B.Tech Full Form In Marathi : B Tech हे नाव अनेकांनी शिक्षण क्षेत्रात ऐकलेले असेल मात्र B Tech म्हणजे नक्की काय, B Tech चा फुल फॉर्म काय असतो, B Tech साठी पात्रता निकष, B Tech मध्ये स्पेशलायझेशन, B Tech साठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाविद्यालय, B Tech नंतर नोकरीच्या संधी याविषयी आजच्या या लेखामधून जाणून घेणार आहोत.
बी.टेक. फुल फॉर्म B.Tech Full Form In Marathi
B Tech Full Form in Marathi । B Tech Long Form in Marathi
आपल्याकडे काही महाविद्यालयात हा कोर्से BE म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या नावाने चालविला जातो आणि क्वचित काही महाविद्यालयात तुम्हाला B Tech ही डिग्री मिळते.
B Tech शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Bachelor of Technology (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) होतो. B Tech शब्दाचा मराठी भाषेत Full Form तंत्रज्ञान क्षेत्रातील स्नातक असा होतो.
B Tech म्हणजे काय? – What is B Tech in Marathi?
बी टेक म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी होय. हा शब्दच तसा लॅटिन भाषेतील बॅकॅलॉरियस टेक्नॉलॉजी या शब्दावरून आलेला आहे. बाहेरील देशांमध्ये आपल्याकडे चालणाऱ्या BE सारख्या कोर्सचा विद्यार्थ्यांना B Tech ही डिग्री आधीपासून दिली जात होती. आता भारतात देखील BE ही डिग्री न देता बी टेक डिग्री देण्याची प्रथा सुरू करण्यात आलेली आहे.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील व्यावसायिक 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणजे B Tech होय. आपल्याकडे इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. भारतातून B Tech डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात जास्त आहे.
B Tech साठी पात्रता निकष – Eligibility Criteria for B Tech
B Tech हा पदवी अभ्यासक्रम इयत्ता बारावी नंतर करता येतो. यासाठी काही केंद्र स्तरावर तर काही राज्य स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
- B Tech करण्यासाठी विद्यार्थ्याने बारावी परीक्षा ही विज्ञान शाखेतून पास केलेली असावी.
- बारावी मध्ये विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे तीन विषय असायला हवेत.
- PCM हा ग्रुप त्यांचा 60% च्या वर भरायला हवा.
- केंद्र स्तरावर लागू असलेल्या JEE MAINS आणि JEE Advance या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतील.
- राज्य स्तरावर CET सारख्या परीक्षा द्याव्या लागतील.
- याशिवाय अनेक महाविद्यालये हे स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात तर त्या देखील तुम्हाला देणे गरजेचे असते.
B Tech साठी प्रवेश आणि प्रवेश परीक्षा – Admission and Entrance Exams For B Tech
भारतातील केंद्र स्तरावर व्यावसायिक तांत्रिक शिक्षण हे AICTE आणि NBA अंतर्गत येते. AICTE म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद होय, तर NBA म्हणजे राष्ट्रीय मान्यता मंडळ होय. या दोन संस्था केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर देखील B TECH किंवा इतर तंत्रशिक्षण कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा घेतात.
JEE –
JEE म्हणजे जॉईंट एन्ट्रान्स एक्साम होय. देशातील उच्च दर्जाच्या NIT, IIT, JFTI सारख्या संस्थांमध्ये बी टेक प्रवेशासाठी JEE परीक्षा घेतल्या जातात. JEE ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते त्याला JEE Mains आणि JEE Advance या नावाने ओळखतात. आधी विद्यार्थी JEE Mains देतात आणि मग त्यानंतर JEE Mains पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची JEE Advance परीक्षा घेतली जाते.
JEE Advance परीक्षा पात्र करणाऱ्या विद्यार्थ्याला मग IIT सारख्या संस्थांमध्ये त्यांच्या क्रमवारी नुसार बी टेक साठी प्रवेश दिला जातो.
VITEEE –
व्ही आय ट्रिपल ई म्हणून ही परीक्षा अनेकांच्या परिचयाची असेल. VITEEE ही एक संस्था आहे आणि त्यांच्या देशातील बी टेक प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयासाठी प्रवेश परिक्षा ते स्वतः घेत असतात. ही परीक्षा देखील संपूर्ण देशात घेतली जाते.
MHT CET –
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या मार्फत महाराष्ट्र राज्य स्तरावर घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे MHT CET होय. या परीक्षेतून तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील अनेक बी टेक महाविद्यालयात प्रवेश घेता येतो.
याशिवाय थोड्याफार खाजगी संस्था देखील आहेत ज्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा स्वतः घेतात.
B Tech कोर्सचा कालावधी – B Tech Course Duration
बी टेक हा अभियांत्रिकी क्षेत्रातील कोर्स 4 वर्षे कालावधीचा आहे. बी टेक संबंधित तांत्रिक शिक्षणातील प्रत्येक विषयाचे शिक्षण या कोर्सच्या माध्यमातून मिळते. बी टेक हा कोर्स लेखी आणि प्रात्यक्षिक या दोन्ही बाजूनी विद्यार्थ्याला घडवत असतो.
B Tech स्पेशलायझेशन
- एरोस्पेस इंजिनिअरिंग
- एरोनॉटिकल इंजिनिअरिंग
- ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
- ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग
- बायोमेडिकल इंजिनिअरिंग
- बायोटेक इंजिनिअरिंग
- बायो केमिकल इंजिनिअरिंग
- केमिकल इंजिनिअरिंग
- सिव्हिल इंजिनिअरिंग
- कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग
- इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
- इंफॉर्मशन्स टेक्नॉलॉजी
- मरिन इंजिनिअरिंग
- मॅकेनिकल इंजिनिअरिंग
- नॅनो टेक्नॉलॉजी
- न्यूक्लीअर इंजिनिअरिंग
- जेनेटिक इंजिनिअरिंग
- सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
भारतातील B Tech साठी प्रसिद्ध महाविद्यालय – Top B Tech Colleges in India
भारतात बी टेक साठी सर्वात चांगले प्रशिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून फक्त IIT, NIT सारख्या संस्थांकडे बघितले जाते. खाली काही प्रसिद्ध महाविद्यालय आणि संस्थांची यादी देतो आहे मात्र याशिवाय इतर काही महाविद्यालये देखील महाराष्ट्र राज्यात नावाजलेली आहेत.
- आयआयटी मद्रास
- आयआयटी मुंबई
- आयआयटी खरगपूर
- आयआयटी दिल्ली
- आयआयटी कानपूर
- आयआयटी रूरकी
- आयआयटी हैद्राबाद
- आयआयटी गांधीनगर
- आयआयटी रोपार-रुपनगर
- आयआयटी पटना
FAQ
