बी.पी.एस.सी फुल फॉर्म BPSC Full Form In Marathi

BPSC Full Form In Marathi आजच्या लेखामध्ये आपण बिहार राज्यातील लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेविषयी म्हणजे “बी.पी.एस.सी” परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण बी.पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे? याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे बी.पी.एस.सी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

BPSC Full Form In Marathi

बी.पी.एस.सी फुल फॉर्म BPSC Full Form In Marathi

बी.पी.एस.सी फुल्ल फॉर्म (BPSC full form)

बी.पी.एस.सी चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “बिहार पब्लिक सर्व्हिस कमीशन” असा होतो. तसेच बी.पी.एस.सी ला मराठी भाषेमध्ये “बिहार लोकसेवा आयोग” असे म्हणतात. बिहार लोकसेवा आयोग दरवर्षी बिहार मध्ये सिव्हिल परीक्षा आयोजित करते आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड बिहार लोकसेवा आयोगाद्वारे विविध पदांसाठी केली जाते. बी.पी.एस.सी ची परीक्षा क्लास ए,क्लास बी आणि क्लास सी मधील पदांसाठी घेतली जाते.

बी.पी.एस.सी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for BPSC exam in Marathi)

१) बी.पी.एस.सी च्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.

२) बिहार लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या बी.पी.एस.सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

३) बी.पी.एस.सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय हे २० वर्षे ते ३७ वर्षे च्या दरम्यान असले पाहिजे ; परंतु बिहार लोकसेवा आयोगाद्वारे आयुसीमा मध्ये जातींच्या आधारावर सूट दिली जाते. बी.पी.एस.सी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २० वर्ष ते ३७ वर्ष इतकी असते. तसेच खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २० वर्षे ते ४० वर्षे इतकी असते. याचसोबत बी.पी.एस.सी परीक्षेसाठी ओबीसी प्रवर्गातील पुरुष व महिला उमेवारांसाठी असणारी आयुसीमा ही २० वर्षे ते ४० वर्षे इतकी असते. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांसाठी असणारी आयुसीमा ही २० वर्षे ते ४२ वर्ष इतकी असते.

४) बी.पी.एस.सी च्या काही पदांसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा शारिरीक रित्या फीट असला पाहिजे. बी.पी.एस.सी परीक्षेद्वारे पोलीस अधिकारी बनण्यासाठी खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची उंची ही ५ फूट ५ इंच पेक्षा जास्त असली पाहिजे. तसेच बी.पी.एस.सी परीक्षेद्वारे पोलीस अधिकारी बनण्यासाठी एससी आणि एसटी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांची उंची ही ५ फूट ३ इंच पेक्षा जास्त असली पाहिजे.

बी.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा (Facilities of officers who clear BPSC exam

१) बी.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारद्वारे आकर्षक पगार दिला जातो.

२) बिहार मधील सिव्हिल सर्व्हिस अधिकारी जेव्हा निवृत्त होतात ,तेव्हा सरकारद्वारे त्यांना पेन्शनची सुविधा दिली जाते.

बी.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करणारा अधिकाऱ्यांचा मासिक पगार (Monthly Salary of BPSC exam passed officers in Marathi)

बिहार लोकसेवा आयोगाद्वारे बिहार मध्ये दरवर्षी

बी.पी.एस.सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचे आयोजन केले जाते आणि या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड “बिहार लोकसेवा आयोगाद्वारे” विविध पदांसाठी केली जाते. या विविध पदांसाठी सरकार कडून मिळणारा मासिक पगार हा वेगवेगळा असतो ; परंतु बी.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ४५,००० रुपये ते ७२,००० रुपये इतका असतो आणि वाढत्या अनुभवासोबत या अधिकाऱ्यांच्या मासिक पगारमध्ये देखील वाढ होत जाते.

FAQ

बी.पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

बी.पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म “बिहार पब्लिक सर्व्हिस कमीशन” असा होतो

बी.पी.एस.सी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणले जातात ?

बी.पी.एस.सी ला मराठी भाषेमध्ये “बिहार लोकसेवा आयोग” असे म्हणले जाते.

बी.पी.एस.सी परीक्षेसाठी पात्रता निकष काय असते ?

बी.पी.एस.सी च्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा भारत देशाचा नागरिक असला पाहिजे. तसेच उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. याचसोबत बी.पी.एस.सी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही २० वर्षे ते ३७ वर्षे इतकी असते. या आयुसीमा मध्ये जातीच्या आधारावर सूट दिली जाते. तसेच बी.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस अधिकारी बनण्यासाठी उमेदवार हा शारीरिक रित्या फीट असला पाहिजे.

बी.पी.एस.सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?

बी.पी.एस.सी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ४५,००० रुपये ते ७२,००० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत बी.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा वाढत जातो.

बी.पी.एस.सी द्वारे दरवर्षी किती वेळा बी.पी.एस.सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आयोजित केली जाते ?

बी.पी.एस.सी द्वारे दरवर्षी एकाच वेळा बी.पी.एस.सी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आयोजित केली जाते.

बी.पी.एस.सी ची परीक्षा किती चरणांमध्ये आयोजित केली जाते ?

बी.पी.एस.सी ची परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड या तीन चरणांचा समावेश असतो.

मी वाणिज्य शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे ? तर मी बी.पी.एस.सी ची परीक्षा देऊ शकतो का ?

हो ,तुम्ही बी.पी.एस.सी ची परीक्षा देऊ शकता. बी.पी.एस.सी ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण बिहार राज्यातील बी.पी.एस.सी परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण बी.पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म ,बी.पी.एस.सी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष,

बी.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, बी.पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा मासिक पगार, बी.पी.एस.सी परीक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,वइत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97

२)https://byjusexamprep.com/bpsc/bpsc-ka-full-form-kya-hai#toc-1

३)https://testbook.com/blog/hi/bpsc-full-form-in-hindi/

४)https://prepp.in/bpsc-exam/salary

५)https://en.m.wikipedia.org/wiki/Bihar_Public_Service_Commission

Leave a Comment