CV Full Form In Marathi मित्रांनो आज आपण इथे पाहणार आहोत सीव्ही म्हणजे काय? सीव्ही चा वापर कुठे केला जातो आणि कशासाठी केला जातो? सीव्ही महत्त्वाचा का आहेत? याप्रकारे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा.
सीव्ही फुल फॉर्म CV Full Form In Marathi
CV Long Form in Marathi | CV Full Form in Marathi
CV या शब्दाचा अर्थ म्हणजेच CV Long Form हा Curriculum Vitae असा आहे. नोकरीला अर्ज करण्यासाठी तुमच्या बद्दल ची माहिती शैक्षणिक माहिती हे सर्व ज्या तपशीलात असते त्याला CV म्हणतात.
CV म्हणजे काय? | CV Meaning in Marathi
तुम्ही जेव्हा नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्या बद्दल नोकरीसाठी आवश्यक आणि निगडित असलेली सर्व माहिती ज्या कागदपत्रात दिली जाते त्यास CV असे म्हणतात. CV मध्ये तुमची शैक्षणिक वैयक्तिक आणि कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दलचे सर्व माहिती नमूद केलेले असते असते.
CV हा तुमचा व्यावसायिक आणि शैक्षणिक इतिहास अधोरेखित करणारे कागदपत्र आहे. CV मध्ये सामान्यत: कामाचा अनुभव, यश, प्राप्त झालेले पुरस्कार, मिळालेली बक्षिसे, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती किंवा तुम्ही मिळवलेले अनुदान, अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प आणि ज्या प्रकल्पांवर काम केले त्याबद्दल माहिती आणि तुमच्या कामाची प्रकाशने यासारखी माहिती समाविष्ट असते. शैक्षणिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी किंवा भारताबाहेर नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला CV जमा करण्यास सांगितले जाऊ शकते.
तुम्हाला CV कसा लिहायचा हे ठरवण्यासाठी मदत हवी असल्यास, टेम्पलेटचा म्हणजेच CV साठी असलेला नमुना यातून कल्पना घेणे उपयुक्त ठरू शकते. CV नमुना हा CV कसा असावा याची पार्श्वभूमी देऊ शकतो. ज्याचे अनुसरण करून तुम्ही तुमचा CV बनवू शकता. Template म्हणजेच नमुना हे तूम्ही एक परिपूर्ण आणि व्यवस्थित CV बनवला आहे याची खात्री देऊ शकते.
CV आणि Resume (रेझ्युमे) मधील फरक | Difference between CV and Resume
CV ला काही ठिकाणी Resume (रेझ्युमे) असे म्हटले जाऊ शकते. पण खरतर Resume आणि CV हे वेगळे आहेत. काही ठिकाणी ते सारखे मानले जाऊ शकते आणि काही प्रमाणात ते समान असतातही पण त्यात काही फरकही आहे. ते काही प्रमाणात सारखेच आहेत कारण ते दोन्ही दस्तऐवज आहेत जे तुमचा व्यावसायिक इतिहास, शिक्षण, कौशल्ये आणि यशाचा सारांश देतात.
- Resume एक लहान स्वरूपाचा दस्तऐवज आहे जो तुमच्या मागील भूमिका, कौशल्ये आणि तुमच्या शिक्षणाविषयीचे तपशील यांचे हे थोडक्यात सांगतो. यामध्ये सविस्तर महिती असेलच असे नाही. फ्रेंच शब्द रेझ्युमेचा अनुवाद “सारांश” असा होतो.
- दुसरीकडे, CV हा सामान्यतः शैक्षणिक महिती म्हणजेच घेतलेले शिक्षण, त्याविषयी माहिती आणि केलेले संशोधन किंवा प्रकल्प यावर आधारित असलेला एक मोठा, अधिक सविस्तर असतो.
CV कसा लिहायचा? | How to Write CV
कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना CV ही सगळ्यात पहिली पायरी असते आणि ही सगळ्यात महत्त्वाची पायरी असते. CV हे तुमचे एक प्रकारचे first impression म्हणजेच पहिली छाप असते. CV मधील सर्व माहिती ही बरोबर भरणे गरजेचे असते.
तूम्ही नविन असाल तर CV मधे काय लिहावे हे कळत नसेल. या लेखात आपण त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.
CV लिहिण्यासाठी तुम्ही नमुन्याची मदत घेऊ शकता. हे नमुने म्हणजेच CV templates तुम्हाला ऑनलाईन सहजरीत्या मिळून जातील. आपण खाली काही मुद्दे बघुया जे CV मध्ये असणे आवश्यक असते :
1. वैयक्तिक माहिती (Personal Information) –
CV मधे वैयक्तिक माहिती देणे गरजेचे असते. यात फोन नंबर, ईमेल आयडी, पत्ता हया गोष्टी नमूद कराव्यात. खात्री करा की सर्व माहिती बरोबर आहे. जन्मतारीख, फोटो हया गोष्टी असाव्यात असे नाही. आवश्यक नसलेल्या गोष्टी टाळाव्यात.
