CBSE फुल फॉर्म CBSE Full Form In Marathi

CBSE Full Form In Marathi शिक्षण क्षेत्रात 12 वि पर्यंत वेगवेगळ्या बोर्डाच्या अंतर्गत शिक्षण आज उपलब्ध आहे. आपले प्राथमिक शिक्षण हे आपल्या भविष्यासाठी किती जास्त महत्वाची असते हे आपल्याला देखील माहिती आहे. आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सर्वांना माहीती आहे मात्र आपण कधीतरी CBSE पॅटर्न असलेली शाळा आहे असे सहज ऐकून सोडून देतो. मात्र CBSE म्हणजे काय? काय आहे हे CBSE, CBSE Full Form in Marathi, CBSE बोर्ड म्हणजे काय, CBSE चा इतिहास काय आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

CBSE Full Form In Marathi

CBSE फुल फॉर्म CBSE Full Form In Marathi

CBSE Full Form in Marathi – CBSE Long Form in Marathi

CBSE हा एक शिक्षण बोर्ड आहे. CBSE संपूर्ण भारत देशात कार्यरत आहे. संपूर्ण भारतात CBSE ला देखील सर्वात महत्वाचे स्थान आहे कारण त्यांची शिक्षण व्यवस्था खूप जास्त प्रगत आहे. CBSE चा इंग्रजी भाषेत Full Form हा Central Board of Secondary Education (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एड्यूकेशन) असा आहे. CBSE शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असा आहे.

CBSE म्हणजे काय? (What is CBSE in Marathi?)

CBSE म्हणजे हा एक शिक्षण बोर्ड होय. भारतातील महत्वाच्या शिक्षण मंडलनापैकी सर्वात जास्त महत्वाचे बोर्ड म्हणजे CBSE आहे. CBSE हा बोर्ड केंद्र सरकार कडून चालवले जाते. CBSE अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय आणि शाळा या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात.

CBSE हा शिक्षण बोर्ड 3 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन करण्यात आला. CBSE आपल्या महाराष्ट्रात जरी फक्त इंग्रजी भाषेत शिक्षण देत असेल तरी देखील संपूर्ण देशात हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देते.

CBSE विषयी थोडक्यात मुद्देसूद माहिती समजून घेऊयात.

संस्थेचे नाव : CBSE (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एड्यूकेशन)
मराठी मध्ये CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
CBSE ची स्थापना : 3 नोव्हेंबर 1962
CBSE चे मुख्यालय : नवी दिल्ली, भारत
CBSE चे ब्रीदवाक्य : असतो मा सदगमय
CBSE चे अध्यक्ष : मनोज अहुजा
CBSE ची वेबसाईट : www.cbse.nic.in

CBSE या बोर्डामध्ये इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जाते. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडत असेल की नक्की CBSE ला इतके जास्त महत्व का आहे? CBSE अभ्यासक्रमात NCERT ची पुस्तके वापरली जातात.  आता ही NCERT ची पुस्तके का? या पुस्तकांचा वापर आपण UPSC सारख्या परीक्षांसाठी संदर्भ पुस्तके म्हणून वापरतो अशी उच्च दर्जाची पुस्तके अभ्यासक्रमाला CBSE वापरते.

NEET आणि JEE सारख्या केंद्र स्तरावरील परीक्षांसाठी आणि इतरही उच्च शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी CBSE च्या अभ्यासक्रमात असलेली NCERT ची पुस्तके वापरली जातात. त्यामुळे ज्यांना UPSC करायची आहे, ज्यांना NEET आणि JEE सारख्या परीक्षांमध्ये काहीतरी करायचे असेल तर CBSE बोर्डातून शिक्षण घेणे कधीही उपयुक्त ठरेल.

NCERT म्हणजे काय ? What is NCERT?

NCERT शब्दाचा फुल फॉर्म हा राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असा आहे. NCERT अनेक भाषांमध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वि पर्यंतची पाठयपुस्तके बनवते. CBSE ची स्थापना होण्याआधी 1 सप्टेंबर 1961 रोजी NCERT ही केंद्रीय संस्था स्थापन करण्यात आली.

CBSE अंतर्गत शिक्षण संस्था – Education Systems under CBSE

CBSE च्या अंतर्गत देशातील अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. आकडेवारी सांगायचे झाले तर अनके केंद्रीय विद्यालय, 1761 सरकारी विद्यालय, 5827 खाजगी विद्यालय, 480 जवाहर नवोदय विद्यालय आणि 14 केंद्रीय तिबेटी विद्यालय समाविष्ट आहेत.

