सी.सी.टी.वी फुल फॉर्म CCTV Full Form In Marathi

CCTV Full Form In Marathi जेव्हापासून सी.सी.टी.वी कॅमेरे आलेत ,तेव्हापासून चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. आता प्रत्येक ठिकाणी सी.सी.टी.वी कॅमेरे लावले जातात ,त्यामुळे चोरी करणारा चोर त्या सी.सी.टी.वी कॅमेऱ्यात कैद होतो आणि त्याला आपण शासनाच्या मदतीने सहजरीत्या पकडू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण याच सी.सी.टी.वी कॅमेरा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “सी.सी.टी.वी कॅमेरा” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

CCTV Full Form In Marathi

सी.सी.टी.वी फुल फॉर्म CCTV Full Form In Marathi

सी.सी.टी.वी फुल्ल फॉर्म (CCTV full form)

सी.सी.टी.वी चा फुल्ल फॉर्म “क्लोजड सर्किट टेलिव्हिजन” असा होतो. “आपण बँकांमध्ये चोरी झाली” ,”ज्वेलरी शॉप मध्ये चोरी झाली” ,अशा बातम्या सतत ऐकत असू . सी.सी.टी.वी कॅमेरा येण्याअगोदर पोलिसांना या चोरी करणाऱ्या चोरांना पकडणे खूप कठीण जात होते ; परंतु जेव्हापासून सी.सी.टी.वी कॅमेरा मार्केट मध्ये आले आहेत ,तेव्हापासून चोरांना पकडणे सोपे झाले आहे. काही लोक घराच्या बाहेर देखील सी.सी.टी.वी कॅमेरा लावतात.

ज्या ठिकाणी सी.सी.टी.वी कॅमेरा लावले जातात , सी.सी.टी.वी कॅमेरा त्या ठिकाणच्या आसपासची सर्व दृश्य कैद करतात आणि ती कैद केलेली दृश्य आपल्याला कॉम्पुटर स्क्रीन वर दिसतात.

सी.सी.टी.वी कॅमेरा (CCTV camera in Marathi)

सी.सी.टी.वी कॅमेरा चार गोष्टी मिळून तयार होतो. त्या चार गोष्टी खालीलप्रमाणे आहेत :

१) कॅमेरा लेन्सेस – कॅमेरा लेन्सेस या सी.सी.टी.वी कॅमेराचा महत्वाचा भाग असतात.  जेव्हा एखादा व्यक्ती किंवा वस्तू सी.सी.टी.वी कॅमेऱ्याच्या रेंज मध्ये येते ,तेव्हा त्या व्यक्तीचे प्रतिबिंब सी.सी.टी.वी कॅमेऱ्याच्या लेन्स वरती पडते आणि हे लेन्स ते प्रतिबिंब सी.सी.टी.वी कॅमेऱ्यामध्ये असणाऱ्या सेन्सर वर पाठवते.

२) सेन्सर – सी.सी.टी.वी कॅमेऱ्यात असलेले सेन्सर “कॅमेरा लेन्सेस” मधून आलेल्या प्रतिबिंबाचे रूपांतर डिजिटल कॉपी मध्ये करते आणि पुढे सेन्सर ती डिजिटल कॉपी सर्किट बोर्ड कडे पाठवते.

३) सर्किट बोर्ड – सेन्सर मधून आलेली प्रतिबिंबाच्या डिजिटल कॉपीचे जतन सर्किट बोर्ड मध्ये होते.

४) स्टोरेज डिव्हाईस – सी.सी.टी.वी कॅमेरा मध्ये जे काही प्रतिबिंब कैद झालेले असते ,ते आपल्याला स्टोरेज डिव्हाईस मध्ये दिसते.

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा इतिहास (History of CCTV camera in Marathi)

१९४२ मध्ये जर्मनी देशामध्ये एक रॉकेट चे लॉन्चिंग होणार होते आणि त्या रॉकेटच्या लॉन्चिंग चे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. यावेळी पहिल्यांदा सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. या रॉकेट लॉन्चिंग चे व्हिडिओ शूटिंग ज्या सी.सी.टी.वी कॅमेऱ्याने केले होते, त्या सी.सी.टी.वी कॅमेऱ्याची निर्मिती “सायमंस एजी” कंपनी द्वारे करण्यात आली होती.

