BCom फुल फॉर्म BCom Full Form In Marathi

BCom Full Form In Marathi इयत्ता बारावी नंतर आणि त्याआधी देखील इयत्ता दहावी नंतर अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याचा मार्ग निवडत असतात. आताच्या काळात मार्क किती आहेत यापेक्षा मुलांचा रस आणि कल कोणत्या क्षेत्रात आहे हे बघून त्यांना पुढे मार्ग दिला जातो. भविष्यात असणाऱ्या करियरच्या संधी देखील तितक्याच जास्त महत्वाच्या असतात.

BCom Full Form In Marathi

BCom फुल फॉर्म BCom Full Form In Marathi

यामध्ये कॉमर्स म्हणजे वाणिज्य हे क्षेत्र देखील आता विज्ञान क्षेत्रासोबत मुलांकडून निवडले जाते आहे. इयत्ता बारावी नंतर आपल्याला कॉमर्स क्षेत्रात जर करियर करायचे असेल तर पदवी साठी BCom हा अभ्यासक्रम आहे. आज आपण Bcom म्हणजे काय, BCom Full Form in Marathi, Bcom प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता निकष, Bcom नंतर नोकरीच्या संधी, Bcom नंतर असलेल्या शिक्षणाच्या संधी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

BCom Full Form in Marathi – BCom Long Form in Marathi

BCom हा पदवी अभ्यासक्रम असून इयत्ता बारावी नंतर आपल्याला यामध्ये प्रवेश घेता येतो. BCom शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Bachelor Of Commerce (बॅचलर ऑफ कॉमर्स) असा होतो. BCom शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा वाणिज्य स्नातक / वाणिज्य शाखेतील पदवीधर असा होतो.

BCom म्हणजे काय? – What is BCom in Marathi?

इयत्ता 11 वि आणि 12 वि मध्ये तुम्ही जर कॉमर्स घेतले असेल तर तुम्हाला पुढील वाट माहिती असते. मात्र ज्यांना बारावी विज्ञान शाखेतून करून देखील आता वाणिज्य शाखेत यायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा बी कॉम हा पदवी अभ्यासक्रम आहे.

3 वर्षे कालावधीचा हा पदवी अभ्यासक्रम आहे. बी कॉम करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर, ऑनलाइन किंवा दूरस्थ असे तीनही मार्ग उपलब्ध आहेत. वाणिज्य क्षेत्रात प्रवेशाचे हे पहिले पाऊल असते. अनेक विद्यार्थी इतर कॉमर्स क्षेत्रातील कोर्सेस न करता याच बी कॉम कोर्स कडे येत असतात.

आपल्याकडे महाराष्ट्रात BCom हा कोर्स दोन वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो. याला बीकॉम ऑनर्स आणि बीकॉम पास किंवा बीकॉम जनरल यामध्ये विभागले गेलेले आहे.

सोबतच अनेक विद्यापीठे ही आपल्याला बीकॉम सोबत एमबीए, एलएलबी आणि सीएमए सारखी कोर्सेस एकत्रित करून देखील शिक्षणाच्या संधी देतात. विज्ञान शाखेत ज्यापद्धतिने स्पेशलायझेशन असते त्या प्रमाणे बीकॉम ऑनर्स मध्ये देखील स्पेशलायझेशन असते. तर बीकॉम जनरल मध्ये मात्र ऑनर्स मधील सर्व विषयांचा वर वर आढावा घेतलेला असतो.

वित्त आणि वाणिज्य यांचा अभ्यासक्रम पूर्णपणे बी कॉम कोर्सेसमध्ये असतो. बी कॉम सारखा कोर्स दूरस्थ देण्याचे कारण म्हणजे सध्या विद्यार्थी CA आणि CS किंवा इतर काही कंपनीतील पदांसाठी अभ्यास करत असताना बी कॉम बाहेरून करतात.

BCom चा इतिहास

बर्मिंघम विद्यापीठातून या BCom पदवीला सुरुवात झाली. विल्यम एशल्ये यांचे नाव देखील इथे सन्मानाने घ्यावे लागेल कारण त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ कॉमर्स या संस्थेची स्थापना केली. बर्मिंघम इथूनच मग पुढे संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगभरात या बी कॉम सारख्या पदवीचा प्रचार आणि प्रसार झाला.

