सीआयडी फुल फॉर्म CID Full Form In Marathi

CID Full Form In Marathi दया दरवाजा तोड दो आणि कुछ तो गडबड है हे काही CID सिरीयल मधील डायलॉग आपल्याला नक्कीच माहिती असतील. याशिवाय सध्या राजकारणात CID, ED सारख्या संस्था अनेकदा वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या समोर आले असतील. आज CID म्हणजे काय, CID चा फुल फॉर्म काय आहे, CID ऑफिसर कसे बनतात, CID ऑफिसर साठी वयोमर्यादा, शारीरिक पात्रता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

CID Full Form In Marathi

सीआयडी फुल फॉर्म CID Full Form In Marathi

CID Full Form in Marathi । CID Long Form in Marathi

तुम्ही जर CID ही मालिका बघत असाल तर तुम्हाला CID चा फुल फॉर्म त्या सिरियलच्या लोगो मध्ये दिसला असेल. CID शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Crime investigation Department (क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट) असा होतो. CID शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा गुन्हे अन्वेषण विभाग असा आहे.

CID म्हणजे काय? – What is CID in Marathi?

राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र संस्था कार्यरत असते तिला सीआयडी म्हणून ओळखतात. राज्य स्तरावर गुन्हे चौकशी मग यामध्ये हत्या, चोरी, भ्रष्टाचार आणि दंगा ही CID संस्थेच्या मार्फत करता येते.

पोलिसांकडून एखाद्या चौकशीला CID कडे तेव्हाच सुपूर्त केले जाते जेवहा त्या गुन्ह्याची गांभीर्यता जास्त तीव्र असते. शक्यतो हा CID विभाग प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र असतो. त्यांचे कार्य हे पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांच्या एकत्रीकरण करून चालते. CID ऑफिसर हे आपल्याला युनिफॉर्म मध्ये कमी आणि गुप्तचर यंत्रणे प्रमाणे साध्या वेशात जास्त वेळा बघायला मिळतात.

राज्य सरकार एका कालावधी नंतर किंवा एखाद्या प्रतिष्ठेच्या गुन्ह्यांना CID या तपास यंत्रणेकडे देत असते. CID चे मुख्यालय हे पुणे येथे आहे. कधी या CID चा ताबा हा राज्य सरकारकडे तर कधी काही कारणास्तव उच्च न्यायालयाकडे दिला जातो.

CID चा इतिहास – History of CID

1902 साली म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळात CID या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि पुढे स्वातंत्र्योत्तर काळात यालाच सुरू ठेवण्यात आले.त्याकाळी असलेल्या पोलीस आयोगाच्या शिफारशी नुसार ही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली होती.

CID ची स्थापना करण्याविषयी जी समिती तेव्हा नेमण्यात आली होती तिचे अध्यक्ष हे अँड्र्यू फ्रासर हे होते. पुढे 1929 मध्ये या CID चे विभाजन हे दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये करण्यात आले. एक म्हणजे CID आणि दुसरी म्हणजे क्राईम ब्रांच (CB-CID) होय.

सध्या प्रत्येक राज्यानुसार CID चे अनेक छोट्या मोठ्या विभागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. क्राईम ब्रांच, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँड मिसिंग पर्सन सेल, अँटी नार्कोटिक्स सेल, फिंगर प्रिंट ब्युरो, CID आणि अँटी टेररिसम स्कॉड या CID च्या सर्वात मुख्य काही ब्रांचेस आहेत.

CID ऑफिसर होण्यासाठी पात्रता निकष – Eligibility Criteria for CID Officers

सर्वात आधी आपले शिक्षण काय झालेले असावे हे आपण जाणून घेऊयात,

  • भारतीय नागरिकत्व ही अट सर्वात आधी CID ऑफिसर होण्यासाठी लागू पडते.
  • कला, वाणिज्य किंवा विज्ञान क्षेत्रातून इयत्ता बारावीचे शिक्षण पूर्ण झालेले हवे.
  • पदावर तुमच्या शिक्षणाचा परिणाम नक्की होतो. पदवी शिक्षण पूर्ण असेल तर चांगले पद मिळू शकते.पदव्युत्तर शिक्षण तुम्हाला त्यापेक्षा चांगले पद मिळवून देऊ शकते.
  • पदवी शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेले हवे.
  • सर्वात मुख्य पायरी म्हणजे UPSC अंतर्गत घेण्यात येणारी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पात्र करणे गरजेचे असते.

CID ऑफिसर होण्यासाठी वयाच्या अटी आहेत त्या खालीलप्रमाणे,

  • खुला प्रवर्ग वयाची अट ही 20 ते 27 वर्षे करण्यात आलेली आहे.
  • ओबीसी प्रवर्गासाठी 20 ते 30 वर्षे ही वयाची अट आहे.
  • इतर मागासवर्गीय म्हणजे SC आणि ST कॅटेगरी साठी वयाची अट ही 20 वर्षे ते 32 वर्षे इतकी आहे.

CID ऑफिसर या पदासाठी कोणीही स्त्री किंवा पुरुष अर्ज करू शकतात. खाली या पदासाठी शारीरिक पात्रता निकष काय असतात याविषयी माहिती देतो आहे,

  • पुरुष – पुरुषांची उंची ही कमीत कमी 165 सेंटीमीटर असावी. छाती ही कमीत कमी 76 सेमी असावी. नेत्रदृष्टी ही चशमा असो किंवा नसो तरी 6/6 असावी. चष्मा असेल तर जवळचा नंबर असावा आणि तो जास्तीत जास्त6 असावा.
  • महिला – महिलांच्या बाबतीत उंचीची अट ही 150 सेमी कमीत कमी असावी. छातीचा घेर हा कमीत कमी 76 सेमी इतका असावा. नेत्रदृष्टी 6/6 आणि जवळचा नंबर असेल तर जास्तीत जास्त6 असावा.

CID ऑफिसर कसे होता येते? – How to Become CID Officer?

CID ऑफिसर होण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही UPSC म्हणजेच संघ लोकसेवा आयोग घेत असते. आपल्याला UPSC परीक्षेचे स्वरूप माहिती असेलच तरी देखील या परीक्षेचे 3 टप्पे आपण समजून घेऊयात.

  • पूर्व परीक्षा – पूर्व परीक्षा पात्र होऊन मग पुढे जाता येते.
  • मुख्य परीक्षा – मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात. त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला UPSC Full Form in Marathi लेखात मिळेल.
  • मुलाखत आणि शारीरिक चाचणी

FAQ

CID ऑफिसरचा पगार किती असतो?

CID ऑफिसरला साधारणतः 80 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना वेतन मिळत असते.

CID ऑफिसर होण्यासाठी आपल्याला किती वेळा प्रयत्न करता येतात?

वयाची अट बसत असेल तर आपण खुल्या प्रवर्गातील व्यक्ती 4 वेळा, ओबीसी व्यक्ती 7 वेळा आणि SC व ST व्यक्ती वयाची अट संपेपर्यंत अमर्याद वेळा CID ऑफिसर होण्यासाठी परीक्षेला अर्ज करू शकतात.

CID आणि SBI मधील फरक काय आहेत?

CID ही संस्था फक्त एखाद्या प्रदेशासाठी म्हणजे राज्यासाठी कार्यरत असते तर CBI ही संस्था संपूर्ण देशात आणि गरज पडली तर देशाबाहेर सुद्धा कार्यरत असते.

CBI म्हणजे काय? CBI चा Full Form काय आहे?

CBI म्हणजे Central Bureau of Investigation (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) होय. CBI ला केंद्रीय तपास संस्था म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment