BAMS फुल फॉर्म BAMS Full Form In Marathi

BAMS Full Form In Marathi मेडिकल क्षेत्रातील BAMS हा एक पदवी अभ्यासक्रम असून मेडिकल क्षेत्रात याला किती महत्व आहे, BAMS हा कोर्स काय आहे, BAMS म्हणजे काय, BAMS चा फुल फॉर्म काय आहे, BAMS कोर्स साठी प्रवेश पात्रता काय आहेत, BAMS साठी भारतातील सर्वात चांगली कॉलेजेस आणि BAMS चे वेतन किती असते याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

BAMS Full Form In Marathi

BAMS फुल फॉर्म BAMS Full Form In Marathi

BAMS Full Form in Marathi | BAMS Long Form in Marathi

MBBS प्रमाणे BAMS हा देखील एक मेडिकल क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम असून MBBS नंतर BAMS या कोर्सला स्थान दिले जाते.
BAMS शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) असा होतो.

या कोर्स मध्ये आयुर्वेदिक औषधे आणि सर्जरी याविषयी शिक्षण दिले जाते. BAMS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा आयुर्वेद, वैद्यक आणि शस्त्रक्रिया पदवी असा होतो.

BAMS म्हणजे काय? What is BAMS in Marathi?

BAMS ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी असून BAMS पदवीधर व्यक्तीला डॉक्टर ही पदवी लावता येते. BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी होय.

आयुर्वेदिक औषधे आणि शस्त्रकिया यांचे प्रशिक्षण या कोर्से मध्ये दिले जाते. BAMS हा पदवी अभ्यासक्रम 5 वर्षे 6 महिने कालावधीचा आहे. आपल्याला BAMS नंतर स्वतःची प्रॅक्टिस देखील करता येते किंवा BAMS नंतर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये नोकरी देखील करू शकतो.

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबून त्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी BAMS कोर्सला सुरुवात केली आणि याला पाठबळ देखील दिले.

BAMS कोर्स विषयी थोडक्यात – Short Info about BAMS Course

  • अभ्यासक्रमाचा स्तर – पदवी
  • कालावधी – 5 वर्षे 6 महिने
  • प्रवेश परीक्षा – वार्षिक
  • प्रवेश परीक्षा यादी- NEET (महत्वाची), IPU CET, KEAM
  • पात्रता निकष – 12 वि मध्ये विज्ञान शाखेतून जीवशास्त्र विषयासोबत 60% हुन अधिक गुण
  • प्रवेश – प्रवेश परीक्षा आणि बारावी गुण
  • शिक्षण खर्च – 2 लाख ते 15 लाख

BAMS कोर्स साठी प्रवेश पात्रता – Eligibility Criteria for BAMS Course

तुम्हाला जर BAMS कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता बारावी विज्ञान शाखेत तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असायला हवेत. इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 60% हुन अधिक गुण असणे देखील अनिवार्य आहे.

BAMS साठी होणारे प्रवेश हे इयत्ता बारावीच्या गुणांवरून होत नाही. त्यासाठी तुम्हाला नीट ही केंद्राकडून घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते. या नीट परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे तुम्हाला BAMS साठी प्रवेश दिला जातो. याला अपवाद देखील आहे. भारतात आणि भारताच्या बाहेर अशी अनेक महाविद्यालय आहेत ज्यांमध्ये NEET परीक्षा दिलेली नसेल तरी BAMS साठी प्रवेश दिला जातो.

BAMS चांगले की MBBS – BAMS vs MBBS Marathi

MBBS मध्ये तुम्हाला सर्वच आजाराचे उपचार माहिती आहेत मात्र त्यामध्ये तुम्हाला अनैसर्गिक औषधांचा वापर करावा लागतो मात्र BAMS मध्ये आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदिक औषधें यांचा वापर करून उपचार केले जातात. मिळणाऱ्या पगारात जर आपण बघितले तर MBBS डॉक्टर हा कधीही BAMS पेक्षा जास्त पैसे कमवत असतो.