BCom प्रवेशासाठी पात्रता निकष

  •  इयत्ता 11 वि आणि 12 वि मध्ये वाणिज्य शाखेतून शिक्षण झालेले हवे. (काही महाविद्यालयात विज्ञान शाखेतील मुलांना बी कॉम साठी प्रवेश दिला जातो मात्र हे कायम सत्य आहे असे नाही)
  •  प्रत्येक महाविद्यालयाचे कींवा विद्यापीठाचे पात्रता गुण वेगवेगळे असतात. साधारणतः इयत्ता बारावी मध्ये 50% हुन अधिक गुण असणे अनिवार्य असते.
  •  काही विद्यापीठ आणि महाविद्यालय बी कॉम प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेत असतात. ती प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असते.
  •  अनेक महाविद्यालय हे बी कॉम साठी प्रवेश हा इयत्ता बारावी मधील गुणांच्या आधारावर देतात.

BCom पदवीसाठी खर्च

तुम्ही कोणत्या महाविद्यालयात बी कॉम साठी प्रवेश घेता यानुसार तुमची शैक्षणिक फी ठरते. रुपये 5 हजार ते 3 लाख इथपर्यंत तुमचा बी कॉम साठी खर्च असू शकतो. काही महाविद्यालय हे तुम्हाला सरकारी शिष्यवृत्ती मिळवून देतात त्यामुळे त्यांच्या फी जरी जास्त असल्या तरी देखील तुम्हाला मिळालेल्या शिष्यवृत्तीने ती रक्कम कमी होते.

BCom साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय

  •  नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
  •  अमृत बेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
  •  के जे सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स
  •  किशीनचंद चेल्लरम कॉलेज
  •  सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, पुणे
  •  बी के बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स
  •  सेंट मीरास कॉलेज फॉर गर्ल्स
  •  इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
  •  के पी बी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स
  •  एम आय टी- वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
  •  बी एम सी सी, पुणे
  •  एम एम सी सी, पुणे

BCom नंतर नोकरीच्या संधी

बी कॉम नंतर पुढील शिक्षण घेतल्यास चांगल्या स्तरावर नोकरी मिळू शकते मात्र ज्यांना बी कॉम नंतर लगेच नोकरी करायची आहव त्यांच्यासाठी बँक, वाणिज्य, वित्त आणि लेखा क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. इंटर्नशिप साठी तुम्ही कोणत्याही संस्थेत काम करू शकतात.
खालील काही पदांवर तुम्हाला बी कॉम पात्रतेवर नोकरी मिळू शकते.

  •  लेखापाल किंवा ज्युनियर लेखापाल
  •  अकाउंट एक्सिक्यूटिव्ह
  •  बिझनेस एक्सिक्यूटिव्ह
  •  आर्थिक विश्लेषक
  •  कर सल्लागार
  •  आर्थिक सल्लागार
  •  व्यवसाय सल्लागार
  •  लेखा व्यवस्थापक

BCom नंतर शिक्षणाच्या संधी

  •  बी कॉम नंतर तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण म्हणजे एम कॉम करता येते.
  •  एमबीए करायचा असेल तर त्यातही एमबीए सीईटी परीक्षेची तयारी करून घ्यावी लागेल.
  •  बी कॉम नंतर तुम्हाला ACCA, CIMA, CAT, CA, CS, CMA यासारखे वाणिज्य क्षेत्रातील कोर्स करता येतात.
  •  बी कॉम हा पदवी कोर्स असल्याने तुम्हाला पदवी वर देता येणाऱ्या MPSC आणि UPSC सोबग बँकिंग सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते.

FAQ

BCom नंतर किती पगार मिळू शकतो?

BCom च्या पदवीवर जर तुम्ही नोकरीला लागणार असाल तर तुम्हाला वार्षिक 1.75 लाख ते 6 लाख पर्यंत पगार मिळू शकतो.

BCom नंतर काय करावे?

BCom नंतर तुम्ही MBA किंवा MCOM करू शकतात. याशिवाय CA आणि CS सारख्या कोर्सची तयारी करू शकतात. बँकिंग एक्साम देऊ शकतात आणि इंटर्नशिप देखील करू शकता.

BCom कोर्स साठी किती खर्च येतो?

BCom कोर्स साठी साधारणतः 5 हजार पासून 3 लाखांपर्यंत खर्च येतो. महाविद्यालयानुसार यामध्ये बदल होतात.

इयत्ता 12 वि नंतर कॉमर्स क्षेत्रात काय करावे?

इयत्ता बारावी नंतर CA आणि CS सारख्या परीक्षांची तयारी करावी. दूरस्थ अभ्यासक्रमातून तुम्ही BCom साठी प्रवेश घेऊ शकतात. म्हणजे तुमच्याकडे पदवी देखील असेल आणि तुम्ही CA किंवा CS देखील झालेले असाल.

Leave a Comment