सी.जी.एल फुल फॉर्म CGL Full Form In Marathi

CGL Full Form In Marathi आपल्या भारतामध्ये बरेच विद्यार्थी आहेत ,जे खाजगी नोकरी अगोदर सरकारी नोकरीला प्रथम प्राधान्य देतात. तसेच ते विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतात. सरकारी नोकरी मध्ये चांगला पगार ,नोकरीची सुरक्षितता असते ,त्यामुळे बरेच जण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका स्पर्धा परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तसेच सी.जी.एल चा फुल्ल फॉर्म काय आहे याविषयीची माहिती देखील आपण आजच्या लेखामधून पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सी.जी.एल परीक्षे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

CGL Full Form In Marathi

सी.जी.एल फुल फॉर्म CGL Full Form In Marathi

सी.जी.एल फुल्ल फॉर्म (CGL full form)

सी.जी.एल चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम” असा होतो. सी.जी.एल ची परीक्षा ही “स्टाफ सिलेक्शन कमिशन” म्हणजेच एस.एस.सी द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. या सी.जी.एल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी केली जाते.

एस.एस.सी (SSC – Staff Selection commission in Marathi)

एस.एस.सी म्हणजे “स्टाफ सिलेक्शन कमिशन” हे एक संघटन आहे ,जे मंत्रालय तसेच इतर विभागातील पदांसाठी विविध परीक्षांचे आयोजन करतात आणि या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड क्लास बी आणि क्लास सी मधील विविध पदांसाठी केली जाते. 

सी.जी.एल परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for CGL exam in Marathi)

१) सी.जी.ली ची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांची आयुसीमा ही १८ वर्ष ते ३२ वर्ष इतकी असली पाहिजे. १८ वर्षापेक्षा कमी आणि ३२ वर्षापेक्षा जास्त वय असणारा उमेदवार सी.जी. एल ची परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरतो.

२) सी.जी.एल ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला उमेदवार सी.जी.एल ची परीक्षा देऊ शकतो.

३) सी.जी.एल च्या काही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपण शारीरिक रित्या फीट असणे गरजेचे असते.

सी.जी.एल परीक्षेसाठी ऑनलाईन निवेदन करण्याची प्रक्रिया (Online application process of CGL exam in Marathi)

१) सी.जी.एल परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एस.एस.सी सी.जी.एल च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. सी.जी.एल परीक्षेचा निवेदन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही एस.एस.सी च्या या “Ssc.nic.com” संकेतस्थळावर जा.

२) त्यानंतर तुम्ही “न्यू युजर” या पर्यायावर क्लिक करा.

३) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला “रजिस्टर नाव” हा पर्याय दिसेल ,त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर पुढे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्क्रीन वर विचारलेली माहिती तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.

४) तुमचे एस.एस.सी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन व्यवस्थित रित्या होईल.

५) त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला सी.जी.एल च्या परीक्षेचा निवेदन फॉर्म येईल. त्या फॉर्म वर तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल ,ती माहिती तुम्ही न चुकता व्यवस्थित रित्या भरा.

६) निवेदन फॉर्म वरील माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर तुम्ही “सबमिट” या पर्यायावर क्लिक करा.

७) त्यानतंर पुढच्या पेज वर तुम्हाला सी.जी.एल परीक्षेची फी भरावी लागेल. सी.जी.एल च्या परीक्षेची फी ही १०० रुपये असते. परीक्षा फी भरल्यानंतर तुमचा सी.जी.एल परीक्षेचा निवेदन फॉर्म यशस्वी रित्या सबमिट होईल.

FAQ

सी.जी.एल चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

सी.जी.एल चा फुल्ल फॉर्म हा “कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल” असा होतो.

सी.जी.एल ची परीक्षा कोणाद्वारे आयोजित केली जाते ?

सी.जी.एल ची परीक्षा ही “स्टाफ सिलेक्शन कमीशन” द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते.

एस.एस.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एस.एस.सी चा फुल्ल फॉर्म हा “स्टाफ सिलेक्शन कमीशन” असा होतो ?

सी.जी.एल च्या परीक्षेची फी किती असते ?

सी.जी.एल च्या परीक्षेची फी ही १०० रुपये इतकी असते.

सी.जी.एल परीक्षेसाठी पात्रता निकष काय असते ?

सी.जी.एल परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्षे ते ३२ वर्ष इतकी असते. ३२ वर्षापेक्षा जास्त वय असणारा उमेदवार सी.जी.एल परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरतो. तसेच सी.जी.एल ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार पदवी उत्तीर्ण असला पाहिजे. याचसोबत सी.जी.एल च्या काही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार हा शारीरिक रित्या फीट असला पाहिजे.

सी.जी.एल ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या पदावर नोकरी मिळते ?

सी.जी.एल ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला मंत्रालय ,तसेच क्लास बी आणि क्लास सी मधील विविध पदांवर नोकरी मिळते. या पदांमध्ये सहायक लेखाधिकारी ,सहाय्यक ,अबकारी निरीक्षक ,कनिष्ठ सांख्यिकी ,तसेच इतर पदांचा समावेश असतो.

एस.एस.सी मार्फत एका वर्षामध्ये कितीवेळा सी.जी. एल ची परीक्षा आयोजित केली जाते ?

एस.एस.सी मार्फत सी.जी.एल ची परीक्षा ही दरवर्षी एकाच वेळी आयोजित केली जाते.

मी या वर्षी १२ वी उत्तीर्ण झालो आहे ,तर मी सी.जी.एल ची परीक्षा देऊ शकतो का ?

नाही ,तुम्ही सी.जी.एल ची परीक्षा देण्यासाठी अपात्र आहे. सी.जी.एल ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

निष्कर्ष (conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण सी.जी.एल च्या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.जी.एल चा फुल्ल फॉर्म ,एस.एस.सी विषयी माहिती ,सी.जी.एल परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, सी.जी.एल परीक्षेसाठी निवेदन करण्याची ऑनलाईन प्रक्रिया, सी.जी.एल परिक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (Reference)

१)https://leverageedu.com/blog/hi/ssc-cgl/

२)https://www.google.com/amp/s/testbook.com/amp/ssc-cgl-exam/how-many-times-ssc-cgl-exam-held-in-year

३)https://testbook.com/questions/hn/ssc-cgl-percentage-questions–637ef18b14906c7733f9a41a/amp

४)https://hindi.news18.com/amp/photogallery/jobs/how-many-time-i-can-give-ssc-cgl-exam-what-are-the-rules-6251359.html

५)https://en.m.wikipedia.org/wiki/Combined_Graduate_Level_Examination

Leave a Comment