COPD Full Form In Marathi आजच्या लेखामध्ये आपण फुफ्फुसासंबंधी असणाऱ्या एका आजारा विषयी माहिती पाहणार आहोत. आजच्या लेखामधून आपण सी.ओ.पी.डी आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.ओ.पी.डी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.ओ.पी.डी चा फुल्ल फॉर्म आणि सी.ओ.पी.डी आजाराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
सी.ओ.पी.डी फुल फॉर्म COPD Full Form In Marathi
सी.ओ.पी.डी फुल्ल फॉर्म (COPD full form)
सी.ओ.पी.डी चा फुल्ल फॉर्म “क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव प्लोंनरी डिसिज” असा होतो. सी.ओ.पी.डी हा फुप्फुसासंबंधी असणारा एक आजार आहे. जर सी.ओ.पी.डी आजारावर लवकर औषधी उपचार झाले नाही तर ,तो आजार गंभीर रूप धारण करू शकतो.
सी.ओ.पी.डी आजारावर लवकर उपचार झाले नसलेल्या व्यक्तीस फुफ्फुसांचा कॅन्सर सारखा भयानक आजार होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये सी.ओ.पी.डी आजाराची लक्षणे जाणवू लागली तर ,आपण त्वरित डॉक्टरांकडे गेलो पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सी.ओ.पी.डी आजारावर त्वरित उपचार केले पाहिजेत. सी.ओ.पी.डी आजार झालेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार केले तर ,त्याला झालेला सी.ओ.पी.डी आजार बरा होऊ शकतो.
सी.ओ.पी.डी आजाराची कारणे (Causes of COPD disease in Marathi)
१) जे व्यक्ती धूम्रपान करतात ,तंबाखूचे सेवन करतात ,त्या व्यक्तीस सी.ओ.पी.डी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
२) आपल्या आसपास सतत कोणीतरी धूम्रपान चे सेवन करत असेल तर ,आपल्याला देखील सी.ओ.पी.डी आजार होऊ शकतो. त्यामुळे आपण धूम्रपान चे सेवन केले नाही पाहिजे आणि जर आपल्याला धूम्रपानचे सेवन करण्याची सवय असेल तर ,आपण धूम्रपान अशा ठिकाणी केले पाहिजे ,जिथे आपल्या धूम्रपान केल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे.
३) जे व्यक्ती धुळीच्या ठिकाणी काम करतात ,त्यांना सी.ओ.पी.डी आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जे व्यक्ती केमिकल कंपनीमध्ये काम करतात ,त्या व्यक्तींना देखील सी.ओ.पी.डी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
४) वाढत्या वयासोबत आपल्या शरीरातील फुफ्फुस कमकुवत होत जाते. त्यामुळे वृध्द व्यक्तीस देखील सी.ओ.पी.डी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
सी.ओ.पी.डी आजाराची लक्षणे (Symptoms of COPD disease in Marathi)
सी.ओ.पी.डी आजाराची लक्षणे ही वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात ; परंतु सी.ओ.पी.डी आजाराची काही सामायिक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
१) श्वास घेताना त्रास होणे
२) शरीराच्या इतर अवयवांमध्ये सूज येणे
३) वजन कमी होणे
४) सतत छातीत दुखणे
५) सतत थकवा येणे
सी.ओ.पी.डी आजारावर केले जाणारे उपचार (Treatment of COPD disease in Marathi)
आपल्याला जर सी.ओ.पी.डी आजाराची लक्षणे जाणवू लागली तर ,आपण त्वरित दवाखान्यात गेले पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सी.ओ.पी.डी आजारावर उपचार केले पाहिजेत. सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी डॉक्टर खूप वेळा एंटीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. तसेच काही केसेस मध्ये सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी त्या पेशंट ची सर्जरी देखील केली जाते.
सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना (Measures taken to cure COPD disease in Marathi)
१) सी.ओ.पी.डी हा आजार जास्त करून धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीस होतो. आपल्याला जर सी.ओ.पी.डी आजार झाला असेल आणि आपण धूम्रपान करत असू ,तर आपण धूम्रपान चे सेवन करणे बंद केले पाहिजे.
२) आपल्याला जर सी.ओ.पी.डी आजार झाला असेल तर ,आपण सकाळी लवकर उठून बाहेर गार्डन मध्ये चालायला गेले पाहिजे. सकाळची हवा स्वच्छ व ताजी असते ,आपण जर सकाळची स्वच्छ व ताजी हवा आपल्या शरीरामध्ये घेतली ,तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल.
३) सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी आपण नियमित व्यायाम आणि योग केला पाहिजे. नियमित व्यायामाने आपण शारिरीक दृष्ट्या मजबूत बनतो. तसेच मानसिक दृष्ट्या मजबूत बनण्यासाठी आपण वेळ मिळेल तेव्हा मेडिटेशन केले पाहिजे.
४) सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी आपण निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. तसेच आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने एक डाएट प्लॅन तयार केला पाहिजे आणि त्या डाएट प्लॅन नुसार आपण भोजन घेतले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये डाळींचा ,हिरव्या पालेभाज्यांचा, दुधाचा समावेश केला पाहिजे. तसेच आपण दिवसामध्ये एक तरी फळ खाल्ले पाहिजे.
FAQ
सी.ओ.पी.डी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
सी.ओ.पी.डी चा फुल्ल फॉर्म “क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव प्लोंनरी डिसिज” असा होतो.
सी.ओ.पी.डी आजार हा कोणत्या अवयवासंबंधी असणारा आजार आहे ?
सी.ओ.पी.डी आजार हा फुफ्फुसा संबंधी असणारा आजार आहे.
सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ?
सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी आपण जर धूम्रपान चे सेवन करत असू ,तर ते धूम्रपान चे सेवन करणे आपण बंद केले पाहिजे. तसेच आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. याचसोबत आपण निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण सी.ओ.पी.डी आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.ओ.पी.डी फुल्ल फॉर्म, सी.ओ.पी.डी आजार होण्याची कारणे, सी.ओ.पी.डी आजाराची लक्षणे, सी.ओ.पी.डी आजारावर केले जाणारे उपचार, सी.ओ.पी.डी आजार बरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, सी.ओ.पी.डी आजारा विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.