बीएसडब्ल्यू फुल फॉर्म BSW Full Form in Marathi

BSW Full Form in Marathi समाजसेवा करण्यासाठी जर शिक्षण घ्यायचे असेल तर कोणते कोर्स आहेत हे समाजावेगळ राहत आहे. मात्र आज आपण BSW या सामाजिक कार्याशी संबंधित असणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण BSW म्हणजे काय, BSW फुल फॉर्म, BSW कोर्स साठी शैक्षणिक पात्रता, BSW कोर्सचा कालावधी, प्रवेश प्रक्रिया आणि नोकरीच्या संधी याविषयी जाणून घेणार आहोत.

BSW Full Form in Marathi

बीएसडब्ल्यू फुल फॉर्म BSW Full Form in Marathi

BSW Full Form in Marathi | BSW Long Form in Marathi

BSW शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Bachelor of Social Work (बॅचलर ऑफ सोशल वर्क) असा आहे. BSW शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा सामाजिक कार्य मधील स्नातक असा होतो.

BSW म्हणजे काय? – What is BSW?

BSW विषयी सविस्तर सांगायचे झाल्यास हा एक पदवी अभ्यासक्रम आहे. याला बॅचलर ऑफ सोशल वर्क्स म्हणून ओळखतात. पदवी अभ्यासक्रम मधील या कोर्सला देखील एक उच्च दर्जाची मान्यता प्राप्त आहे. BSW या कोर्सचा महत्वाचा उद्देश्य हा प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांमध्ये समाजाशी आपलं काहीतरी देणं आहे ही भावना रुजवून समाजकल्याणाची भावना रुजविणे हे आहे.

इयत्ता बारावी नंतर BSW साठी तुम्हाला प्रवेश घेता येतो. यामध्ये अभ्यासक्रम हा अंतर्गत रेग्युलर किंवा बाह्य पद्धतीने देखील पूर्ण करता येतो. कोर्सचा कालावधी हा 3 वर्षांचा आहे मात्र यामध्ये 6 वर्षांपर्यंत हा कोर्स पूर्ण करण्याची सूट देखील दिलेली आहे.

कोर्सचा अभ्यासक्रम तुम्हाला समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना कशा कार्यरत आहेत हे शिकविले जाते. त्यांचे कार्य समाजासाठी कल्याणकारी कसे होईल यासाठी या कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. BSW मधून समाजात चांगले काय आहे, वाईट काय आहे, लोकांच्या समस्या काय आहेत, त्यांचे निवारण कसे करता येईल, लोकांची मदत कशी करता येईल याविषयी शिक्षण दिले जाते.

BSW कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता निकष – Educational Eligibility Criteria for BSW

  • विद्यार्थ्यांची कोणत्याही शैक्षणिक मान्यता असलेल्या विद्यापीठाच्या अंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
  • बारावी मध्ये 50% हुन अधिक गुण असावेत.
  • उमेदवार हा बारावी पर्यंत चांगल्या गुणांनी पास झालेला असावा.
  • एखाद्या महाविद्यालयात BSW कोर्स साठी प्रवेश परीक्षा घेतली जात असेल तर ती द्यावी.

BSW कोर्स प्रवेश प्रक्रिया – Admission Process for BSW Course

BSW हा कोर्स देखील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येतो. अनेक महाविद्यालय हे तुम्हाला BSW साठी सरळ प्रवेश देतात म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. मात्र काही महाविद्यालयात तुम्हाला प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

BSW प्रवेशासाठी इयत्ता बारावी मध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे. अनेक महाविद्यालायत बारावीच्या मार्कांच्या अनुसार मेरिट लिस्ट लावली जाते. त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळतो.

इतर महाविद्यालय हे BSW साठी प्रवेश परीक्षा घेतात. त्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला BSW साठी प्रवेश दिला जातो.

BSW साठी आवश्यक स्किल्स – Required Skills for BSW

BSW हा गुणांशी संबंधित अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे उमेदवार किंवा विद्यार्थी हा काही स्किल्स मध्ये पारंगत असणे आवश्यक असते.