CBSE बोर्डाच्या अंतर्गत इयत्ता पहिली पासून 12 वि पर्यंतचे अभ्यासक्रम घेतले जातात. या काळात 10 वि इयत्तेसाठी अखिल भारतीय सेकंडरी स्कुल परीक्षा म्हणजेच AISSE आणि इयत्ता बारावी साठी अखिल भारतीय सिनियर स्कुल सर्टिफिकेट परीक्षा म्हणजे AISSCE देखील CBSE बोर्ड द्वारे घेतल्या जातात.

याशिवाय उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांमध्ये AIEEE म्हणजेच अखिल भारतीय इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा आणि AIPMT म्हणजेच अखिल भारतीय प्री मेडिकल परीक्षा देखील CBSE बोर्डाकडून घेतली जाते.

CBSE आणि मराठी भाषा विषय

CBSE सारखा बोर्ड महाराष्ट्रात देखील कार्यरत आहे मात्र या शाळांमधून मराठी सारखा विषय सक्तीचा करून देखील शिकविला जात नाही. महाराष्ट्र सरकारने सक्ती करून देखील CBSE शाळांमध्ये मराठी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला असल्याने मात्र आता मराठी भाषेचे अस्तित्व या CBSE शाळांमधून धोक्यात येण्याची दाट शक्यता समोर येते आहे.

FAQ


Warning: Undefined array key "name" in /home/458462.cloudwaysapps.com/trnjzehcps/public_html/wp-content/plugins/seo-by-rank-math-pro/includes/modules/schema/shortcode/faqpage.php on line 31

Warning: Undefined array key "text" in /home/458462.cloudwaysapps.com/trnjzehcps/public_html/wp-content/plugins/seo-by-rank-math-pro/includes/modules/schema/shortcode/faqpage.php on line 32

CBSE बोर्ड चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

मनोज आहुजा हे आय ए एस असलेले ऑफिसर सध्याचे CBSE बोर्डाचे अध्यक्ष आहेत. केंद्र स्तरावरील हे शिक्षण बोर्ड असून याच्या अध्यक्ष स्थानी UPSC मधून आलेले अधिकारी भरती केले जातात. शक्यतो या पदावर एखादा IAS अधिकारीच असतो.

CBSE आणि ICSE पैकी कोणता बोर्ड चांगला आहे?

CBSE ही थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीकडे अवलंबून असणारी शिक्षण पद्धती वापरणारा बोर्ड आहे. मात्र CBSE मध्ये थेअरी वर जास्त भर दिला जातो. ICSE देखील CBSE प्रमाणे आहे मात्र यात प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे तुम्हाला जर UPSC सारख्या परीक्षा द्यायच्या असतील तर CBSE हा बोर्ड कधीही तुमच्यासाठी योग्य असेल. मात्र जर तुम्हाला इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात जायचे असेल तर ICSE बोर्ड कडे पर्याय म्हणून बघावे.

CBSE शब्दाचा full form काय आहे?

CBSE हा एक केंद्र सरकार संचालित बोर्ड आहे. CBSE शब्दाचा Full Form हा Central Board of Secondary Education असा आहे. मराठी भाषेत CBSE शब्दाचा Full Form हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असा आहे.

CBSE बोर्डाची स्थापना कधी झाली होती?

1962 साली 3 नोव्हेंबर रोजी CBSE बोर्डाची स्थापना नवी दिल्ली येथे झाली.

IIT साठी कोणता शिक्षण बोर्ड सर्वात उपयुक्त आहे?

नक्कीच CBSE, कारण आपल्याला IIT मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी JEE सारख्या परीक्षा दयाव्या लागतात. या JEE परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम हा NCERT पुस्तकांमधील असून NCERT ची पुस्तके ही CBSE बोर्डात अभ्यासक्रम म्हणून आहेत.मनोज आहुजा हे आय ए एस असलेले ऑफिसर सध्याचे CBSE बोर्डाचे अध्यक्ष आहेत. केंद्र स्तरावरील हे शिक्षण बोर्ड असून याच्या अध्यक्ष स्थानी UPSC मधून आलेले अधिकारी भरती केले जातात. शक्यतो या पदावर एखादा IAS अधिकारीच असतो.

Leave a Comment