करा व त्या योजनेच्या नावावर तुम्ही क्लिक करा.
५) उदा : जर तुम्हाला “प्रधानमंत्री किसान सन्मान योजने” संबंधी आपले डी.बी.टी स्टेटस चेक करायचे असेल तर ,तुम्ही लिस्ट मध्ये “प्रधानमंत्री किसान सन्मान योजना” हे सर्च करा आणि त्या नावावर क्लिक करा.
६) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा योजना आयडी ची माहिती द्यावी लागेल. तुम्ही जेव्हा त्या योजनेसाठी निवेदन केले असेल ,तेव्हा तुम्हाला त्या योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आणि योजना आयडी मिळाली असेल. तो रजिस्ट्रेशन नंबर किंवा योजना आयडी तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.
७) नंतर एक कॅपचा येईल आणि तो कॅपचा व्यवस्थित रित्या भरल्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचे त्या योजने संबंधितचे स्टेटस दिसेल.
FAQ
डी.बी.टी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
डी.बी.टी चा फुल्ल फॉर्म “डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर” असा होतो.
भारत सरकारने कोणत्या वर्षी डी.बी.टी संकल्पना अमलात आणली होती ?
भारत सरकारने १ जानेवारी २०१३ पासून डी.बी.टी ही संकल्पना अमलात आणली होती. सुरवातीला देशातील ४३ जिल्ह्यामध्ये डी.बी.टी ही संकल्पना लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये संपूर्ण देशभरामध्ये डी.बी.टी ही संकल्पना लागू करण्यात आली होती.
वर्तमानात डी.बी.टी अंतर्गत किती योजना येतात ?
वर्तमानात डी.बी.टी अंतर्गत ३१४ हून अधिक योजना येतात ,तसेच डी.बी.टी अंतर्गत ५४ हून अधिक मंत्रालया संबंधी योजना येतात.
डी.बी.टी चा फायदा काय आहे ?
डी.बी.टी द्वारे सरकारच्या योजेनेची रक्कम जनतेच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते. जेणेकरून योजने मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले आहे.
डी.बी.टी स्टेटस चेक करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
डी.बी.टी स्टेटस चेक करण्यासाठी सरकारची अधिकृत वेबसाईट ही “https://pfms.nic.in/Home.aspx” आहे.
माझे आधार कार्ड माझ्या बँक खात्याला लिंक नाहीये ,तर मी डी.बी.टी अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो का ?
डी.बी.टी अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे गरजेचे असते. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर ,तुम्ही तुमच्या बँकेमध्ये किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करू शकता.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण डी.बी.टी चा फुल्ल फॉर्म पाहिला. तसेच आजच्या लेखामधून आपण डी.बी.टी चा इतिहास ,डी.बी.टी मध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया ,डी.बी.टी चे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रक्रिया ,डी.बी.टी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.