2. शिक्षण (Education) –
तुम्ही घेतलेले सर्व शिक्षण लिहावे. 10 वी/ 12 वी ते पदवी आणि त्यापुढील काही शिक्षण घेतले असेल ते सर्व नमूद करावे. यात तुमच्या व्यावसायिक पात्रता आणि शिक्षणही येते. घेतलेल्या शिक्षणाची यादी करावी आणि सर्वात आत्ताचे शिक्षण हे प्रथम लिहावे.
3. व्यवसायिक अनुभव (Work Experience) –
तुम्ही आता ज्या कामासाठी अर्ज करत आहात त्या क्षेत्रात जो काही अनुभव घेतला आहे तो सर्व नोंद करावा. जो सर्वात आताचा अनुभव वा केलेले काम आहे ते प्रथम लिहावे. यात काम केलेल्या काम केले ते पद, कंपनीचे किंवा संस्थेचे नाव, किती वर्ष काम केले ते आणि पदावर असताना असलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या, हे सर्व नमूद करावे.
टीप: जर तुमचा कामाचा अनुभव जास्त असेल तर नुभव हा शिक्षणाच्या अगोदर लिहावा.
4. Profile –
प्रोफाइल हा विभाग तुमची विशेषता आणि तुम्ही ह्या पदासाठी आणि कामासाठी का चांगले आहात हे दाखवण्यासाठी असते. यात तुमच्यातील उपयुक्त कौशल हे थोड्याशा शब्दांत सांगायचे असते.
5. Achievements and Skills (कौशल्ये आणि संपादन केले यश) –
या भागात तुम्ही कामाच्या निगडित अगोदर जे काही यश मिळवले आहे, ज्या काही प्रकल्पावर काम केले आहे आणि अजून जे काही इतर गोष्टीतील यश आहे ते सर्व नमूद करू शकता. फक्त काळजी एवढीच घ्या हे सर्व कामाशी निगडित असावे.
6. आवड आणि छंद (Interests and Hobbies) –
इथे तूम्ही तुमची आवड आणि छंद मांडू शकता. हे मुलाखतीत बोलण्यासाठी एक चांगला विषय बनू शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात भरही टाकू शकतो.
काही कंपन्या आणि Employers त्यांचा असा विशिष्ट CV नमुना देऊ शकता. अशावेळी खात्रीने त्यांनी नमुद केलेली सर्व माहिती भरा. काहीवेळा फक्त त्यांना आवश्यक असेल तेवढीच माहिती विचारली अशावेळी देखील त्यांनी विचारलेली सर्व पण नेमकी माहिती देणे गरजेचे असते.
CV लिहिताना काय काळजी घ्यावी? | What shouldn’t be done while writing a CV? –
तुम्ही रेझ्युमे लिहिण्याचा सराव करत असल्यास किंवा बनवत असल्यास, तुम्हाला तुमचा सी एका पानावर मावेल एवढा लहान करण्याचा मोह होऊ शकतो. खरंतर, CV ला खूप माहिती आवश्यक असल्यामुळे, त्यात संपूर्ण माहिती सांगण्याची गरज असल्यामुळे ते सामान्यत: एकापेक्षा जास्त पानांच्या लांबीची असतात. म्हणजेच त्यात संपूर्ण माहिती विस्तारीत स्वरूपात असावी असे अपेक्षित असते. यामुळे जागा वाचवण्यासाठी किंवा उगाच जास्त मोठा नको अशा कारणांमुळे महत्वाचा तपशील कापू नका.
तुमचा नोकरी अर्ज जमा करण्यापूर्वी, कुठ्ल्याही चुका, किंवा काही विसंगती आहे का हे एकदा तपासून बघा. विश्वासू सहकारी किंवा कोणी अनुभवी व्यक्तीकडून सल्लाही घेऊ शकता. याप्रकारे आपण CV बद्दल सर्व माहिती बघितली आहे.
FAQs – Frequently Asked Questions
नोकरीसाठी सीव्ही म्हणजे काय?
CV हा एक दस्तऐवज आहे जो नोकरीसाठी अर्ज करताना वापरला जातो. हे तुम्हाला तुमचे शिक्षण, कौशल्ये आणि अनुभव सारांशित करण्यास अनुमती देते ज्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता संभाव्य नियोक्त्यांना यशस्वीपणे विकता येते.
बायोडेटामध्ये सीव्ही म्हणजे काय?
CURRICULUM VITAE (C.V.) हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ "जीवनाचा अभ्यासक्रम" असा होतो. • Curriculum Vitae (C.V.) हा शिक्षण आणि जीवनाशी संबंधित अभ्यासाचा नियमित किंवा विशिष्ट अभ्यासक्रम आहे. C.V. रेझ्युमे पेक्षा अधिक तपशीलवार आहे, सामान्यतः 2 ते 3 पृष्ठे, परंतु आवश्यकतेनुसार ते अधिक काळ चालू शकते.