BDO Full Form In Marathi तुम्ही कधीतरी पंचायत समितीमध्ये एखाद्या कामाला गेला असाल किंवा इतर कुठली ठीकानिंगेला असाल तर “गट विकास अधिकारी” असा शब्द ऐकला असेल किंवा BDO हा शब्द ऐकला असेल. आजच्या लेखात आपण BDO शब्दाबद्दल माहिती बघणार आहोत. BDO म्हणजे काय, BDO full form म्हणजेच बडो लाँग फॉर्म हि सर्व माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
बीडीओ फुल फॉर्म BDO Full Form In Marathi
BDO Full Form In Marathi| BDO Long Form In Marathi :
BDO या शब्दाचा full form म्हणजेच BDO long form in Marathi हा Block Development Officer (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) असा आहे. BDO म्हणजेच Block Development Officer यास मराठीत गट विकास अधिकारी असे म्हणतात.
BDO म्हणजे काय? | What is BDO? :
BDO हा एक सरकारी अधिकारी असतो. आपल्या देशात प्रत्येक जिल्ह्यात अनेक तालुके आहेत. ज्याप्रकारे जिल्ह्यातील प्रशासकीय कामे हा एक IAS अधिकारी बघतो त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्रशासकीय कामे हा एक BDO अधिकारी बघतो. BDO हा जिल्ह्यातील एका भागात म्हणजेच ब्लॉक मध्ये काम करतो म्हणूनच यास Block Development Officer (BDO) असे म्हणतात.
नावाप्रमाणेच BDO चे काम हे त्या विशिष्ट भागाची development करणे म्हणजेच त्या भागाचा विकास करणे हे असते. नेमून दिलेल्या भागात BDO अधिकाऱ्यास विकासाची कामे करावी लागतात आणि त्या भागातील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावा लागत.
जिल्ह्यातील प्रत्येक भागात सरकार एक BDO अधिकारी नेमून देतात. त्या ब्लॉक मधील विकासाची कामे करणे जसे की शाळेचे दुरुस्तीकरण, रस्त्याचे दुरुस्तीकरान, कचरा निर्मूलन, इत्यादी. अशी जी काही सरकारी कामे असतात त्यावर देखरेख करणे आणि ती व्यवस्थितरीत्या पर पडणे हे BDO चे कर्तव्य असते.
सरकारकडून ज्यांकाही नवनवीन योजना येतात त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम BDO करतो आणि प्रत्येक काम हे नीटपणे व्हावे याची जबाबदारी BDO सांभाळतो. अशाप्रकारे ब्लॉक मधील सर्व कामे हाताळणे, त्यांची देखरेख करणे आणि तू कामे पूर्ण होतील याची खात्री करून घेणे आणि त्यासंबंधित रिपोर्ट वरच्या अधिकाऱ्यांना देणे हे काम BDO ऑफिसर करतात.
ब्लॉक क्या पूर्ण विकासाची जबाबदारी BDO कडे असते. BDO अधिकारी ग्रामपंचायत आणि ग्रामविकास काम नेमून देतात आणि गावातील ती कामे पूर्ण झालीत का याचा आराखडा घेतात. याचसोबत BDO अधिकाऱ्यास अजून अधिकार असतात जसे की पंचायत समितीच्या वतीने BDO अधिकाऱ्यास कागदपत्रे तपासण्याचा अधिकार दिला जातो.
BDO अधिकाऱ्यास करारनामा मंजूर करण्याचा अधिकार असतो. BDO अधिकाऱ्यास कर्जाची वसुली करणे आणि खती सांभाळण्याचा अधिकार आहे याचसोबत पंचायतीच्या आर्थिक आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे याचा अधिकार देखील BDO अधिकाऱ्यास असतो.
BDO द्वारे केली जाणारे विविध कामे आपण पुढे बघुया.
BDO ची कार्ये | What does BDO do? : BDO ची कार्ये खालीलप्रमाणे :
- BDO अधिकारी हा आपल्या ब्लॉक मधी कृषी पुरवठा साठवण्याचे आणि वितरित करण्याचे काम करतो.
- BDO अधिकाऱ्यास ग्रामसभा आणि पंचायत समितींच्या सभांना उपस्थित राहावे लागते.
- विकास कार्ये आणि.कार्यक्रम यास BDO अधिकारी उपस्थित राहतो.
