बीएचएमएस फुल फॉर्म BHMS Full Form In Marathi

BHMS Full Form In Marathi मेडिकल क्षेत्रातील MBBS विषयी आपण सर्व माहिती एका आर्टिकल मध्ये आधी जाणून घेतली मात्र मेडिकल क्षेत्रातील आणखी एक अभ्यासक्रम म्हणजे BHMS विषयी आपल्याला माहिती नसेल. अनेकदा आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो आणि तिथे त्यांच्या दवाखान्याच्या बाहेरील पोस्टर वर किंवा टेबल वरील नावाच्या प्लेटवर पदवी मध्ये BHMS हा शब्द बघतो.

BHMS Full Form In Marathi

बीएचएमएस फुल फॉर्म BHMS Full Form In Marathi

मात्र नक्की BHMS चा Full Form काय आहे, BHMS म्हणजे काय, BHMS ही पदवी कशी मिळवता येते, BHMS शिक्षणासाठी लागणारी पात्रता, BHMS साठी प्रवेश कसा मिळतो, BHMS चा कालावधी याविषयी आणि इतरही BHMS विषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

BHMS Full Form in Marathi – BHMS Long Form in Marathi

मेडिकल क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांपैकी BHMS ही एक पदवी आहे. मेडिकल क्षेत्रातील दोन मुख्य उपचार पद्धती म्हणजेच ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी यापैकी होमिओपॅथी विषयी या पदवी मध्ये प्रशिक्षण दिले जाते. BHMS झालेले डॉक्टर या होमिओपॅथी औषध पद्धतीचा वापर करतात.

BHMS शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Bachelor of Homeopathy Medicine and Surgery (बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी) असा आहे.
BHMS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा होमिओपॅथीक औषध आणि शस्त्रिका पदविका असा आहे.

BHMS म्हणजे काय? – What is BHMS in Marathi?

आपल्याकडे इयत्ता बारावी नंतर प्रवेश कुठे घ्यायचा हा प्रश्न उपस्थित असतो. मात्र आपल्याला आधीच आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे हे फिक्स असेल तर मग त्यातील कोणते क्षेत्र हा प्रश्न समोर असतो. याचे उत्तर आपण आपल्या मार्कांवरून आणि आपल्याला कशात रस आहे यावरून निवडत असतो.

मेडिकल क्षेत्रातील बारावी नंतर MBBS ही पदवी अनेक विद्यार्थी घेतात मात्र ज्याचे स्वप्न डॉक्टर व्हायचे असते मात्र MBBS ला नंबर न लागल्याने मेडिकल क्षेत्रातील आणखी एक उच्च दर्जाची पदवी म्हणजेच BHMS साठी विद्यार्थी जातात. ही होमिओपॅथी या क्षेत्रातील मेडिकल पदवी असून होमिओपॅथी डॉक्टर म्हणून या कोर्सनंतर तो विद्यार्थी स्वतःची प्रॅक्टिस करू शकतो.

होमिओपॅथी हे क्षेत्र अनेकदा अलोपॅथी पेक्षा देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरते आणि अनेक अनुवांशिक व अनेक वर्षांपासून जडलेले आजार देखील यातून सहज आणि काही पथ्य आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट ने बरे होतात.

BHMS प्रवेशासाठी पात्रता – Eligibility for BHMS in Marathi

मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या पात्रता या जवळपास सारख्याच असतात.

 • इयत्ता बारावी मध्ये विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसोबत उत्तीर्ण असणे.
 • इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत वर सांगितलेल्या PCB या तीन विषयांमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असते. काही राखीव प्रवर्गांसाठी यामध्ये 5% सूट दिली जाते.
 • BHMS प्रवेशासाठी वयाची देखील मर्यादा आहे. कमीत कमी वय हे 17 वर्ष आणि जास्तीत जास्त वयाची अट ही 25 वर्ष इतकी आहे.
 • राखीव कॅटेगरी मधून असाल तर तुमच्याकडे त्याविषयी पुरावा असलेले प्रमाणपत्र असावे.
 • अपंग असाल तर त्याविषयी प्रमाणपत्र असणे गरजेचे असते.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे बारावी नंतर घेण्यात येणारी NEET परीक्षा देऊन त्यामध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे असते.

