सीईओ फुल फॉर्म CEO Full Form In Marathi

CEO Full Form in Marathi आपण मागील काही काळात अनेक अमेरिकन कंपनीत भारतीय वंशाचे व्यक्ती CEO आहेत हे ऐकलं असेल मात्र यातील CEO म्हणजे काय? CEO शब्दाचा मराठी भाषेत आणि इंग्रजी भाषेत FULL FORM काय आहे, CEO ला पगार किती असतो, CEO ची कार्ये काय आहेत आणि इतरही CEO विषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

CEO Full Form In Marathi

सीईओ फुल फॉर्म CEO Full Form In Marathi

CEO Full Form in Marathi । CEO Long Form In Marathi

CEO हा कंपनीचा सर्वेसर्वा असतो. कंपनीला पूर्णतः हँडल करण्याची जबाबदारी ही CEO कडे असते. CEO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Chief Executive Officer आहे. CEO शब्दाचा मराठी भाषेत अर्थ किंवा Full Form हा (CEO full form in marathi) मुख्य कार्यकारी अधिकारी असा आहे.

CEO म्हणजे काय? What is CEO in Marathi?

आपण CEO चा FULL FORM वर बघितला आणि त्यावरून तुम्हाला हे मात्र लक्षात आले असेल की एखाद्या संस्थेत सर्वात जास्त उच्च पदस्थ अधिकारी हा CEO असतो. CEO एखाद्या कंपणीमधील किंवा बँकेतील एक मुख्य अधिकारी असतो. हो बँकांना देखील एक CEO असतो. बँकेचे सर्व कर्मचारी आणि शाखा त्या CEO चे आदेश पाळतात.

CEO एखाद्या कंपनीला पूर्णपणे नियंत्रित करत असतो. कंपनीत कार्य करणारे सर्व कर्मचारी आणि सर्व काही निर्णय हे CEO च्या निर्णयावर अवलंबून असतात. म्हणजे कंपनीचे नुकसान, कंपनीला होणारा फायदा, कंपनीत होणारी कर्मचारी भरती ते कंपनीच्या छोट्या मोठ्या सर्व निर्णयांना जबाबदार हा CEO असतो.

CEO हा त्या कंपनीतील जरी महत्वाचा अधिकारी असला तरी देखील त्याच्या वर देखील एक डायरेक्टर बॉडी असते. या डायरेक्टर बॉडी मध्ये चेअरमन असतात आणि काही संचालक असतात. कंपनीमध्ये काय सुरू आहे, कंपनीचा काय रिपोर्ट आहे हे सर्व काही CEO द्वारे त्या डायरेक्टर बॉडी पर्यंत पोहोचत असते.

आता अनेकदा आपल्याला काही कंपन्या अशा बघायला मिळतात ज्यामध्ये CEO हे पदच नसते. मग अशा कंपनीत MD हे पद बनवलेले असते. MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर होय. हे पद देखील CEO दर्जाचे असून याला देखील CEO इतकेच सर्व अधिकार असतात.

CEO कसे बनतात?

CEO हा कंपनीतील सर्वात उच्च पदस्थ अधिकारी असतो आणि त्यामुळे CEO हे पद खूप जास्त जबाबदारीचे आणि निर्णय प्रविष्ट असते. त्यामुळे या पदावर असणारा व्यक्ती हा त्या स्थराचा असावा. CEO बनण्यासाठी प्रक्रिया सोपी नसते आणि तुम्ही त्या दर्जाचे असाल तर इतकी अवघड देखील नसते. CEO हे पद काय एखादे शिक्षण आहे म्हणून मिळत नसते. CEO बनण्यासाठी फक्त कष्ट आणि नॉलेज असणे गरजेचे असते. अनेकदा आपण बघितले असेल की कंपन्यांचे CEO हे MBA किंवा एखादे व्यावसायिक शिक्षण घेतलेले असतात त्यामुळे तुमचे MBA झालेले असेल तर तुम्हाला जास्त संधी मिळू शकतात.

कंपनीत कार्य करत असताना आपण एक एक पायरी चढत वरच्या स्तरावर जात असतो. जेव्हा आपले कार्य बोर्ड ऑफ डायरेक्टर ला समजेल तेव्हा आपल्यातील गुण हे त्यांना कळल्यानंतर ते आपल्याकडे कंपनीची थोडी जास्त जबाबदारी सोपवू शकतात. जर आपण यामध्ये यशस्वी झालो तर कदाचित आपल्याला CEO हे पद कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर देऊ शकतात.

