Computer Full Form In Marathi आजच्या काळामध्ये खूप कमी लोक असतील ,ज्यांना कॉम्प्युटर विषयी माहिती माहीत नसेल. आजच्या या डिजिटल युगामध्ये बऱ्यापैकी सर्वांना कॉम्प्युटर विषयी माहिती माहीत असेल, तसेच खूप लोकांना कॉम्प्युटर चा वापर करता येत असेल. तुम्हाला कॉम्प्युटर विषयी माहिती माहीत आहे ; परंतु तुम्हाला कॉम्प्युटर शब्दाचा फुल्ल फॉर्म माहीत आहे का ? ,आजच्या लेखामध्ये आपण कॉम्प्युटर च्या फुल्ल फॉर्म विषयी माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण कॉम्प्युटर संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे कॉम्प्युटर चा फुल्ल फॉर्म आणि कॉम्प्युटर विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कॉम्प्युटर फुल फॉर्म Computer Full Form In Marathi
कॉम्प्युटर चा फुल्ल फॉर्म (Computer Full form)
कॉम्प्युटर चा फुल्ल फॉर्म हा “कॉमन ऑपरेटिंग मशीन परपोजली युजड फॉर टेक्नॉलॉजीकल अँड एज्युकेशनल रिसर्च” असा होतो. कॉम्प्युटर ला मराठी भाषेमध्ये “संगणक” असे म्हणतात. १९६७ मध्ये “विद्युत आणि इलेक्टरॉनिक अभियांत्रिकी संस्थान” यांनी कॉम्प्युटर ला कॉम्प्युटर असे नाव दिले होते.
जेव्हा कॉम्प्युटर ची निर्मिती करण्यात आली होती ,तेव्हा कॉम्प्युटर चा वापर फक्त संशोधन आणि सैन्याच्या कामासाठी केला जात होता ; परंतु बदलत्या काळासोबत कॉम्प्युटर चा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये करण्यात येऊ लागला. वर्तमानात असे कोणतेही क्षेत्र नाही , ज्या क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर चा वापर होत नाही.
कॉम्प्युटर चे महत्व (Importance of Computer in Marathi)
कॉम्प्युटर ची निर्मिती होण्याअगोदर मानवाला रिसर्च करणे ,तसेच विविध कामे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती ,तसेच या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ देखील जात होता; परंतु जेव्हापासून कॉम्प्युटर ची निर्मिती झाली ,तेव्हापासून मानवाचे काम हलके झाले. आज आपण बऱ्यापैकी सर्व कामे कॉम्प्युटर वर करू शकतो.
आपल्याला एखादे पुस्तक खरेदी करायचे आहे ,तर आपण कॉम्प्युटर वर आपल्याला हव्या त्या पुस्तकाची ऑनलाईन खरेदी करू शकतो. तसेच आपल्या काही गोष्टींचे संशोधन करायचे आहे ,तर आपण कॉम्प्युटर वर गूगल ब्राउजर च्या मदतीने आपल्याला हव्या त्या गोष्टींचे संशोधन करू शकतो.
आपल्याला जर ऑनलाईन गेम्स खेळायच्या असतील तर ,आपण कॉम्प्युटर वर आपल्याला हवी ती गेम डाऊनलोड करून ती गेम ऑनलाईन रित्या आपण खेळू शकतो. वर्तमानात सगळ्याच क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर चा वापर केला जात आहे ,तसेच आपण आपले काम हलके करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी देखील कॉम्प्युटर ची मदत घेऊ शकतो.
कॉम्प्युटर चे मुख्य भाग (Two important parts of Computer in Marathi )
सामान्यतः कॉम्प्युटर चे दोन भाग पडतात. चला तर मग आता आपण कॉम्प्युटर च्या दोन मुख्य भागा विषयी म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
१) सॉफ्टवेअर – कॉम्प्युटर च्या सॉफ्टवेअर भागामध्ये विंडोज ,लिनक्स , मॅक ओएस यांचा समावेश होतो. या सॉफ्टवेअर गोष्टी कॉम्प्युटर मध्ये समाविष्ट असतात आणि विशिष्ट कमांड चा वापर करून आपण या सॉफ्टवेअर गोष्टीच्या मदतीने कॉम्प्युटर स्क्रीन वर आपल्याला हवी ती कृती करू शकतो.
२) हार्डवेअर – कॉम्प्युटर च्या या भागामध्ये कॉम्प्युटर च्या बाहेरील गोष्टींचा समावेश असतो आणि आपण कॉम्प्युटर चालवण्यासाठी या हार्डवेअर गोष्टींचा वापर आपण करतो. कॉम्प्युटर च्या या हार्डवेअर मध्ये माऊस ,कीबोर्ड , सीपीयु ,हार्ड डिस्क ,मदर बोर्ड ,पॉवर सप्लाय ,इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. माऊस च्या मदतीने आपण कॉम्प्युटर च्या स्क्रीन वरील ॲप्स उघडू शकतो किंवा बंद करू शकतो ,तसेच कीबोर्ड च्या मदतीने आपण कॉम्प्युटर च्या स्क्रीन वर टायपिंग करून आपल्याला हवी ती क्रिया करू शकतो.
