बीएआरसी फुल फॉर्म BARC Full Form In Marathi

BARC Full Form In Marathi भाभा अटॉमीक रिसर्च सेंटर हे नाव तर अनेकांच्या परिचयाचे, मात्र BARC विषयी थोडासा संभ्रम हे नाव वाचण्याआधी होता ना? आज आपण BARC म्हणजे काय, BARC चा फुल फॉर्म काय आहे, BARC चा अणुऊर्जा कार्यक्रम, आणि BARC विषयी इतर काही माहिती जाणून घेणार आहोत.

BARC Full Form In Marathi

बीएआरसी फुल फॉर्म BARC Full Form In Marathi

BARC Full Form in Marathi । BARC Long Form in Marathi

भारताची अणू क्षेत्रातील यशस्वीतेसाठी सदैव कार्यरत असलेली संस्था म्हणजे BARC होय. भारतात झालेल्या अणू चाचणीचे पूर्ण श्रेय हे BARC या संस्थेला जाते. BARC शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Bhabha Atomic Research Center (भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर) असा होतो. BARC शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा भाभा अणू संशोधन केंद्र असा आहे.

BARC म्हणजे काय? – What is BARC in Marathi?

भारतातील सर्वात प्रमुख अणु संशोधन केंद्र म्हणून BARC ओळखली जाते. BARC ची स्थापना होमी जहांगीर भाभा अणुऊर्जा आस्थापना म्हणजे AEET अंतर्गत करण्यात आली होती. BARC च्या स्थापनेचा उद्देश्य हा भारतात पुढे घडणाऱ्या अणू चाचण्या आणि अणु विषयक कार्यक्रम हाताळण्यासाठी एक बहुविद्याशाखीय संशोधन कार्यक्रम असणे हा होता.

मात्र पुढे जाऊन याच AEET चे नाव बदलून BARC म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर असे करण्यात आले. भारतात केंद्रस्थानी असलेल्या DAE म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ अटॉमीक एनर्जी उर्फ परमाणू ऊर्जा विभागाच्या अंतर्गत BARC चालवली जाते. म्हणजेच BARC च्या अध्यक्षस्थानी देखील भारताचे पंतप्रधान असतात.

BARC चा इतिहास – History of BARC

डॉ होमी जहांगीर भाभा हे नाव भारताच्या वैज्ञानिक वृद्धीमध्ये सर्वात जास्त महत्वाचे आहे. भारतात आण्विक कार्यक्रम असा असे त्यांचे मत होते आणि त्यासाठीच त्यांनी सुरुवातीला TIFR म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची स्थापना केली. आपण जे AEET वर बघितले त्याची स्थापना याच TIFR अंतर्गत करण्यात आली.

जानेवारी 1954 मध्ये AEET ची स्थापना झाली ज्यातून अणुऊर्जा आणि अणु चाचण्यांसाठी एक बहुआयामी संशोधन कार्यक्रम आखण्यात आला. AEET मधूनच अणु विषयक अनेक संशोधने पार पडली. 1955 साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यक्षपद देखील डॉ होमी भाभा यांना त्यांच्या अणू क्षेत्रातील संशोधनासाठी देण्यात आले होते.

1966 हे वर्ष म्हणजे डॉ होमी भाभा यांचे निधन झाले. डॉ होमी भाभा यांना आदरांजली म्हणून त्यांचे नाव या AEET ला देण्यात आले. तेव्हा पासून AEET ही संस्था BARC म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणून ओळखली जाऊ लागली.

डॉ होमी भाभा माहिती – Dr Homi Bhabha Information

  • पूर्ण नाव- डॉ होमी जहांगीर भाभा
  • जन्म – 30 ऑक्टोबर 1909
  • मृत्यू – 24 जानेवारी 1966
  • पुरस्कार – पद्मभूषण (1954)
  • शिक्षण – केंब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकी
    – गणितात पॉल डीरॅक यांच्या हाताखाली
    – न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये पीएचडी (कॅव्हेंडिश लॅबोरेटरी)

 

भारतातील अणुऊर्जा कार्यक्रम – Nuclear Program of India under BARC

पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली होती. 1956 साली ट्रोम्बे येथे अप्सरा ही भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी उभारली गेली. भारताला अणुशक्ती बनविण्यामध्ये या मैलाच्या दगडांचा फार मोलाचा वाटा आहे.