CEO ची कार्ये

कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी किंवा मुख्य अधिकारी असल्याने CEO ला कामे देखील खूप जास्त असतात.

  • कंपनी मध्ये जे काही होते आहे त्याचा अहवाल हा बोर्ड ऑफ डायरेक्टर पर्यंत पोहोचवणे आणि कंपनी आणि बोर्ड मधील दुवा म्हणून काम करणे.
  • कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यासाठी आणि कंपनीच्या वृद्धी साठी प्रेरित करणे हे CEO चे काम असते.
  • मुख्य अधिकारी असल्याने सर्व मुख्य निर्णय घेणे.
  • गरजेनुसार कामावर कर्मचारी भरती करण्याचे निर्णय घेणे व कामाची वेळ आणि नियम बदलणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • कंपनीची वृद्धी कशी होईल यासाठी प्रयत्नशील असणे.
  • जास्तीत जास्त उत्पादन घेणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळविणे.
  • कर्मचाऱ्यांची समस्या सोडवून त्यांना कंपनीसोबत जोडून ठेवणे.
  • इतर व्यवसायांसोबत चर्चा करून कंपनी सोबत जोडून घेणे आणि त्यांना व्यवसायात समाविष्ट करून घेणे.
  • कंपनीच्या वाढीसाठी निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • कंपनीच्या उत्पादनांची विक्री कशी वाढेल आणि कंपनीची उत्पादन क्षमता आणि उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी काम करणे.

काही महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ (CEO)

  1. गुगल – सुंदर पिचाई
  2. APPLE – टीम कुक
  3. मायक्रोसॉफ्ट – सत्य नारायण नडेला
  4. इन्फोसिस – सलील पारेख
  5. अमेझॉन – जेफ बेझॉस (अँडी जेस्सी)
  6. फेसबुक – मार्क झुकेरबर्ग
  7. टीसीएस – राजेश गोपीनाथन
  8. टाटा – नटराजन चंद्रशेखरन
  9. एअरटेल – गोपाळ विठ्ठल
  10. टेक महिंद्रा – सिपी गुरूनानी
  11. एचडीएफसी – आदित्य पुरी
  12. टेस्ला – एलोन मस्क
  13. मेटा (फेसबुक) – मार्क झुकेरबर्ग
  14. जिंदाल – नवीन जिंदाल
  15. एल अँड टी – अनिल मनिभाई नाईक

CEO चा पगार

कंपनीतील सर्वात जास्त पगार हा त्या कंपनीच्या CEO ला असतो मात्र हा पगार किती असेल हे त्या कंपणीनुसार बदलत असते. अनेक कंपन्या या त्यांच्या CEO ला 10 लाखपासून ते 5 कोटी किंवा त्याहून अधिक पगार देतात. त्यामुळे CEO म्हणजे सर्वात जास्त पगार असणार हे लक्षात घ्यायला हवे. सांगितलेला पगार हा मासिक आहे त्यामुळे कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक पॅकेज इतका पगार CEO महिन्याला घेत असतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

FAQ (Frequently Asked Questions)

CEO (सीईओ) शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?

CEO (सीईओ) या शब्दाचा फुल फॉर्म हा Chief Executive Officer असा आहे.

सीईओ शब्दाचा मराठी भाषेत अर्थ काय होतो?

सीईओ म्हणजे मराठी भाषेत मुख्य कार्यकारी अधिकारी होय. कंपणीमधील सीईओ हा सर्वात उच्च पदस्थ अधिकारी असतो.

गुगलच्या सीईओ (CEO) चे नाव काय आहे? गुगलचे CEO कोण आहेत?

गुगलचे CEO हे सुंदर पिचाई हे असून ते भारतीय वंशाचे आहेत.

गुगलच्या सीईओचा महिन्याचा पगार किती आहे?

गुगलचे सीईओ असलेले भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांचे मासिक वेतन हे जवळपास भारतीय रुपयांमध्ये 176 करोड रुपये इतके आहे.

Leave a Comment