बीसीए फुल फॉर्म BCA Full Form In Marathi

BCA Full Form In Marathi आजच्या लेखात आपण BCA full form आणि BCA बद्दल माहिती जाणून घेऊया. तसेच BCA course काय असतो, BCA syllabus म्हणजेच BCA subjects अर्थात BCA कोर्समध्ये कोणते विषय असतात हे जाणून घेऊया.

BCA Full Form In Marathi

बीसीए फुल फॉर्म BCA Full Form In Marathi

BCA full form in Marathi | BCA long form in Marathi

BCA चा full form म्हणजेच BCA long form हा Bachelors’ in Computer Application ( बॅचलर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) असा आहे. हा एक विज्ञान क्षेत्रातील कोर्स आहे. हा कोर्स कॉम्प्युटर्स शी निगडित आहे. याविषयी खाली आपण सविस्तर माहिती बघुया.

BCA म्हणजे काय? | BCA meaning in Marathi

BCA हा कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) कोर्स आहे. यामध्ये कॉम्प्युटर्स निगडित विषय शिकवले जातात. बहूतेक विषय हे Computer Languages असतात आणि काही विषय हे सॉफ्टवेअर संबंधी असतात. त्याबद्दलही आपण माहिती जाणून घेणार आहोतच.

BCA अभ्यासक्रमाचा कालावधी हा 3 वर्षे आहे. हा एक पदवी (Graduation) कोर्स आहे. माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी BCA कोर्स करण्याचे प्रमाण वाढत आहे.

BCA हा कोर्स BE Computer Science (संगणक क्षेत्रातील Engineering पदवी) आणि B.Tech Computer Science (संगणक क्षेत्रातील B.Tech पदवी) हया कोर्स सारखाच आहे फक्त कालावधी आणि काही विषयांचा फरक येतो.

BCA कोर्स बद्दल खालील मुद्दे लक्षात घेऊया

 • BCA हा पदवी अभ्यासक्रम आहे आणि तीन वर्षांचा कालावधी असलेला अभ्यासक्रम आहे.
 • BCA ही सत्र (सेमिस्टर) प्रकारची परीक्षा आहे. म्हणजेच यामध्ये प्रत्येक सत्राला विषय बदलतात, प्रत्येक सत्राला मुख्य परीक्षा होते आणि निकाल हा वेगळा लागतो. तसेच अंतिम पदवी निकालात प्रतेक सत्राचे गुण मिळवले जातात.

BCA साठी पात्रता | Eligibility Criteria for BCA

BCA हा पदवी अभ्यासक्रम आहे आणि यासाठी लागणारी पात्रता म्हणजे Eligibility जाणून घेऊया. BCA मधे प्रवेश घेण्यासाठी नामांकित विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12 नसेल तर 12 वी समांतर डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या अभ्यासक्रमासाठी वाणिज्य, कला आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रातून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. सहसा, विज्ञान क्षेत्राची पार्श्वभूमी असेल तर अभ्यासक्रम समजायला सोपा जातो कारण बराचसा अभ्यासक्रम हा विज्ञान क्षेत्राशी आणि विशेषतः गणीताशी निगडित येऊ शकतो.

BCA मध्ये प्रवेशासाठी काही कॉलेज प्रवेश परीक्षा ठेवतात. ती परीक्षा पास होणे आणि त्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाल्यास प्रवेश दिला जातो. कॉलेज मध्ये प्रवेश परीक्षेनंतर मुलाखतही घेतली जाऊ शकते पण सहसा त्याची शक्यता कमी असते.

काही कॉलेज मध्ये 12 वी क्या टक्केवारीवर आधारित प्रवेश दिला जातो. कुठल्याही प्रकारची प्रवेश परिक्षा घेतली जात नाही. प्रत्येक कॉलेजची प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश पात्रता ही वेगळी असू असू शकते. त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्या कॉलेजच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती जाणून घ्यावी. बहूतेक सर्वच कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती दिलेली असते.

BCA प्रवेश प्रक्रिया | BCA Entrance Exams

प्रत्येक विद्यापीठासाठी प्रवेश परीक्षा असेलच असे नाही पण खाली काही विद्यापीठाच्या परीक्षा बघुया :

● AIMA UGAT – Undergraduate Aptitude Test

AIMA.UGAT ही परीक्षा BCA प्रवेशासाठी घेतली जाते. हि परीक्षा भारतातील बहुतेक विद्यापीठामध्ये लागू पडते.

● SUAT – Sharda University Aptitude Test

SUAT हि परीक्षा शारदा युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे

● BUMAT – Bharati Vidyapeeth

BUMAT हि परीक्षा भरती विद्यापीठात BCA साठी प्रवेश घेण्यासाठी आहे.

