एएनएम फुल फॉर्म ANM Full Form In Marathi

ANM Full Form in Marathi मित्रांनो आज आपण इथे जाणून घेणार आहोत ए एन एम म्हणजे काय? ए एन एम हा course कशासाठी केला जातो? या कोर्स करण्यामागे काय हेतू आहेत? हा कोर्स करून तुम्हाला नोकरी मिळेल काय? हि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

ANM Full Form In Marathi

एएनएम फुल फॉर्म ANM Full Form In Marathi

ANM Full Form in Marathi | ANM Long Form | ANM Meaning in Marathi

ANM या शब्दाचा full form हा Auxiliary Nurse Midwifery (ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी) असा आहे. ANM हे एका Medical Course म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे नाव आहे. ANM यास मराठीमध्ये सहायक परिचारिका असे म्हणतात. याबद्दल आपण पूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

ANM म्हणजे काय? | ANM Meaning in Marathi –

ANM चे पूर्ण रूप Auxiliary Nurse Midwifery आहे. हा कोर्स किंवा अभ्यासक्रम हा सहायक परिचारिका होण्यासाठी असतो म्हणजेच नर्स होण्यासाठी असतो. हा एक डिप्लोमा कोर्स आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची सेवा कशी करावी आणि रुग्णांना आवश्यक असेल अश्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात.

ANM हा पूर्ण कोर्स लोकांच्या आरोग्य सेवेच्या अभ्यासावर केंद्रित आहे. यात फक्त सेवा कशी करावी एवढेच शिकवले जात नाही तर ह्या शिक्षणासोबतच, वैद्यकीय उपकरणे आणि त्याची देखभाल कशी करावी, ऑपरेटिंग रूमची कशी करावी, रुग्णांना वेळेवर औषध कसे द्यावे आणि रेकॉर्डचा मागोवा कसा ठेवावा हे शिकण्यासही ते विद्यार्थ्यांना मदत करते. यात विद्यार्थ्यांना सलाईन लावणे, इंजेक्शन देणे या गोष्टी देखील शिकवल्या जातात.

ह्या कोर्स मधे रुग्णांची काळजी घेण्यासाठी जे काही आवश्यक बाबी आहेत ते सगळं शिकविले जाते. सहायक परिचारीका ह्या डॉक्टर सोबत काम करत असतात आणि त्या डॉक्टर्स साठी खूप उपयुक्त असतात म्हणून डॉक्टर्स ज्या प्रकारची मदत आवश्यक असते ते सर्व या कोर्स मधे शिकवले जाते.

ANM पात्रता | ANM Eligibility | ANM करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे ?

ANM हा कोर्स काही काळापासून खूप नावाजला गेला. काही वर्षांपासून त्याला खूप मागणी वाढली. याची खूप करणे असू शकतात. जसे की अताच झालेल्या कोरोना आजारामुळे वैद्यकिय क्षेत्रात कामगारांची मागणी विलक्षणरीत्या वाढली. कामगारांना भरपूर वेतनही देण्यात आले आणि जाणवले की वैद्यकिय क्षेत्रात कामगारांची किती गरज आहे.

एवढेच नाही ANM सारखे कोर्स केलेले कामगार म्हणजेच सहायक परिचारिका आणि त्यासोबतच इतर कामगार हे अत्यंत महत्वाचे मानले गेले. मागच्या काही काळात परिचारिका ह्या अत्यंत आवश्यक घटक बनला गेल्या. वेगवेगळ्या प्रकारे सर्व देशांनी त्यांचे त्यांच्या सेवेसाठी धन्यवाद मानले गेले. आपला जीव धोक्यात टाकून काम गेले म्हणुन या कोर्स आताच्या काळात खूप. प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

ANM हा कोर्स सर्व भारतात उपलब्ध आहे. हा भारतातील खूप साऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवला जातो. हा कोर्स किती कालावधीचा आहे हे निश्चित नाही. ह्या अभ्यासक्रमाचा कालावधी हा वेगवेगळया भारतीय संस्थांमध्ये बदललेला असू शकतो.

ANM हे सहसा एक ते तीन वर्षांपर्यंत असू शकते. कालावधी हा प्रतेक कॉलेज मध्ये वेगळा असू शकतो पण 1-3 वर्षे यातच असतो. काही संस्थांमध्ये, हा अभ्यासक्रम अर्धवेळ आधारावर देखील दिला जाऊ शकतो. हा कोर्स इंग्रजी तसेच राज्यभाषा अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.

