CDPO फुल फॉर्म CDPO Full Form In Marathi

CDPO Full Form In Marathi प्रत्येक गावात अंगणवाडी ही असतेच. तुम्ही कधीतरी तुमच्या गावातील अंगणवाडीच्या निरिक्षणासाठी एखादी अधिकारी आल्याचे बघितले असेलच. ह्या अधिकाऱ्याला CDPO अधिकारी म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहोत की CDPO म्हणजे काय, CDPO long form in Marathi, CDPO Full Form in Marathi आणि CDPO बद्दल इतर माहिती जाणून घेत आहोत.

CDPO Full Form In Marathi

CDPO Full Form In Marathi || CDPO Long Form In Marathi :

CDPO शब्दाचा long form in Marathi म्हणजेच CDPO full form in Marathi हा Child Development Project Officer (चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर) असा आहे. CDPO शब्दाचा मराठी अर्थ हा बाल विकास परियोजना अधिकारी असा आहे.

What is CDPO? || CDPO म्हणजे काय? :

CDPO म्हणजे Child Development Project Officer होय. CDPO हे बाल विकास परियोजना अधिकारी असतात. CDPO हा एक जिल्हास्तरीय अधिकारी असतो. बालकांचा विकास आणि गर्भवती महिलांची स्वास्थ्याची काळजी हि महत्त्वाची कामे CDPO कडे असतात.

आपल्याला माहीत आहे आपल्या देशातील काही भागांत कुपोषित बालकांचे प्रमाण खूप आहे तसेच ग्रामीण भागात पोषक आहार आणि बालकांचा विकास यावर विशेष भर दिला जात नाही. तसेच गर्भवती महिलांची काळजी घेण्याविषयी विशेष जाणीव नाही. अश्या कारणामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण वाढते आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

म्हणूनच गावागावांत आपल्याकडे अंगणवाडी आहे. ह्या अंगणवाडी मधून बालक आणि गर्भवती महिला यांना सरकारकडून विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. अश्या आरोग्य सेवा महिला आणि बालका पर्यंत पोहचत आहे का याचे काम हे CDPO अधिकारी बघतात.

CDPO Recruitment Process || CDPO भरती परीक्षा :

CDPO अधिकारी बनण्यासाठी राज्य सेवा विभागाकडून परिक्षा घेतली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात CDPO बनण्यासाठी MPSC CDPO हि परीक्षा असते. MPSC cdoo परीक्षेचे एकूण 3 टप्पे असतात –

  1. MPSC CDPO पूर्व परीक्षा
  2. MPSC CDPO मुख्य परीक्षा
  3. MPSC CDPO मुलाखत

Cdpo अधिकारी बनण्यासाठी तिन्ही टप्प्यात पात्र होणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षेत पात्र ठरल्यानंतर मुख्य परिक्षा देता येते आणि मुख्य परीक्षेत पात्र झाल्यानंतर मुलाखतीस बोलावले जाते. मुलाखतीत पात्र ठरल्यानंतर गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लागते ज्या गुणवंत उमेदवारांची निवड अधिकारी म्हणून केली जाते. रिक्त जगणुसर CDPO भरती केली जाते.

CDPO Exam Syllabus || CDPO अभ्यासक्रम :

CDPO पूर्व परीक्षा – CDPO पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञानाचा 150 गुणांचा एक पेपर असतो. पूर्व परीक्षा हि 2 तासांची असते.

CDPO मुख्य परीक्षा – CDPO एकूण 3 पेपर  असतात. पहिला पेपर हा हिंदीचा असतो आणि तो एकूण 100 गुणांचा असतो.

दुसरा पेपर हा सामान्य ज्ञान 1 आणि सामान्य ज्ञान 2 असा 2 विषयांचा असतो. प्रत्येक विषयासाठी 300 गुण असतात.

तिसरा पेपर ऑप्शनल असतो. ऑप्शनल मधे उमेदवार गृह विज्ञान, मनोविज्ञान, समाजशास्त्र आणि श्रम व समाज कल्याण यापैकी कोणताही एक विषय निवडू शकता. ऑप्शनल पेपर हा एकूण 300 गुणांचा असतो.