BAMS डॉक्टर साधारणतः 50 हजार प्रति महिना कमवत असेल तर MBBS डॉक्टरला त्याच्या दुप्पट वेतन नक्की असते. MBBS हा NEET परीक्षा पत्र झालेल्या उमेदवाराचा पहिला पर्याय असतो मात्र त्यानंतर जर MBBS ला प्रवेश मिळाला नाही तर लोक BAMS कडे जातात. मात्र आयुर्वेदात जर एखाद्याला रस असेल तर त्याने सरळ BAMS कोर्सला प्रवेश घेणे कधीही चांगले.

MBBS हा कोर्स BAMS पेक्षा उच्च दर्जाचा असून यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे शिक्षण मिळून शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार असतो. मात्र BAMS मध्ये अतिशय कठीण स्थितीतच फक्त शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

NEET प्रवेश परीक्षा अर्ज आणि पात्रता निकष

नीट ही केंद्र स्तरावर घेतली जाणारी परीक्षा असून या परीक्षेसाठी आपल्याला सुरुवातीला प्रवेश अर्ज भरावा लागतो. जुलै महिन्यात हे अर्ज साधारणतः सुरू होतात आणि यामध्ये कोव्हिडं काळामुळे थोडेफार बदल देखील होऊ शकतात. NEET परीक्षा अर्जाची प्रवेश फी सामान्य गटासाठी 1500 रुपये तर SC आणि ST प्रवर्गासाठी 800 रुपये इतकी असते.

प्रवेश अर्ज भरत असताना विद्यार्थी ही बारावी मध्ये शिकत असू शकतो. त्याला बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तीन विषय आणि इंग्रजी विषय असणे गरजेचे आहे. बारावी मध्ये शिकत असताना जरी आपण प्रवेश अर्ज भरत असलो तरी देखील बारावी मध्ये 50 ते 60% आपल्या कॅटेगरी नुसार टक्केवारी असेल तरच पुढे प्रवेश मिळतो.

NEET परीक्षेसाठी जास्तीत जास्त वयाची अट आहे. 20 वर्षे वयाच्या खाली असलेले विद्यार्थी फक्त नीट साठी अर्ज करू शकतात. SC आणि ST सारख्या आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये 4 वर्षे सूट दिलेली आहे.

BAMS कोर्स साठी महाविद्यालय

  •  आयुर्वेद विद्यालय पुणे
  •  डॉ डी वाय पाटील विद्यापीठ पुणे
  •  डॉ आयुर्वेद, डी वाय पाटील कॉलेज

भारतात सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आहे. याच कौन्सिल अंतर्गत भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत. भारतात एकूण 247 BAMS महाविद्यालय आहेत. यातील फक्त 38 महाविद्यालये सरकारी आहेत. खाजगी महाविद्यालय मध्ये BAMS कोर्सची फी खूप जास्त असते.

FAQ

BAMS म्हणजे काय?

BAMS ही एक वैद्यकीय क्षेत्रातील पदवी असून याचा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा आहे.

BAMS शिक्षणासाठी किती खर्च येतो?

BAMS साठी तुमचा नंबर जर सरकारी शासकीय महाविद्यालयात लागला तर जास्तीत जास्त सगळा खर्च हा 2 लाख रुपये इतका येतो. BAMS साठी खाजगी महाविद्यालयात 5 लाख ते 25 लाखांपर्यंत खर्च येतो.

BAMS नंतर कोणते जॉब्स उपलब्ध आहेत?

BAMS झाल्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सक, आयुर्वेदिक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, विक्री प्रतिनिधी, फार्मासिस्ट यासारखे विविध जॉब्स उपलब्ध आहेत.

BAMS झाल्यानंतर किती वेतन मिळू शकते?

BAMS झाल्यानंतर त्या डॉक्टरला वर्षात 4 लाख रुपये ते 12 लाख रुपये वेतन मिळू शकते. पुढे जर अधिक शिक्षण घेतले तर यामध्ये अधिक वाढ होऊ शकते.

Leave a Comment