BCA विषय | BCA Syllabus

BCA अभ्यासक्रम हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित (IT) आहे म्हणून यातील बहुतेक विषय हे संगणक आणि तंत्रज्ञान निगडित आहेत.

खालील यादीत BCA मधील सर्वसामान्य विषय दिले आहेत:

 1. Database Management Tools (डेटाबेस मॅनेजमेंट टूल्स)
 2. Foundational Mathematics (फाउंडेशनल मॅथेमॅटिक्स)
 3. Computer Architecture (कम्प्युटर आर्किटेक्चर)
 4. Discrete Mathematics (डीस्क्रिट मॅथेमॅटिक्स)
 5. Operating Systems (ऑपरेटिंग सिस्टम्स)
 6. Web Technology (वेब टेक्नॉलॉजी)
 7. Software Engineering (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग)
 8. Computer Languages like C (सी), C++ (सी प्लस प्लस), HTML (एच टी एम एल), Java (जावा), Python (पायथन).

BCA नंतरचे करिअर | Career After BCA

आजच्या काळात IT (Information Technology) हे क्षेत्र सर्वात जास्त वेगवान आहे. या क्षेत्रात सर्वात जास्त नोकऱ्या उपलब्ध आहे तसेच IT कंपन्यांची संख्याही खूप जास्त आहे. म्हणूनच BCA केल्यानंतर करिअर खूप उत्कृष्ट बनू शकते.

BCA पदवीधरांना खाजगी कंपन्यांमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. आपल्या भारतात खूप साऱ्या खाजगी कंपन्या आहेत त्यामुळे BCA केल्यानंतर भारतात सहजपणे नोकरी मिळून जाते. Infosys, TCS, Oracle, Wipro इत्यादी कंपन्यांमध्ये BCA पदवीधरांना नोकरी दिली जाते. या कंपन्यांमध्ये नोकरी साठी अर्ज करावा लागतो.

प्रत्येक कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला लागू पडणाऱ्या पदावर अर्ज करावा. त्यानंतर त्यांच्या काही टेस्ट म्हणजेच परीक्षा होऊ शकता आणि मुलाखत फेरी देखील होऊ शकते. बहूतेक कंपन्या ह्या टेस्ट आणि.मुलाखत अश्या दोन्ही फेऱ्या घेतात. त्यात तुमचे विषयातील ज्ञान, अभ्यास आणि सखोलता तपासली जाते. दोन्ही फेऱ्या पास झाल्यावर तुम्हाला नोकरीवर रुजू केले जाते.

BCA पदवी नंतर अनेक पर्याय आहेत, जसे की MCA – Master of Computer Application (एमसीए – मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), विद्यापीठात, महाविद्यालयात किंवा शाळेत शिक्षक किंवा शिक्षक म्हणून काम करणे, वेब डिझायनर म्हणून काम करणे इ.

BCA पदवीधरांना केवळ खासगी कंपन्यांमधूनच नव्हे तर सार्वजनिक संस्थांमधूनही नियुक्त केले जाते. भारतीय वायुसेना (IAF), भारतीय नौदल आणि भारतीय सैन्य यांसारख्या सरकारी संस्था देखील त्यांच्या IT विभागांसाठी मोठ्या संख्येने संगणक व्यावसायिकांची नियुक्ती करत आहेत. त्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती घ्यावी.

नोकरी करण्यात रस नसेल किंवा पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी देखील पर्याय उपलब्ध आहेत :

 • MCA – Master of Computer Application (एमसीए- मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)
 • MCS – Master of Computer Science (एमसीएस – मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स)
 • MBA – Master of Business Administration (एमबीए – मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन )

अशाप्रकारे आपण BCA या कोर्स विषयी सर्व माहिती जाणून घेतली आहे. आशा आहे की तुम्हाला ती उपयोगी पडली असेल.

FAQs – Frequently Asked Questions

बारावीनंतर बीसीए चांगले आहे का?

विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 12वी नंतर बी.टेक आयटी आणि बीसीए हे दोन्ही उत्तम पर्याय असू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम उमेदवारांसाठी उत्तम करिअर संधी आणि जवळपास समान स्तरावरील वेतन पॅकेज प्रदान करतात.

बीसीए भविष्यासाठी चांगले आहे का?

संगणक प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपिंगच्या क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी हे खूप चांगले आहे. बीसीए पदवी घेतलेल्या व्यक्तीला मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळू शकते. बीसीएचा विद्यार्थी एमसीए किंवा एमबीए सारख्या पुढील अभ्यासासाठी देखील जाऊ शकतो. एखाद्या चांगल्या कॉलेजमधून केले तर ते फायदेशीर आहे.

Leave a Comment