एटीएस फुल फॉर्म ATS Full Form In Marathi

ATS Full Form In Marathi फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला आतंकवाद म्हणजेच दहशतवाद या समस्येचा सामना करावा लागत आहे. आज जगासमोर उभे ठाकलेले हे आव्हान पेलण्यासाठी भारतात ATS या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आज आपण ATS म्हणजे काय, ATS Full Form in Marathi, ATS चे कार्य, ATS जॉईन कशी करतात, ATS ऑफिसर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ATS Full Form In Marathi

एटीएस फुल फॉर्म ATS Full Form In Marathi

ATS Full Form in Marathi || ATS Long Form in Marathi

पोलीस दलातील एक विशेष पथक म्हणजे ATS होय. हे पथक दहशतवाद संबंधित कार्यवाही चौकशी आणि शिक्षा संदर्भात कार्यरत असते.ATS शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Anti-Terrorism Squad (अँटी टेररिझम स्कॉड) असा आहे. ATS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा दहशतवाद विरोधी पथक असा आहे. यालाच आतंकवाद विरोधी पथक म्हणून देखील ओळखतात.

ATS म्हणजे काय? – What is ATS in Marathi?

ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड होय. यालाच आपण दहशतवाद विरोधी पथक म्हणून ओळखतो. महाराष्ट्र राज्यात तसेच भारतातील प्रत्येक राज्यात हे ATS पथक स्थापन करण्यात आलेले आहे.

TS पथकाचा उद्देश हा देशात घडणाऱ्या आतंकवादी कार्यवाया शोधून त्यांना तिथेच थांबविणे हा आहे. भारतात मुंबई हे काही काळापूर्वी दहशतवादाचे केंद्र बनत चालले होते आणि त्यामुळे मुंबई मध्ये सर्वात आधी ATS ची स्थापना करण्यात आली होती.

ATS फक्त राज्यसाठी काम करते असे नाही तर ATS आणि आंतरराष्ट्रीय संघटना, राष्ट्रीय गुप्तहेर संघटना जसे की आयबी आणि रॉ यांच्यासमवेत संपर्क ठेवण्याचे काम देखील ATS करते. आपल्याकडील माहिती या संघटनांना देणे आणि त्यांच्याकडे असलेली माहिती आपल्या उपयोगासाठी वापरण्याचे मुख्य कार्य ATS करते. राष्ट्र सुरक्षा हे ATS चे मुख्य ध्येय आहे.

ATS चा इतिहास – History of ATS

ATS या पोलीस दलातील एका विशेष दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून ATS ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी हे सर्व काही मुंबई पोलीस आयुक्त आफताब अहमद खान यांच्या हाताखाली घडले. ATS स्थापनेचा सर्वात महत्वाचा उद्देश्य हा मुंबई उपनगरातील गुन्हेगारी थांबविणे हा होता.

जवळपास सगळ्या दहशतवादी घटना या मुंबई सोबत संबंधित असत. त्यामुळे मुंबई मधून जर आतंकवादला आळा घातला तर कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातील आतंकवाद ही समस्या नष्ट होईल, हे पोलीस दलाच्या लक्षात आल्याने मुंबई मध्ये ATS या दलाची स्थापना करण्यात आली.

ATS ची स्थापना ही SWAT या लॉस एंजलीस मधील एका संस्थेच्या कार्याला बघून करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथील ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल वर झालेल्या हल्ल्यात ATS ने महत्वाची भूमिका बजावत अनेक मनुष्यजीव वाचविले होते.