कॉम्प्युटर च्या काही विशेषतः (Some Special things about Computers in Marathi)
तसे पाहायला गेले तर ,कॉम्प्युटर च्या भरपूर विशेषतः आहेत ; परंतु त्यातील काही प्रमुख विशेषतः खालीलप्रमाणे :
१) कॉम्प्युटर खूप वेगाने काम करू शकतो. कॉम्प्युटर चा वेग हा हर्ट्झ मध्ये मोजला जातो. वर्तमानात जे नवनवीन कॉम्प्युटर मार्केट मध्ये येत आहेत ,त्यांचा काम करण्याच्या वेग हा गीगा हर्ट्झ मध्ये मोजला जातो ; म्हणजे या नवीन कॉम्प्युटर वर आपण कोणतेही काम कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकतो.
२) आपण मानव एखादे काम करत असू ,तर ते काम करताना त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडून खूप चुका होतात ; परंतु तेच काम जर आपण कॉम्प्युटर वरती करायला बसलो ,तर कॉम्पुटर कडून ते काम करताना होणाऱ्या चुका होण्याची शक्यता खूप कमी असते. तसेच कॉम्प्युटर वर ते काम आपण खूप कमी वेळामध्ये पूर्ण करू शकतो.
३) कॉम्प्युटर वर आपण विविध गोष्टी करू शकतो. आपल्या जर बातम्या वाचायच्या आहेत किंवा ऐकायच्या आहेत ,तर कॉम्प्युटर वर आपण बातम्या वाचू किंवा ऐकू शकतो. तसेच आपल्याला जर कॉम्प्युटर वर मनोरंजनाचे व्हिडिओज पाहायचे आहेत ,तर ते देखील आपण कॉम्प्युटर वर पाहू शकतो. जर आपण एखाद्या कंपनी मध्ये काम करत असू आणि आपल्याला त्वरित प्रेझेंटेशन बनवायचे आहे ,तर कॉम्प्युटर च्या मदतीने आपण त्वरित आणि चांगले प्रेझेंटेशन देखील तयार करू शकतो.
बदलत्या काळासोबत कॉम्प्युटर मध्ये होणारे बदल (Changes in computers over time in Marathi)
बदलत्या काळासोबत कॉम्प्युटर मध्ये देखील वेळोवेळी हवे ते बदल करण्यात आले आहेत आणि आजही मानवाच्या गरजेनुसार कॉम्प्युटर मध्ये चांगले बदल होत आहेत. कॉम्प्युटर आपण सोबत न्हेऊ शकत नाही , म्हणजे ज्या ठिकाणी आपण कॉम्प्युटर ठेवला आहे ,त्या ठिकाणावरून सहजासहजी आपल्याला कॉम्प्युटर हलवता येत नाही ; या समस्येचे समाधान म्हणून मानवाने लॅपटॉप ची निर्मिती केली.
लॅपटॉप आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. तसेच कॉम्प्युटर मध्ये स्वतंत्र सीपीयु ,कीबोर्ड असतो ; परंतु लॅपटॉप मध्ये कीबोर्ड हा स्वतंत्र नसतो ,त्यामुळे लॅपटॉप ला कॉम्प्युटर च्या मानाने खूप कमी जागा लागते. लॅपटॉप हे कॉम्प्युटर चेच आधुनिक वर्जन आहे आणि मानवाच्या बदलत्या गजरेनुसार कॉम्प्युटर मध्ये देखील दिवसेंदिवस बदल होत आहेत.
FAQ
कॉम्प्युटर चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
कॉम्प्युटर चा फुल्ल फॉर्म “कॉमन ऑपरेटिंग मशीन परपोजली युजड फॉर टेक्नॉलॉजीकल अँड एज्युकेशनल रिसर्च” असा होतो.
कॉम्प्युटर ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ?
कॉम्प्युटर ला मराठी भाषेमध्ये “संगणक” असे म्हणतात.
कॉम्प्युटर ला कॉम्प्युटर हे नाव कोणी दिले होते ?
१९६७ मध्ये “विद्युत आणि इलेक्टरॉनिक अभियांत्रिकी संस्थान” ने कॉम्प्युटर ला कॉम्प्युटर हे नाव दिले होते.
प्रामुख्याने कॉम्प्युटर चे दोन मुख्य भाग कोणते आहेत ?
प्रामुख्याने कॉम्प्युटर चे दोन भाग पडतात. हे दोन मुख्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. कॉम्प्युटर च्या सॉफ्टवेअर भागामध्ये विंडोज ,लिनक्स ,मॅक ओएस,इत्यादींचा समावेश असतो ,तर कॉम्प्युटर च्या हार्डवेअर भागामध्ये कीबोर्ड ,माऊस ,मदर बोर्ड ,हार्ड डिस्क, सीपीयू ,इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
मला नवीन कॉम्प्युटर खरेदी करायचा आहे ? तर साधारण मला किती रुपये किमती मध्ये नवीन कॉम्प्युटर खरेदी करता येईल ?
कॉम्प्युटर ची किंमत ही त्याच्या परफॉर्मन्स वरती आधारित असते ; तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य तो कॉम्प्युटर खरेदी करू शकतो. साधारण कॉम्प्युटर ची किंमत ही वीस हजार ते एक लाख पर्यंत असते. काही कॉम्प्युटर ची किंमत ही वीस हजार पेक्षा कमी देखील असते ,तर काही कॉम्प्युटर ची किंमत ही १ लाख पेक्षा जास्त देखील असते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य तो कॉम्प्युटर खरेदी करा.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण कॉम्प्युटर विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण कॉम्पुटर चा फुल्ल फॉर्म, कॉम्प्युटर चे महत्व ,कॉम्पुटर चे मुख्य भाग , कॉम्प्युटर च्या विशेषतः, बदलत्या काळासोबत कॉम्प्युटर मध्ये होणारे बदल ,कॉम्पुटर विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती पाहिली.