AM And PM Full Form In Marathi पूर्वी लोकांकडे घड्याळ उपलब्ध न्हवते ,तेव्हा पूर्वीची माणसे सूर्याच्या दिशेवरून किती वाजले ? याचा अंदाज लावत होती. जेव्हापासून घड्याळाची निर्मिती झाली ,तेव्हापासून लोक घड्याळात बघून वेळ किती झाली आहे हे पाहतात. आजकाल आपण घड्याळामध्ये वेळ पाहतो ,तसेच आपण मोबाईल मध्ये वेळ पाहतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये वेळ पाहतो ,तेव्हा वेळेच्या पुढे ए.एम किंवा पी.एम असे लिहिलेले असते.

ए.एम आणि पी.एम फुल फॉर्म AM And PM Full Form In Marathi
तुम्हाला ए.एम आणि पी.एम चा फुल्ल फॉर्म माहीत आहे का ? तुम्हाला ए.एम आणि पी.एम चा फुल्ल फॉर्म माहीत नसेल तर ,आजच्या लेखामध्ये आपण ए.एम आणि पी.एम चा फुल्ल फॉर्म विषयी आणि ए.एम आणि पी.एम विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ए.एम आणि पी.एम च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि ए.एम आणि पी.एम विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
ए.एम आणि पी.एम फुल्ल फॉर्म (AM and PM full form)
ए.एम चा फुल्ल फॉर्म “अँटी मेरिडियन” असा होतो ,तर पी.एम चा फुल्ल फॉर्म “पोस्ट मेरिडियन” असा होतो. “अँटी मेरिडियन” आणि “पोस्ट मेरिडियन” हे लॅटिन भाषेतील शब्द आहेत. ए.एम आणि पी.एम हे लॅटिन भाषेतील शब्द असू देखील या शब्दांचा वापर संपूर्ण जगामध्ये केला जातो. ज्या देशामध्ये इंग्रजी प्रमुख भाषा आहे ,त्या देशांमध्ये देखील भरपूर लॅटिन शब्दांचा वापर केला जातो. या लॅटिन शब्दामध्ये “अँटी मेरिडियन” आणि “पोस्ट मेरिडियन” या लॅटिन शब्दाचा देखील समावेश आहे.
आपण जेव्हा मोबाईल मध्ये घड्याळाचे सेटिंग लावतो ,तेव्हा आपण ए.एम आणि पी.एम हे शब्द पाहतो. रात्रीच्या १२ पासून दुपारच्या १२ वाजेपर्यंत येणाऱ्या वेळेला “अँटी मेरिडियन” म्हणजे ए.एम असे म्हणले जाते. तर दुपारच्या १२ पासून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत येणाऱ्या वेळेला “पोस्ट मेरिडियन” म्हणजे पी.एम असे म्हणले जाते.
एक संपूर्ण दिवस हा २४ तासाचा असतो. ए.एम आणि पी.एम फॉरमॅट मध्ये १२ तास असतात. ज्यामध्ये समजा सकाळचे ७ वाजले असतील तर ,त्याला ७ ए.एम असे म्हणले जाते आणि संध्याकाळचे ७ वाजले असतील तर ,त्याला ७ पी.एम असे म्हणले जाते. दुपारच्या १२ वाजण्याच्या आधीच्या वेळेला ए.एम असे संबोधले जाते ,तर दुपारी १२ नंतरच्या वेळेला पी.एम असे संबोधले जाते.
FAQ
ए.एम चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
ए.एम चा फुल्ल फॉर्म “अँटी मेरिडियन” असा होतो.
पी.एम चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
पी.एम चा फुल्ल फॉर्म “पोस्ट मेरिडियन” असा होतो.
अँटी मेरिडियन आणि पोस्ट मेरिडियन हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
अँटी मेरिडियन आणि पोस्ट मेरिडियन हे लॅटिन भाषेतील शब्द आहेत आणि या ए.एम आणि पी.एम शब्दाचा वापर बऱ्यापैकी सर्व देशांमध्ये केला जातो.
ए.एम शब्दाचा वापर केव्हा केला जातो ?
रात्रीच्या १२ पासून ते दुपारच्या १२ पर्यंत असणाऱ्या वेळेला ए.एम असे संबोधले जाते. समजा सकाळचे ८ वाजले असतील तर ,आपण त्याला ८ ए.एम असे म्हणतो.
ए.एम शब्दाचा वापर केव्हा केला जातो ?
रात्रीच्या १२ पासून ते दुपारच्या १२ पर्यंत असणाऱ्या वेळेला ए.एम असे संबोधले जाते. समजा सकाळचे ८ वाजले असतील तर ,आपण त्याला ८ ए.एम असे म्हणतो.
पी.एम शब्दाचा वापर केव्हा केला जातो ?
दुपारच्या १२ वाजल्या पासून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत असणाऱ्या वेळेला पी.एम असे संबोधले जाते. समजा रात्रीचे ११ वाजले असतील तर ,आपण त्याला ११ पी.एम असे म्हणतो.
ए.एम आणि पी.एम ला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणले जाते ?
संस्कृत भाषेतून खूप भाषांची निर्मिती झाली आहे. असे म्हणतात की ,“ए.एम ला संस्कृत भाषेमध्ये “आरोहनम् मार्तंडस्य” असे म्हणले जाते ,तर पी.एम ला संस्कृत भाषेमध्ये “पतनम् मार्तंडस्य” असे म्हणले जाते”. आरोहनम् मार्तंडस्य मधील आरोहनम् चा अर्थ चढणे आणि मार्तंडस्य चा अर्थ सूर्य. आरोहनम् मार्तंडस्य चा अर्थ सूर्य चढणे किंवा उगवणे. तसेच पतनम् मार्तंडस्य मधील पतनम् चा अर्थ उतरणे आणि मार्तंडस्य चा अर्थ सूर्य. पतनम् मार्तंडस्य चा अर्थ म्हणजे सूर्य उतरणे किंवा मावळणे.
ए.एम आणि पी.एम शब्दाचा वापर कोणत्या वेळ फॉरमॅट मध्ये केला जातो ?
ए.एम आणि पी. एम शब्दाचा वापर १२ तासाच्या वेळ फॉरमॅट मध्ये केला जातो ?
पी.एम चे इतर फुल्ल फॉर्म काय आहेत ?
पी.एम चा दुसरा फुल्ल फॉर्म म्हणजे “प्राईम मिनिस्टर”. प्राईम मिनिस्टर ला मराठी भाषेमध्ये “पंतप्रधान” असे म्हणले जाते.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण “अँटी मेरिडियएन” आणि “पोस्ट मेरिडियन” म्हणजे ए.एम आणि पी.एम विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण ए.एम आणि पी.एम च्या फुल्ल फॉर्म विषयी, ए.एम आणि पी.एम विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.
संदर्भ (References)
५)https://unacademy.com/content/full-forms/am-and-pm-full-form/