ATS ची कार्ये – Functions of ATS

  • राज्यात आणि संपूर्ण देशभरात घडणाऱ्या राष्ट्र विरोधी कार्या वर लक्ष ठेवून असणे आणि दहशतवाद विरोधी मोहीम आखणे.
  • ATS ही गुप्तचर संघटनेसारखी कार्य करत असते. त्यांचे दहशतवादी गटांच्या गोटात जाऊन माहिती मिळवण्याचे प्रयत्न असतात.
  • ATS फक्त दहशतवाद नव्हे तर NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सोबत देखील जोडलेले असते आणि NCB सोबत समन्वय साधून त्यांना त्यांच्या कार्यात मदत देखील करते.
  • ATS देशातील आयबी आणि रॉ सोबत समन्वय ठेवते. त्यांच्यासोबत देखील समन्वयाने ATS मोहिमा आखत असते.
  • खोट्या नोटा आणि अमली पदार्थ यावर देखील ATS चे लक्ष असते.
  • 26/11 सारखा हल्ला घडला तर त्यावेळी नागरिकांची मदत करून दहशतवाद्यांना पकडणे.
  • दहशतवादी हल्ले होण्याआधी असे कट उधळून लावणे.

ATS मध्ये भरती – How To Join ATS?

ATS हे पथक त्या राज्याच्या अंतर्गत सुरक्षेविषयी मुद्दा आहे. यासाठी वेगळी अशी काही परीक्षा होत नसते. राज्याच्या पोलीस दलाची होणारी भरती किंवा लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमधून भरती होणारे अधिकारी या पथकात सामील होऊ शकतात.

पोलीस दलात भरती झाल्यानंतर ATS साठी काही चाचण्यामधून तुम्हाला जावे लागेल. एक शारीरिक चाचणी, मानसिक चाचणी आणि जनरल नॉलेज विषयी चाचणी तुम्हाला दयावी लागेल. या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तीला ट्रेनिंग साठी वेगवेगळ्या ट्रेनिंग केंद्रांवर पाठविले जाते. तिथे या उमेदवारांना ATS साठी आवश्यक असणाऱ्या ट्रेनिंग दिल्या जातात.

प्रशिक्षण कालावधी म्हणजेच ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ATS पथकात समाविष्ट केले जाते. कोणत्या राज्यामध्ये ATS पथक कार्यरत आहे? भारतात खालील काही निवडक राज्यांमध्ये सध्या ATS पथक कार्यरत आहेत. इतर राज्यांमध्ये देखील ATS सारखे पथक कार्यरत असतात मात्र त्यांना वेगळे असे नाव दिलेले नसते.

  • महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, वेस्ट बंगाल

महाराष्ट्र राज्य ATS ची कार्ये – Functions of Maharashtra State ATS Force

1990 मध्ये ATS ची स्थापना झाल्यानंतर शूटआउट एट लोखंडवाला ही घटना घडली. यामध्ये खान यांनी ATS पथकाचे नेतृत्व करत लोखंडवाला येथील स्वाती बिल्डिंग मध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही घटना 16 नोव्हेंबर 1991 रोजी घडली. या घटनेला शूटआउट एट लोखंडवाला नावाने ओळखले जाते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी घडलेल्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात ATS पथकाची भूमिका महत्वाची होती. हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मुंबई मधील कामा रुग्णालयात ऑपरेशन साठी घुसले.

दहशतवाद्यांनी आधी पासूनच इथे धुमाकूळ घातलेला होता तरी सुद्धा ATS पथकाने जीवाची बाजी लावत आत घुसण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ATS पथकातील मुख्य हेमंत करकरे, कमिशनर अशोक कामटे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांना मरण आले.

FAQ

ATS ची स्थापना कधी झाली?

ATS पथकाची स्थापना डिसेंबर 1990 मध्ये झाली.

ATS पथकाची स्थापना कुठे झाली?

मुंबई येथे सर्वात आधी म्हणजे 1990 मध्ये ATS पथकाची स्थापना झाली.

ATS ची स्थापना कोणत्या संघटनेच्या आधारावर झालेली आहे?

लॉस एंजलीस पोलीस खात्यातील स्पेशन वेपनस अँड टेक्टिकस म्हणजेच SWAT या संघटनेच्या आधारावर ATS ची स्थापना करण्यात आली आहे.

ATS चे ब्रीद वाक्य काय आहे?

ATS पथकाचे ब्रीदवाक्य हे दहशतवाद थांबवा आणि शांतता प्रस्थापित करा (Stop Terrorism and Start Peace) हे आहे.

Leave a Comment