बीसीएस फुल फॉर्म BCS Full Form In Marathi

BCS Full Form In Marathi आपल्याकडे BCS कोर्स विषयी अनेकांच्या मनात शंका असतात कारण BCS आणि BSc कॉम्प्युटर सायन्स हे दोन वेगळे क्षेत्र आहेत का याविषयी संभ्रम स्थिती असते. आज आपण BCS या कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. BCS म्हणजे काय, BCS Full Form in Marathi, BCS साठी आवश्यक कागदपत्रे, BCS कोर्स विषयी इतर सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

BCS Full Form In Marathi

बीसीएस फुल फॉर्म BCS Full Form In Marathi

BCS Full Form in Marathi | BCS Long Form in Marathi

BCS हा संगणक क्षेत्रातील पदवी कोर्स आहे. काही विद्यापीठांमध्ये हा कोर्स BSc कॉम्प्युटर सायन्स या नावाने देखील चालविला जातो. म्हणजे यावरून आपल्याला हे तर लक्षात आलेच असेल की या दोन्ही कोर्स मध्ये जास्त काही फरक नाहीये.

BCS शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Bachelor of Computer Science असा होतो. BCS चा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा संगणक शास्त्रातील स्नातक होय.

BCS म्हणजे काय? What is BCS in Marathi?

BCS हा संगणक शास्त्रातील एक पदवी अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात या कोर्सला इंजिनिअरिंग दर्जाचा कोर्स म्हणून ओळख आहे. वेगवेगळ्या भागानुसार आणि विद्यापीठाच्या अनुसार हा कोर्स बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीएस या दोन्ही नावांनी घेतला जातो. या कोर्सच्या नावांप्रमाणे अभ्यासक्रमात देखील काही प्रमाणात बदल आहेत.

BCS हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 6 महिन्याला एक सत्र असते. म्हणजे एकूण कोर्स कालावधीत 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक सत्राला तुमची परीक्षा ही होत असते. ज्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात काहीतरी करायचे आहे किंवा आता जे आयटी क्षेत्र नावारूपाला येते आहे त्या आयटी क्षेत्रात नोकरी करण्याच्या संधी या कोर्स मुळे उपलब्ध आहेत.

BCS कोर्स मध्ये संगणक क्षेत्रातील सर्व भाषा म्हणजेच सी, सी प्लस प्लस, जावा आणि पायथन शिकविल्या जातात. याशिवाय आपल्याला संगणकाची इत्यंभूत माहिती या कोर्स मधून मिळत असते.

BCS पात्रता निकष – Eligibility Criteria for BCS

तुम्हाला जर BCS कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील पात्रता निकष तुम्ही पूर्ण करायला हवेत.

  •  विद्यार्थ्यांची 12 वि किंवा त्याच्याशी समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. डिप्लोमा हा कोर्स देखील बारावी समतुल्य मानला जातो.
  •  इयत्ता बारावी मध्ये तुम्हाला गणित हा विषय असणे आवश्यक आहे कारण संपूर्ण संगणक हे गणित विषयावर अवलंबून असते.
  •  बारावी विज्ञान शाखेतून 45 टक्क्यांहून अधिक गुण असणे आवश्यक आहे.
  •  काही महाविद्यालये या BCS कोर्ससाठी प्रवेश परीक्षा घेत असतात तर त्या प्रवेश परीक्षेला बसून त्यामध्ये पात्र होणे गरजेचे आहे.
  •  काही महाविद्यालयात BCS साठी प्रवेश देताना बारावी मध्ये किंवा डिप्लोमा मध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय आहेत हे बघून देखील प्रवेश दिला जातो. म्हणजे तुमचे शिक्षण कला शाखेत जरी झालेले असले मात्र गणित विषय असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो.

BCS कोर्सचा अभ्यासक्रम – Syllabus of BCS Course

BCS या कोर्समध्ये आपल्याला खालीलप्रमाणे अनेक वेगवेगळ्या संगणकीय भाषा, संगणकीय टूल्स आणि डेव्हलपमेंट टूल्स विषयी शिक्षण मिळते. C Programming, Databases, Data Structure Using C, RDBMS, Software Engineering, System Programming, Operating System, Theoretical Computer Science, Internal Programming, Computer Networks, Java Programming, Computer Graphics या संगणकीय विषयांच्या व्यतिरिक्त BCS कोर्स मध्ये संगणकाला गरजेचे असणारे गणितीय विषय आणि काही इलेक्ट्रॉनिक सायन्स मधील विषय देखील असतात.