- पंचायत समितीतील निधी वितरित करण्याचे काम BDO अधिकाऱ्यास करावे लागते.
- BDO अधिकाऱ्यास पंचायत समितीत निधीमध्ये नियमितता आणायचे जबाबदारी हाताळावी लागते.
- भारत सरकारकडून पणाचातींना वेळोवेळी बांधकाम प्रकल्प दिले जातात. ह्या प्रकलापांना मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण करण्याचे काम BDO कडे असते. हे प्रकल्प सुनिश्चित वेळेत पूर्ण करण्याची जबदती bfo ची असते.
- पर्तेक वर्षी पंचायत समितीस वार्षिक अंदाजपत्रक तयार करावे लागते त्याचे काम BDO अधिकाऱ्यास करावे लागते. त्याचसोबत हे अंदाजपत्रक पंचायत समितीशी शेअर करण्याचे काम BDO चे असते.
- BDO अधिकाऱ्यास प्रत्येक वर्षी पंचायत समितीचा प्रगती अहवाल तयार करावा लागतो आणि तो अहवाल जिल्हा परिषद आणि राज्य सरकार यांच्याकडे पाठवावा लागतो.
- BDO अधिकाऱ्यास सचिव म्हणून पंचायत समित आणि स्थायी समिती यांस वेगवेगळ्या सभांसाठी नोटीस बजावण्याचे काम करावे लागते.
- आपल्या भागात एखादी आप्तकलिन समस्या आल्यास जसे की नैसर्गिक आपत्ती उदा. पुर, भूकंप किंवा आग किंवासाथ आल्यास, अशावेळी त्याचे नियोजन करणे, नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करणे आणि आवश्यक त्या गोष्टींची नागरिकांना पूर्तता करणे ही जबाबदारी बदी अधिकाऱ्याची असते.
How To Become BDO? | BDO कसे बनावे? :
BDO अधिकारी हा तालुक्यातील प्रशासकीय काम बघण्यास नेमून दिलेला अधिक्री आहे. म्हणूनच BDO हि एक सरकारी नोकरी असून BDO अधिकारी बनण्यासाठी सरकारद्वारे घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते.
प्रत्येक राज्य हि एक राज्य सेवा परीक्षा घेते. ही राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास BDO बनत येते.
- राज्य सेव्ह परीक्षेत 3 पायऱ्या असतात –
a. पूर्व परीक्षा
b. मुख्य परीक्षा
c. मुलाखत - वरील तिन्ही टप्प्यात पास झाल्यावर BDO बनत येते.
- महाराष्ट्र राज्यात BDO अधिकारी बनण्यासाठी MPSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा द्यावी लागते.
अशाप्रकारे आपण आजच्या लेखात बघितले की BDO म्हणजे काय, BDO meaning इन मराठी, BDO full form म्हणजेच BDO long form in Marathi काय आहे. याचसोबत आपण बघितले की BDO अधिकाऱ्याची कामे काय असतात, आणि BDO अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या काय असतात आणि BDO बद्दल इतर सर्व माहिती आपण जाणून घेतली आहे.
FAQs – Frequently Asked Questions:
BDO कडे कोणते अधिकार असतात?
भारत सरकारकडून आलेल्या आणीनोरधिकरणाने मंजूर केलेल्या योजना आणि कार्यक्रम व्यवस्थित होत आहे का हे तपासण्याचा अधिकार BDO कडे असतो. तसेच सरकारी करारावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असतो आणि काही प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याचा अधिकार BDO कडे असतो.
BDO अधिकारी पात्रता काय आहे?
BDO ऑफिसर बनण्यासाठी कोणत्याही शाखेतून नामांकित विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
बीडीओचे काम काय आहे?
जिल्ह्यातील ज्या भागात BDO ऑफिसरला नेमून दिलेले असते त्या भागातील म्हणजेच ब्लॉक मधील सर्व सरकारी कामे करणे आणि त्या भागातील विकासाची कांड करणे आणि पायाभूत सुविधा पुरवणे हे काम BDO चे असते.
मी BDO अधिकारी कसा बनू?
BDO बनण्यासाठी राज्याची राज्य सेवा परीक्षा पास होणे आवश्यक असते. महाराष्ट्र राज्यात BDO बनण्यासाठी MPSC (एमपीएससी) पास होणे आवश्यक असते.