CWSN Full Form In Marathi आपल्या भारत देशामध्ये बरीच अशी मुले असतात ज्यांना ऐकू येत नाही ,ज्यांना चालता येत नाही ,ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही ,जे विकलांग आहेत. समाजामध्ये देखील अशा मुलांना कमीपणाचा दर्जा दिला जातो ; परंतु जसे आपण इतर मुलांकडे पाहतो ,तसेच आपण अशा विकलांग मुलांकडे देखील समदृष्टिने पाहिले पाहिजे.
सी.डब्ल्यू.एस.एन फुल फॉर्म CWSN Full Form In Marathi
आजच्या लेखामध्ये आपण याच सी.डब्ल्यू.एस.एन फुल्ल फॉर्म ,विकलांग मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी, सी.डब्ल्यू.एस.एन विषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.डब्ल्यू.एस.एन च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि सी.डब्ल्यू,एस.एन म्हणजे काय ? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
सी.डब्ल्यू.एस.एन फुल्ल फॉर्म (CWSN full form)
सी.डब्ल्यू.एस.एन चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्स” असा होतो. सी.डब्ल्यू.एस.एन चा मराठी अर्थ असा की ,“अशी मुले ज्यांना विशेष गोष्टींची आवश्यकता असते”. इतर मुले आणि विकलांग मुले एका शाळेमध्ये शिकत असली तर ,सामान्य मुलांपैकी काही मुले विकलांग मुलांची विनाकारण चेष्टा करतात.
त्यामुळे अशा परिस्थितीत विकलांग मुलांना अशा गोष्टींचा सामना करावा लागू नये म्हणून सी.डब्ल्यू.एस.एन अंतर्गत विकलांग मुलांना वेगळ्या शिक्षण प्रणाली अंतर्गत शिक्षण दिले जाते. तसेच विकलांग मुलांची वेगळी शाळा देखील असते.
सी.डब्ल्यू.एस.एन अनुसार विकलांग मुलांना त्यांच्या विकलांगतेनुसार विविध पद्धतीने शिकवले जाते आणि विकलांग मुलांचे करीयर सामान्य मुलांप्रमाणे सुरक्षित व्हावे यासाठी सरकारद्वारे प्रयत्न केले जातात. जे कोणी शिक्षक अशा विकलांग मुलांना शिकवण्याचे काम करतात ,त्या शिक्षकांना देखील विशेष शिक्षण दिले जाते. जे शिक्षक अशा विकलांग मुलांना शिकवण्याचे काम करतात ,त्यांनी स्पेशल बी.एड हा कोर्स केलेला असतो.
विकलांग मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या काही गोष्टी (Somethings that we can done for the development of disabled children in Marathi)
विकलांग मुलांच्या विकासासाठी आपण खालील गोष्टी केल्या पाहिजेत :
१) आपल्या आसपास जर कोणी विकलांग असेल तर ,त्या मुलाच्या विकलांग पणा मुळे त्याचे अगोदरच खच्चीकरण झालेले असते ,तर अशा वेळी जर आपण त्याला सतत विकलांग किंवा अपंग म्हणून हाक मारत असू ,तर याचा त्याच्यावर नकारात्मक परिणाम होईल आणि तो माणसामध्ये येण्यास घाबरेल. यावर उपाय म्हणून आपण आपल्या आसपास असणाऱ्या विकलांग मुलासोबत संवाद करताना ,अशा पद्धतीने संवाद केला पाहिजे की ,जेणेकरून त्याला वाटेल की ,“तो आपल्यातलाच सामान्य व्यक्ती आहे”.
२) आपण जर आपल्या आसपास असणाऱ्या विकलांग व्यक्तीच्या विकलांगपणावर हसत असू किंवा त्या विकलांग व्यक्तीची टिंगल टवाळणी करत असू ,तर आपण एक गोष्ट ध्येनात ठेवली पाहिजे की ,“ही संपूर्ण सृष्टी ही ईश्वराने बनवली आहे. जसे आपल्याला ईश्वराने बनवले आहे ,तसेच त्या विकलांग व्यक्तीला देखील ईश्वराने बनवले आहे ,तर मग आपण जेव्हा त्या विकलांग व्यक्तीची चेष्टा करत असतो तेव्हा आपण नकळत त्या विकलांग व्यक्तीला बनवलेल्या ईश्वराची चेष्टा करत असतो”.
२) विकलांग मुलांच्या शिक्षणामध्ये सुधार आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच विकलांग मुलांना भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी देखील सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.
३) आपल्या जर कुटुंबात कोणीतरी विकलांग असेल ,तर आपण त्याचे कौशल्य ओळखले पाहिजे आणि त्याचे ते कौशल्य कसे सुधारेल ? किंवा त्या कौशल्याचा फायदा त्याला कसा होईल ? ,यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
FAQ
सी.डब्ल्यू.एस.एन चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
सी.डब्ल्यू.एस.एन चा फुल्ल फॉर्म “चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीडस” असा होतो.
सी.डब्ल्यू.एस.एन मध्ये कोणकोणती मुले येतात ?
सी.डब्ल्यू.एस.एन मध्ये ज्या मुलांना ऐकता येत नाही ,ज्या मुलांना बोलता येत नाही ,ज्या मुलांना व्यवस्थित चालता येत नाही ,जे मुले अपंग असतात ,इत्यादी मुले येतात.
विकलांग व्यक्तीच्या विकासासाठी आपण समाजाच्या नात्याने कोणते प्रयत्न केले पाहिजेत ?
आपल्या आसपास जर कोणी विकलांग असेल ,तर आपण त्याला तो विकलांग आहे याची जाणीव करून दिली नाही पाहिजे. तसेच आपण त्याला तो आपल्या सारखा सामान्यच व्यक्ती आहे ,याची जाणीव करू दिली पाहिजे. याचोमसोबत आपल्या आसपास असणाऱ्या विकलांग व्यक्तीची आपण टिंगल टवाळणी केली नाही पाहिजे ,जेणेकरून त्याचे खच्चीकरण होऊ नये.
विकलांग व्यक्तीच्या विकासासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले पाहिजेत ?
विकलांग मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच विकलांग मुलांच्या कौशल्य गुणांना ओळखून त्यांना त्यांच्या कौशल्याचा कसा फायदा होईल ? यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. याचोसबत विकलांग मुलांचे करीयर कशा पद्धतीने सुरक्षित करता येईल ? यासाठी देखील सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.
सी.डब्ल्यू.एस.एन द्वारे विकलांग मुलांना शिकवण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो ?
सी.डब्ल्यू.एस.एन द्वारे विकलांग मुलांना शिकवण्यासाठी स्पेशल बी.एड कोर्स करावा लागतो.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण विकलांग मुलांसंबंधी असणाऱ्या सी.डब्ल्यू.एस.एन विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.डब्ल्यू.एस.एन फुल्ल फॉर्म ,विकलांग मुलांच्या प्रगतीसाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी, सी.डब्ल्यू.एस.एन विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.
संदर्भ (References)
१)https://leverageedu.com/blog/hi/cwsn-full-form-in-hindi/
२)https://dmut.in/cwsn-full-form-in-hindi/