पूर्वीचे सी.सी.टी.वी कॅमेऱ्याने होणारे व्हिडिओ शूट हे आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट फॉरमॅट मध्ये दिसत होते; परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे वर्तमानात सी.सी.टी.वी कॅमेऱ्याने होणारे व्हिडिओ शूट हे आपल्याला कलर फॉरमॅट मध्ये दिसते.

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचे उपयोग (Some uses of CCTV camera in Marathi)

१) आपण चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर करू शकतो. ज्या ठिकाणी सी.सी.टी.वी कॅमेरा लावलेले नसतात ,त्याठिकाणी चोरीचे प्रमाण जास्त असते ; परंतु ज्या ठिकाणी सी.सी.टी.वी कॅमेरा लावलेले असतात ,त्या ठिकाणी चोरीचे प्रमाण देखील कमी असते आणि सी.सी.टी.वी कॅमेरा लावलेल्या ठिकाणी चोरी झालीच तर ,सी.सी.टी.वी कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण सहजरीत्या चोरी करणाऱ्या चोराला पकडू शकतो.

२) काही वर्षांपूर्वी रस्त्यावरील सर्व वाहणांकडे लक्ष ठेवणे ,ट्रॅफिक पोलिसांसाठी कठीण जात होते ; परंतु आता रस्त्यावर ठीक ठिकाणी सी.सी.टी.वी कॅमेरा लावलेले असतात आणि जे ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करतात ,त्यांच्या गाडीचा नंबर सी.सी.टी.वी कॅमेऱ्यात कैद होतो आणि त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दंड बसतो.

FAQ

सी.सी.टी.वी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

सी.सी.टी.वी चा फुल्ल फॉर्म “क्लोजड सर्किट टेलिव्हिजन” असा होतो.

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याची निर्मिती १९४२ मध्ये करण्यात आली होती.

पहिल्यांदा सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर कोणत्या गोष्टी साठी करण्यात आला होता ?

१९४२ मध्ये जर्मनी देशामध्ये एक रॉकेट लॉन्चिंग होणार होते आणि त्या रॉकेट लॉन्चिंग च्या व्हिडिओ शूटिंग साठी पहिल्यांदा सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापरण्यात आला होता.

पाहिला सी.सी.टी.वी कॅमेरा कोणत्या कंपनी द्वारे तयार करण्यात आला होता ?

पाहिला सी.सी.टी.वी कॅमेरा हा १९४२ मध्ये “सायमंस ए.जी” या कंपनीद्वारे तयार करण्यात आला होता.

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला जातो ?

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर बँकांमध्ये ,मॉल्स मध्ये ,ठेठर मध्ये केला जातो. तसेच परीक्षा हॉल मध्ये देखील सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर केला जातो.

सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचे कोणकोणते फायदे आहेत ?

आपण जर आपल्या व्यवसायामध्ये सी.सी.टी.वी कॅमेरा लावला तर आपण आपल्या ग्राहकांकडे लक्ष्य देऊ शकतो. तसेच सुरक्षाच्या हेतूने देखील सर्वत्र सी.सी.टी.वी कॅमेरा लावले जातात. रस्त्यावर ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहणांकडे लक्ष्य देण्यासाठी देखील सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा वापर केला जातो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण सी.सी.टी.वी कॅमेरा विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सी.सी.टी.वी फुल्ल फॉर्म ,सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचा इतिहास, सी.सी.टी.वी कॅमेऱ्याचे उपयोग, सी.सी.टी.वी कॅमेऱ्याविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE

२)https://hindi.nvshq.org/cctv-full-form-kya-hai-hindi/#google_vignette

३)https://techwithedul.medium.com/cctv-%E0%A4%95%E0%A4%BE-full-form-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88-what-is-cctv-in-hindi-5a822e3ddfd2

४)https://www-careers360-com.translate.goog/cctv-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true

५)https://byjus-com.translate.goog/full-form/cctv-full-form/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

Leave a Comment