  • विद्यार्थ्यांकडे चांगले संवाद कौशल्य असावे.
  • प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये स्किल्स असाव्यात.
  • संयमी असावे.
  • विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य असावे.
  • समाजाविषयी आपुलकी आणि सामाजिक भान असावे.
  • स्वतःबद्दल जागरूकता असावी.
  • जिद्द आणि सचोटीने काम करण्याची तयारी असावी.
  • एखाद्याचे मन परिवर्तन करता यायला हवे.
  • या सर्वांसोबत तो भावनिक दृष्ट्या सक्षम असावा.

BSW कोर्सची फी – Fee of BSW Course

इतर पदवी शिक्षणाप्रमाणे BSW शिक्षणाची फी देखील तुम्ही कोणत्या महाविद्यालयातून कोर्स पूर्ण करता यावर अवलंबून आहे. खाजगी महाविद्यालयात ही फी जास्त असते तर सरकारी महाविद्यालयात ही फी फार कमी असते. खाजगी महाविद्यालयात BSW साठी प्रति वर्ष 10 हजार रुपये ते 30 हजार रुपये इतकी फी असू शकते. मात्र सरकारी महाविद्यालयात हेच शिक्षण 30 हजारात 3 वर्षांचे पूर्ण होऊ शकते.

BSW पदवी नंतर नोकरीच्या संधी – Jobs and Career after BSW

BSW हा कोर्स सामाजिक कार्याशी संबंधित आहे त्यामुळे कदाचित आपल्याला शंका येईल की नक्की या कोर्स मधून आपल्याला नोकरी मिळेल की फक्त समाजसेवा करावी लागेल? आज हा कोर्स करून अनेक विद्यार्थी सरकारी तसेच विविध खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी करत आहेत. आपल्याला अनेक उत्तम आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय समाज कल्याण आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये नोकरी करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

अनेक भारत सरकार आणि राज्य सरकारचे विभाग आहेत ज्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये सल्लागार विभाग, वृद्धाश्रम, सरकारी दवाखाने, एनजीओ, कंपन्यांमध्ये ह्युमन रिसोर्स विभाग किंवा मानवी हक्क सेवा संस्थेत कार्य करण्याच्या संधी आहेत.

स्वायत्त म्हणून सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक प्रशिक्षक, प्रोजेक्ट मॅनेजर, आरोग्य सेवा कार्यकर्ता, शिक्षक आणि चॅरिटी ऑफिसर म्हणून देखील नोकरीच्या संधी BSW नंतर आहेत.

भारतातील BSW साठी चांगले महाविद्यालय – Top Colleges for BSW in India

  1. मद्रास ख्रिश्चन कॉलेज
  2. NIMS युनिव्हर्सिटी
  3. बिजेबी ऑटोनोमस कॉलेज
  4. अमिटी युनिव्हर्सिटी
  5. RKDF युनिव्हर्सिटी
  6. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
  7. पटना युनिव्हर्सिटी
  8. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी
  9. देवी अहिल्या विश्वविद्यालय
  10. मुंबई युनिव्हर्सिटी
  11. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
  12. अन्नमलाई युनिव्हर्सिटी
  13. बनारस हिंदू विश्व विद्यालय
  14. डॉ बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी

FAQ


Warning: Undefined array key "text" in /home/458462.cloudwaysapps.com/trnjzehcps/public_html/wp-content/plugins/seo-by-rank-math-pro/includes/modules/schema/shortcode/faqpage.php on line 32

BSW काय आहे?

BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क होय. हा 3 वर्षांचा सामाजिक कार्याशी संबंधित पदवी अभ्यासक्रम आहे.

BSW पदवी झाल्यानंतर पगार किती असतो?

BSW नंतर नोकरीच्या सरकारी आणि खाजगी संधी आहेत. त्यामध्ये साधारणतः 2 लाख प्रति वर्षपेक्षा जास्तच वेतन मिळते.

BSW नंतर नोकरीच्या संधी कुठे असतात?

BSW जंतर ह्युमन रिसोर्स विभागात, व्यक्तिमत्व विकास विभागात आणि सामाजिक कल्याण क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत

Leave a Comment