मुख्य परीक्षा हि वर्णनात्मक स्वरूपाची म्हणजे descriptive असते.

मुख्य परीक्षेनंतर मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट मध्ये येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

परीक्षे मध्ये पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन भाग असतात.

पूर्व परीक्षा हि वस्तुनिष्ठ प्रकारे (objective type) असते. पूर्व परीक्षा हि एकूण 150 गुणांची असते आणि एकूण 2 तास वेळ असतो.

पूर्व परीक्षा पात्र झाल्यानंतरच मुख्य परीक्षा देता येते.  मुख्य परीक्षा हि वर्णनात्मक प्रकारे (descriptive type) असते. मुख्य परीक्षा हि एकूण 300 गुणांची असते. मुख्य परीक्षेसाठी एकूण 3 तासांचा वेळ असतो.

मुख्य परीक्षा पात्र झाल्यानंतर मुलाखत असते.

Eligibility Criteria|| पात्रता निकष :

CDPO बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता – CDPO बनण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता हि पदवी उत्तीर्ण असणे आहे. CDPO अधिकारी बनण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. तुम्ही फक्त 12वी पास असल्यास CDPO बनू शकत नाही. CDPO बनण्यासाठी तुम्हाला पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

CDPO चे काम :

  • CDPO अधिकाऱ्यास 6 वर्षांखालील बालक आणि गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, यांच्या आरोग्याचा रिपोर्ट बनवावा लागतो.
  • गर्भवती महिला आणि बालक यांचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यांचं रिपोर्ट बनवण्याचे काम CDPO करते.
  • CDPO अधिकाऱ्यास वेळोवेळी कार्यक्रम वेगवेगळे विकास कार्यक्रम आयोजित करावे लागतात जेणेकरून .अहीलांच्या आणि बालकांच्या आरोग्याबद्दल त्यांना माहिती व्हावी.
  • CDPO अधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून, भेटीतून किंवा सभांतून महिलांनी बालकांच्या समस्या, गरज जाणून घेतात आणि त्यांच्या पूर्तता करण्याचे काम करतात.
  • महिला आणि बालक यांच्याकरिता ज्या काही सरकारी योजना लागू असतात त्यांची ग्रामस्तरावर अंबलबहवणी करण्याचे काम CDPO अधिकाऱ्याचे असते.
  • योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आणि बालकांच्या कुटुंबाकडून योजनांचा अभिप्राय घेणे आणि त्याचा रिपोर्ट बनवून उच्च अधिकाऱ्यांना पाठवणे.
  • अंगणवाडी केंद्राचे वेळोवेळी निरीक्षण करणे, तेथील कामांचे परीक्षण आणि गडबड आढळल्यास त्याबद्दल त्या स्तरावर कारवाई करून वर तक्रार करण्याचे काम CDPO चे असते.
  • आंगण वाडी वर छापा टाकण्याचे काम देखील CDPO चे असते.

FAQ:-

How many attempts are in MPSC CDPO? (MPSC CDPO मध्ये किती प्रयत्न आहेत ?

जोपर्यंत उमेदवार वयाच्या अतेमध्ये बसतात तोपर्यंत उमेदवार हव्या तितक्या वेळा MPSC CDOO परीक्षा देऊ शकतात. MPSC cdoo परीक्षेसाठी प्रयत्नांची अट नाही.

What is the salary of a CDPO? (सीडीपीओचा वेतन किती असते ?

CDPO अधिकाऱ्यास ₹50000-₹60000 पर्यंत वेतन असते. यासोबतच cdoo अधिकाऱ्यास सरकारकडून भत्ते आणि सेवा सुविधा मिळतात.

What is an age limit for CDPO? (सीडीपीओसाठी वयोमर्यादा काय आहे?

CDPO बनण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त 37 वर्षे असावे. राखीव गटांसाठी वयामध्ये सूट दिली जाते. ओबीसी गटासाठी 3 वर्षे, SC/ST गटासाठी 5 वर्षे सूट मिळते.

What is the required educational qualification to become a CDPO? (CDPO होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

CDPO बनण्यासाठी कोणतेही शाखेतून कमीत कमी पदवी उत्तीर्ण सने आवश्यक आहे.

Leave a Comment