BHMS प्रवेश प्रक्रिया – Entrance Process for BHMS Course in Marathi

मेडिकल क्षेत्रात कोणत्याही पदवीसाठी आता नीट ही परीक्षा आपल्याला द्यावीच लागते. NEET ही केंद्र स्तरावर घेतली जाणारी एक परीक्षा आहे. NEET परीक्षेचा फॉर्म भरून परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क कळतात आणि त्यानुसार मग तुम्ही तुमच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला हव्या असलेल्या खाजगी किंवा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज करू शकतात.

NEET ही परीक्षा केंद्र स्तरावर घेतली जाते आणि जवळपास सर्व मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन हे NEET च्या आधारावर होते. मात्र तरी देखील काही कॉलेजमध्ये BHMS ला ऍडमिशन घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा आहेत. त्या खालीलप्रमाणे –

 • NIH BHMS प्रवेश परीक्षा
 • पंजाब युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (PU CET)
 • आंध्र प्रदेश इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (AP EAMCET)
 • तेलंगाणा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (TS EAMCET)
 • केरळा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल टेस्ट (KEAM)

BHMS कोर्सचा कालावधी – Duration of BHMS Course

BHMS हा इतर मेडिकल पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे 5 वर्षे आणि 6 महिन्यांचा कोर्स आहे. यामध्ये 4 वर्ष 6 महिने शिक्षण आणि नंतर 1 वर्ष इंटर्नशिप असे याचे स्वरूप आहे. काही काळापूर्वी ही इंटर्नशिप सर्वांना सक्तीची नव्हती मात्र आता 1 वर्षाची इंटर्नशिप नाही केली तर मग त्या विद्यार्थ्याला पदवी दिली जात नाही.

BHMS या कोर्सला सत्र पद्धती वापरलेली आहे. प्रत्येक वर्षात दोन सत्र म्हणजे असे एकूण 9 सत्र या BHMS पदवी मध्ये असतात. यातील शेवटची दोन सत्रे सोडली तर 7 सत्र तुम्हाला कॉलेजमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागते.

BHMS नंतर पुढील शिक्षणाच्या संधी

मेडिकल क्षेत्रात आपण BHMS किंवा MBBS झालो म्हणजे सगळे काही सेटल झाले असे नसते. तुम्हाला एका तरी विषयात नैपुण्य प्राप्त करावे लागते. त्यासाठी पुढे काही अभ्यासक्रम असतात आणि हे कोणते पर्याय आहेत याविषयी जाणून घेऊयात.

 • एम डी
 • एम एस्सी
 • पी जी डी एम
 • एम एच ए
 • एम फिल
 • एम एस

FAQ :-

BHMS कोर्स किती वर्षांचा असतो?

BHMS हा मेडिकल मधील पदवी अभ्यासक्रम 5 वर्ष 6 महिने कालावधीचा असतो.

BHMS आणि MBBS मधील फरक काय आहे?

MBBS या कोर्स मध्ये तुम्हाला ऍलोपॅथी विषयी शिकविले जाते तर BHMS कोर्स मध्ये होमिओपॅथी औषध पद्धतीविषयी शिकविले जाते. औषध पद्धती सोडता यामध्ये जास्त काही फरक नाही.

BHMS कोर्स नंतर कोणत्या संधी आहेत?

BHMS नंतर आपण स्वतःचे क्लिनिक सुरू करू शकतो किंवा एखाद्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात आपली प्रॅक्टिस सुरू ठेवू शकतो. याशिवाय प्रोफेसर म्हणून देखील तुम्ही एखाद्या मेडिकल कॉलेजला जॉईन होऊ शकतात.

BHMS कोर्स करण्यासाठी किती खर्च येतो?

BHMS कोर्स करण्यासाठी साधारणतः 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो. यामध्ये तुमचे कॉलेज सरकारी असेल तर खर्च कमी आणि खाजगी असेल तर खर्च जास्त होतो.

Leave a Comment