भारताचा संपूर्ण अणुऊर्जा विकास कार्यक्रम हा शांतता राखून होत होता. त्यातून कोणत्याही प्रकारे विघातक कृत्य करण्याचा भारताचा कधीही विचार नसतो. सायरस आणि झर्लिना या पुढील काळात निर्माण झालेल्या काही अणु भट्टी होत्या. आपण परमाणू चित्रपट जर बघितला असेल तर त्यात आपल्याला अणू चाचणी विषयी माहिती मिळेल.

डॉ होमी भाभा यांची 1965 साली एक मुलाखत झाली होती तेव्हा त्यांनी भारताच्या अणुशक्ती विषयी माहिती देताना उदगार काढले होते की जर आम्हाला परवानगी मिळाली तर 18 महिन्यात अणुबॉम्ब आम्ही बनवू शकतो मात्र या अनुशक्तीचा वापर असा विघातक न करता त्याचा वापर ऊर्जा, मेडिकल आणि कृषी क्षेत्रात कसा करता येईल हे आमचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

भारतातील पहिली अणूचाचणी – First Nuclear Test of India

भारतात झालेली पहिली अणूचाचणी म्हणजे पोखरण -1 होय. पंजाब मधील पोखरण येथे जमिनीच्या खाली जवळपास 107 मीटर अंतरावर एका मोठ्या अण्वस्त्राची चाचणी घेण्यात आली. तो दिवस म्हणजे 18 मे 1974 होय.

त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती आणि त्यामुळे या मोहिमेला ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा असे एक सांकेतिक नाव देण्यात आले होते. जेव्हा ही चाचणी घेण्यात आली तेव्हा फक्त पंतप्रधान, त्यांचे स्वकीय आणि काही शास्त्रज्ञ यांनाच याविषयी संपूर्ण माहिती होती.

ही मोहीम अतिशय गुप्त रीतीने चालवत भारत हा जगातील 6 वा अणुशक्ती असलेला देश बनला होता. याआधी रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस आणि जवळील देश चायना यांनी अणूचाचण्या घेतलेल्या होत्या.

यानंतर मात्र जगाच्या राजकारणात भारताचे वर्चस्व वाढण्यास सुरुवात झाली. अमेरिका सारख्या देशाला देखील याविषयी भीती वाटू लागल्याने त्यांनी न्यूक्लियर सप्लायर ग्रुप म्हणून एक समूह बनविला ज्यामध्ये त्यांचे नियंत्रण या सर्व देशांवर असू शकेल.

पुढील काळात ज्या देशांनी चाचण्या केल्या नव्हत्या त्यांना परवानगी देखील देण्यात आली नाही तरी अनेक राष्ट्रांनी अणु चाचण्या गुप्त पद्धतीने पार पाडल्या. पाकिस्तान सारख्या देशाला भारताची भीती वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी इतर राष्ट्रांकडून अण्वस्त्राची मागणी सुरू केली.

FAQ

BARC ची स्थापना कधी करण्यात आली?

1954 साली अणुऊर्जा प्रतिष्ठान, ट्रॉम्बे (AEET) ची स्थापना करण्यात आली आणि पुढे डॉ होमी भाभा यांच्या निधनानंतर AEET चे नाव बदलून BARC करण्यात आले.

भारतात अणु उर्जेतून वीज निर्मितीचा वाटा किती आहे?

भारतात अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अणुऊर्जेच्या वाटा 14.5% आहे. भारतात अणुऊर्जा निर्मिती ही 44,237 मेगावॅट इतकी केली जाते.

BARC मधील अणुभट्ट्या कोणत्या आहेत?

अप्सरा, अप्सरा यु, झर्लिना, ध्रुवा, पौर्णिमा -1, पौर्णिमा - 2, पौर्णिमा - 3, सायरस या काही BARC अंतर्गत चालणाऱ्या अणुभट्ट्यांची नावे आहेत.

BARC ची स्थापना कोणी केली? / भारतीय अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?

BARC म्हणजेच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर ची स्थापना डॉ होमी जहांगीर भाभा यांनी केली.

Leave a Comment