कोर्स करण्यासाठी पात्रता समजून घेणे महत्वाचे आहे. कोर्स करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी किमान पात्रता निकष खाली नमूद केले आहेत :

  • ANM अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पार्श्वभूमी आवश्यक आहे. म्हणजेच तुमचे किमान शिक्षण आवश्यक आहे. या कोर्स साठी किमान शिक्षण हे 12 वी आहे किंवा 12 वी समान शिक्षण आवश्यक आहे. तसेच शिक्षण मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ANM प्रवेश प्रक्रिया | ANM Admission Process –

आता आपण प्रवेश प्रक्रिया जाणून घेऊया. ANM हे भारतातील अनेक वैद्यकिय कॉलेज मध्ये उपलब्ध आहे. अनेक ANM नर्सिंग कॉलेजेस विद्यार्थ्यांना प्रथम एक प्रवेश परिक्षा असते. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे महत्वाचे असते आणि काहीवेळा मेरिट वर प्रवेश दिला जातो म्हणजेच परीक्षेतील गुणांनुसार ज्यात विशिष्ट गुणांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.

काही ठिकाणी पात्रता ठरवण्यासाठी प्रवेश परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत फेरी देखील असू शकते. यात कोर्ससाठी सामान्य योग्यतेचे मूल्यांकन केले जाते. या दोन्ही फेऱ्यातून उमेदवारांची निवड केली जाते. ANM मध्ये अंतिम प्रवेश पूर्णपणे उमेदवाराच्या प्रवेश परीक्षेतील गुणांवर आणि PI म्हणजेच Personal Interview म्हणजेच वैयक्तीक मुलाखत यावर अवलंबून असतो.

काही विद्यापीठांमध्ये 12 वी क्या टक्केवारी वर आधारित प्रवेश दिला जातो. कुठल्याही प्रकारची प्रवेश परिक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही. सर्व विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया भिन्न आहेत. म्हणजेच प्रतेक विद्यापीठात वेगवेगळ्या निकषांवर प्रवेश दिला जातो.

ANM नंतर काय? | ANM केल्यावर कुठे नोकरी मिळू शकते? | Job After ANM –

ANM हे अलीकडील सर्वात प्रसिद्ध असा कोर्स आहे. खूप लोक या कोर्स साठी प्राधान्य देताना दिसत आहे. खरंतर हा कोर्स उत्र्कृष्ट कोर्स पैकी एक आहे. ANM शिक्षणानंतर तुम्हाला एक चांगली नोकरी करता येते आणि नकळत तुमच्याकडून मानवता धर्म पाळला जातो. यातून तुम्हाला लोकांची सेवा करता येते आणि तुमच्या हातून कितीतरी मोठे काम होत असते. सेवाभाव करून तुम्ही एक उत्कृष्ट असे जीवन घडवू शकता. तसेच हा एक असा कोर्स आहे ज्यात तुम्हाला नोकरी मिळण्याची 100% खात्री असते.

ANM पदवीधरांचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे अर्भक, महिला आणि वृद्धांवर उपचार आणि काळजी घेणे. कोर्सचा उद्देश रुग्णांना, कुटुंबांना आणि समुदायांना वैद्यकीय सेवा प्रदान करणे आहे जेणेकरून ते आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता मिळवू शकतील, देखरेख करू शकतील किंवा पुनर्प्राप्त करू शकतील.

तुम्ही होम नर्स बनू शकता. तसेच ग्रामीण आणि मूलभूत आणि सामुदायिक आरोग्य कर्मचारी बनू शकता.

हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कर्मचारी आणि आयसीयू परिचारिका काम करू शकता. तसेच होमकेअर आणि आरोग्य सेवा परिचारिका देखील बनू शकता. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय मधे देखील काम करण्याची संधी आहे. तसेच नर्सिंग होम वैद्यकीय प्रयोगशाळा आणि सेल्फ क्लिनिक इ. ठिकाणी काम करू शकता.
तुम्ही पुढे जाऊन यानंतरच्या पुढची पदवी देखील प्राप्त करू शकता जसे की GNM किंवा BSc Nursing. यातून तुम्हाला वैद्यकिय अधिकारी होण्याची संधी आहे.

अशा प्रकारे आपण ANM विषयी सर्व माहिती जाणून घेतली.

FAQs – Frequently Asked Questions

ANM किंवा GNM म्हणजे काय?

ANM कोर्स हा व्यावहारिकदृष्ट्या एक डिप्लोमा प्रोग्राम आहे जो नॉन-सायन्स विद्यार्थ्यांना नर्स प्रॅक्टिशनरमध्ये करिअर करू देतो. तथापि, विज्ञान पार्श्वभूमी असलेल्या किंवा 2 वर्षांचा ANM अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी GNM अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

ANM GNM पेक्षा चांगला आहे का?

ANM आणि GNM प्रोग्रामचे पदवीधर सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र आहेत. GNM कार्यक्रम ANM कार्यक्रमापेक्षा लांब असल्यामुळे, तो भरपाई आणि वाढीच्या दृष्टीने अधिक संधी देतो. एएनएम डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर उमेदवार GNM देखील करू शकतो.

Leave a Comment