BCS नंतर करियरच्या संधी – Career Opportunities After BCS

भारतात सध्याच्या स्थितीला आयटी हे क्षेत्र खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. कोरोना संकट काळात या आयटी क्षेत्राने मोठी भरारी घेतली. अनेकांना यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि आता या आयटी क्षेत्रात असंख्य नोकरीच्या संधी खुल्या झालेल्या आहेत.

BCS कोर्स मधून जास्तीत जास्त विद्यार्थी हे आज आयटी क्षेत्राला मिळत आहेत. आयटी मध्ये जाण्यासाठी पदवी करून BCS हा सर्वात चांगला मार्ग आहे. चांगल्या महाविद्यालयात जर तुमची BCS डिग्री झालेली असेल तर तुम्हाला नक्कीच 4 लाखांच्या पुढेच वार्षिक पॅकेज मिळेल.

मात्र फक्त BCS करून जर नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तुमचे पॅकेज काही कालावधी नंतर वाढेल सुद्धा मात्र त्यानंतर तुम्हाला एक अशी स्थिती समोर येईल जिथे उच्च पदावर काम करण्यासाठी तुमचा अनुभव चांगला असेल मात्र तुमचे शिक्षण झालेले नसल्याने तुम्हाला ते पद मिळणार नाही.

त्यामुळे फक्त BCS करून जॉब कडे जाण्यापेक्षा BCS नंतर पुढील काही उच्च शिक्षण घेऊन मग आयटी क्षेत्रात प्रवेश केला तर भविष्यात याचा फायदा नक्कीच होईल.

BCS नंतर शिक्षणाच्या संधी – Educational Opportunities after BCS

BCS नंतर तुम्हाला MCS किंवा MCA सारख्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. हे दोन्ही संगणक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. याशिवाय DATA SCIENCE, MACHINE LEARNING, ARTIFICIAL INTELLIGENCE सारखे काही पदव्युत्तर शिक्षण देखील उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्यात काही महाविद्यालयात IMCA म्हणजेच INDUSTRIAL MATHEMATICS WITH COMPUTER APPLICATIONS हा नव्याने सुरू झालेला कोर्स देखील आहे. याला M Tech आणि पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा आहे. या IMCA कोर्ससाठी देखील तुम्ही प्रवेश घेऊ शकता.

FAQ

BCS झाल्यानंतर किती पगार मिळू शकतो?

तुमचे जर BCS शिक्षण झालेले असेल तर BCS शिक्षणावर आयटी क्षेत्रात तुम्हाला साधारणतः 3.5 लाख ते 10 लाख इतके पॅकेज मिळू शकते. यामध्ये कमीत कमी पॅकेज हे 3.5 लाख नक्की असते.

BCS कोर्सची फी किती असते?

BCS या कोर्सची फी महाविद्यालये आणि विद्यापीठ यानुसार बदलत असते. तुम्ही जर शासकीय अनुदानित BCS साठी प्रवेश मिळविला तर तुमचा शिक्षण खर्च हा 50 हजारांच्या आत असेल मात्र जर खाजगी महाविद्यालयात नंबर लागला तर हा खर्च 2 ते 3 लाखांपर्यंत येतो.

BCS आणि BSc Computer Science यामध्ये फरक काय आहे?

BCS आणि BSc Computer Science हे दोन्ही संगणक शास्त्र संबंधित पदवी अभ्यासक्रम असून यामध्ये फक्त अभ्यासक्रमात थोडाफार बदल आहे. दोन्ही कोर्सला पुढील प्रवेश प्रक्रियेत किंवा नोकरीच्या ठिकाणी समान दर्जा दिला जातो.

BCA आणि BCS यामध्ये काही फरक असतो का?

BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन होय. तर BCS म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स होय. BCA मध्ये तुम्हाला संगणकाचा वापर करण्यासाठी आणि त्यातून काहीतरी नवीन बनविण्यासाठी शिकविले जाते तर BCS कोर्स मध्ये तुम्हाला संगणकाची थेअरी आणि त्यासोबत काही प्रमाणात त्याचे ऍप्लिकेशन विषयी शिकविले जाते.

Leave a Comment