सी.यु.ई.टी फुल फॉर्म CUET Full Form In Marathi

CUET Full Form In Marathi सी.यु.ई.टी ही एक प्रवेश परीक्षा आहे आणि ही प्रवेश परीक्षा विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी घेतली जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच सी.यु.ई.टी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.यु.ई.टी च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.यु.ई.टी फुल्ल फॉर्म आणि सी.यु.ई.टी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

CUET Full Form In Marathi

सी.यु.ई.टी फुल फॉर्म CUET Full Form In Marathi

सी.यु.ई.टी फुल्ल फॉर्म (CUET full form)

सी.यु.ई.टी चा फुल्ल फॉर्म “कॉमन युनिव्हर्सिटी इंट्रान्स टेस्ट” असा होतो. सी.यु.ई.टी ही एक प्रवेश परीक्षा आहे आणि या सी.यु.ई.टी परिक्षेद्वारे २५० पेक्षा अधिक विद्यापीठाचे ऍडमिशन केले जाते. या २५० हून अधिक विद्यापीठामध्ये केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ ,तसेच डीमड विद्यापीठ, इत्यादी विद्यापीठांचा समावेश असतो.

दरवर्षी सी.यु.ई.टी परीक्षेसाठी देशभरातून १४ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी निवेदन करतात. यावर्षीची म्हणजे २०२४ ची सी.यु.ई.टी ची परीक्षा ही १५ मे ते ३१ मे च्या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तसेच सी.यु.ई.टी ची परीक्षा ही देशभरामध्ये ५०० हून अधिक परीक्षा केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.  

सी.यु.ई.टी परीक्षा पॅटर्न (CUET exam pattern in Marathi)

सी.यु.ई.टी परीक्षा ही एनटीए म्हणजे “नॅशनल टेस्टिंग एजंसी” द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. २०२४ मध्ये होणारी सी.यु.ई.टी ची परीक्षा ही ३ तासाची कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. सी.यु.ई.टी परीक्षेमध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ५ गुण असणार आहे  ,तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणातून एक गुण कमी होणार आहे.

सी.यु.ई.टी परीक्षेसाठी असणारी निकष पात्रता (Eligibility criteria for CUET exam in Marathi)

१) सी.यु.ई.टी च्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.

२) सी.यु.ई.टी च्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. उमेदवार जर १२ वी इयत्तेत असेल तर तो सी.यु.ई.टी ची परीक्षा देऊ शकतो ; परंतु सी.यु.ई.टी द्वारे विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी तो उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण झाला पाहिजे.

३) सी.यु.ई.टी ची परीक्षा देण्यासाठी कोणतीही आयुसीमा नाही ; परंतु उमेदवाराला ज्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल ,तर त्या उमेदवाराला त्या विद्यापीठाच्या आयुसीमेमध्ये बसावे लागेल. 

सी.यु.ई.टी परीक्षेचा निवेदन फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया (process of online application form of CUET exam in Marathi)

१) सी.यु.ई.टी च्या परीक्षेचा निवेदन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सी.यु.ई.टी च्या “cuet.nta.nic.in” या वेबसाईटला भेट द्या.

२) त्यानंतर तुम्ही पुढच्या पेज वर ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करा.

३) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला सी.यु.ई.टी चा निवेदन फॉर्म दिसेल. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती विचारली जाईल ,ती माहिती तुम्ही व्यवस्थित रित्या भरा. तसेच तुम्हाला निवेदन फॉर्म मध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.

४) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला सी.यु.ई.टी परीक्षेची फी भरावी लागेल. ती फी तुम्ही युपीआई , नेट बँकिंग द्वारे भरा.

५) तुमचा सी.यु.ई.टी परीक्षेचा निवेदन फॉर्म यशस्वी रित्या सबमिट होईल.

FAQ

सी.यु.ई.टी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

सी.यु.ई.टी चा फुल्ल फॉर्म “कॉमन युनिव्हर्सिटी इंट्रान्स टेस्ट” असा आहे.

सी.यु.ई.टी ची परीक्षा कोणाद्वारे आयोजित केली जाते ?

दरवर्षी सी.यु.ई.टी ची परीक्षा ही “नॅशनल टेस्टिंग एजंसी (एनटीए)” द्वारे आयोजित केली जाते.

सी.यु.ई.टी परीक्षेचे पूर्वीचे नाव काय होते ?

सी.यु.ई.टी परीक्षेचे पूर्वीचे नाव “सेंट्रल यूनिवर्सिटीज कॉमन इंट्रान्स टेस्ट” असे होते. २०२१ मध्ये युजीसी द्वारे या परीक्षेचे नाव बदलून “कॉमन युनिव्हर्सिटी इंट्रान्स टेस्ट” असे करण्यात आले होते.

सी.यु.ई.टी परीक्षेसाठी पात्रता निकष काय असतो ?

सी.यु.ई.टी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच सी.यु.ई.टी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असला पाहिजे. सी.यु.ई.टी परीक्षेसाठी कोणतीही आयुसीमा नसते.

२०२४ मध्ये सी.यु.ई.टी ची परीक्षा केव्हा घेतली जाणार आहे ?

२०२४ मधील सी.यु.ई.टी ची परीक्षा ही १५ मे ते ३१ मे दरम्यान देशातील ५०० हून अधिक परीक्षा केंद्रामध्ये आयोजित केली जाणार आहे.

सी.यु.ई.टी ची परीक्षा किती विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आयोजित केली जाते ?

सी.यु.ई.टी ची परीक्षा ही २५० हून अधिक विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आयोजित केली जाते.

सी.यु.ई.टी ची परीक्षा एका वर्षामध्ये कितीवेळा आयोजित केली जाते ?

दरवर्षी “नॅशनल टेस्टिंग एजंसी” द्वारे सी.यु.ई.टी ची परीक्षा एकाच वेळा आयोजित केली जाते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सी.यु.ई.टी परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.यु.ई.टी फुल्ल फॉर्म ,सी.यु.ई.टी परीक्षा पॅटर्न, सी.यु.ई.टी परीक्षेसाठी असणारी निकष पात्रता, सी.यु.ई.टी परीक्षेचा निवेदन फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया, सी.यु.ई.टी परीक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE

२)https://www.google.com/amp/s/www.aajtak.in/amp/education/admission/story/cuet-ug-2023-exam-city-slip-out-on-this-date-check-complete-nta-schedule-here-1675291-2023-04-15

३)https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/education/cuet-ug-2023-phase-6-examinations-dates-released-check-schedule-at-nta-ac-in-2023-06-09

४)https://navbharattimes.indiatimes.com/education/admission-alert/cuet-ug-2023-exam-date-extended-see-here-revised-schedule-cuet-samarth-ac-in/amp_articleshow/100292897.cms

५)https://university.careers360.com/hi/articles/cuet

Leave a Comment