एम्स (ए.आई.आई.एम.एस) फुल फॉर्म AIIMS Full Form In Marathi

AIIMS Full Form In Marathi आपण जेव्हा शाळेत असतो आणि आपल्याला शाळेत जेव्हा शिक्षक विचारतात की ,“मोठे होऊन तुम्ही काय बनणार ?”. तेव्हा आपल्या वर्गातील काहीजण म्हणतात की ,“मोठे होऊन मी इंजिनियर बनणार.” , तर काहीजण म्हणतात,“मोठे होऊन मी डॉक्टर बनणार !”. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर बनण्यासाठी असणाऱ्या देशातील टॉप च्या मेडिकल कॉलेज म्हणजे एम्स (ए.आई.आई.एम.एस) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण एम्स (ए.आई.आई.एम.एस) चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एम्स (ए.आई.आई.एम.एस) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

AIIMS Full Form In Marathi

एम्स (ए.आई.आई.एम.एस) फुल फॉर्म AIIMS Full Form In Marathi

एम्स (ए.आई.आई.एम.एस) फुल्ल फॉर्म (AIIMS full form)

एम्स (ए.आई.आई.एम.एस) चा फुल्ल फॉर्म “ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स” असा होतो. तसेच एम्स ला (ए.आई.आई.एम.एस) मराठी भाषेमध्ये “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान” असे म्हणले जाते. आपल्या भारत देशामध्ये वर्तमानात २० पेक्षा जास्त एम्स ची कॉलेजेस आहेत.

एम्स (ए.आई.आई.एम.एस) ची स्थापना (Establishment of AIIMS in Marathi)

“आपल्या भारत देशामध्ये एक आधुनिक मेडिकल कॉलेज असावे” ,अशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती. आपल्या भारत देशामध्ये आधुनिक मेडिकल कॉलेज ची स्थापना व्हावी यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्ष १९५२ मध्ये प्रस्ताव मांडला होता आणि “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था” म्हणजे एम्स ची स्थापना वर्ष १९५६ मध्ये झाली होती.

आपल्या देशातील पहिले एम्स चे कॉलेज हे दिल्ली येथे बांधण्यात आले होते ; त्यानंतर इतर राज्यांमधील मोठ्या शहरांमध्ये एम्स ची कॉलेजेस बांधण्यात आली आणि वर्तमानात भारत सरकार प्रत्येक राज्यांमध्ये एक तरी एम्स चे कॉलेज असावे ,यासाठी प्रयत्न करत आहे. 

एम्स (ए.आई.आई.एम.एस) चे उद्येश्य (Objectives of AIIMS in Marathi)

एम्स च्या कॉलेज चे प्रमुख उद्देश हे की,“देशातील विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात आधुनिक शिक्षण देऊन देशामध्ये चांगले डॉक्टर्स तयार करणे”. एम्स मध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी असणाऱ्या कोर्स चे शिक्षण दिले जाते. याचसोबत एम्स च्या कॉलेज ची फी देखील इतर मेडिकल कॉलेज च्या तुलनेत कमी असते. “देशातील मध्यम वर्गातील मुलांना कमी पैश्यामध्ये चांगले शिक्षण मिळावे”, हा एम्स ची फी कमी असण्यामागचा उद्देश्य आहे.

एम्स (ए.आई.आई.एम.एस) ची फी (Fees of AIIMS in Marathi)

तुम्ही जर देशामध्ये अन्य मेडिकल कॉलेज मध्ये मेडिकल कोर्स साठी ऍडमिशन घेतले तर ,तुमची मेडिकल कोर्स ची एका वर्षाची फी ही साधारण १ लाख पेक्षा जास्त असते ; परंतु एम्स च्या कॉलेज मध्ये मेडिकल कोर्स ची फी ही खूप कमी असते. एम्स च्या कॉलेज मध्ये मेडिकल कोर्सची ५ वर्षाची फी ही ५००० रुपये ते २२,३०० रुपये च्या आसपास असते.

एम्स (ए.आई.आई.एम.एस) मध्ये ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया (Admission process of AIIMS in Marathi)

एम्स मध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला “नीट युजी” च्या परीक्षेमध्ये चांगली रँक मिळवावी लागते ,तेव्हाच आपल्याला एम्स मध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्स साठी ऍडमिशन मिळते. तसेच आपल्याला जर एम्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन चे शिक्षण घ्यायचे असेल तर ,आपल्याला एम्स द्वारे आयोजित करण्यात येणारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

एम्स (ए.आई.आई.एम.एस) मध्ये एमबीबीएस कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for taking admission for MBBS course in AIIMS in Marathi)

१) एम्स मध्ये एमबीबीएस कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी उमेदवाराचे वय हे १७ पेक्षा जास्त असले पाहिजे.

२) एम्स मध्ये एमबीबीएस कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी उमेदवाराने १२ ही विज्ञान शाखेतून पूर्ण केली असली पाहिजे. तसेच उमेदवाराला १२ वी मध्ये भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय असले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराला १२ वी मध्ये ६०% पेक्षा जास्त मार्क्स पडलेली असली पाहिजेत.

३) एम्स मध्ये एमबीबीएस कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी उमेदवाराला नीट यूजी परीक्षेमध्ये चांगली रँक मिळालेली असली पाहिजे.

FAQ

एम्स चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एम्स चा फुल्ल फॉर्म “ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स” असा आहे.

एम्स ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ?

एम्स ला मराठी भाषेमध्ये “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान” असे म्हणतात.

एम्स ची स्थापना केव्हा झाली होती ?

एम्स ची स्थापना करणे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. एम्स ची स्थापना करण्याचा प्रस्ताव १९५२ मध्ये मांडण्यात आला होता आणि एम्स ची स्थापना ही १९५६ मध्ये करण्यात आली होती.

एम्स चे पहिले कॉलेज कोठे बांधण्यात आले होते ?

एम्स चे पहिले कॉलेज हे दिल्ली येथे बांधण्यात आले होते.

वर्तमानात भारत देशामध्ये किती एम्स ची कॉलेजेस आहेत ?

वर्तमानात भारत देशामध्ये एम्स ची २० हून अधिक कॉलेजेस आहेत.

एम्स च्या कॉलेज ची फी किती असते ?

एम्स च्या कॉलेजची फी ही इतर मेडिकल कॉलेजच्या तुलनेत खूप कमी असते. एम्स च्या कॉलेजची फी ही साधारण ५००० रुपये ते २२,३०० रुपये च्या आसपास असते.

एम्स मध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ?

एम्स मध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी “नीट युजी” ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण एम्स (ए.आई.आई.एम.एस) विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एम्स (ए.आई.आई.एम.एस) चा फुल्ल फॉर्म ,एम्स (ए.आई.आई.एम.एस) ची स्थापना, एम्स (ए.आई.आई.एम.एस) चे उद्येश्य ,एम्स (ए.आई.आई.एम.एस) ची फी ,एम्स (ए.आई.आई.एम.एस) ची ऍडमिशन प्रक्रिया , एम्स (ए.आई.आई.एम.एस) मध्ये एमबीबीएस कोर्स साठी ऍडमिशन घेण्यासाठी असणारी पात्रता निकष, एम्स(ए.आई.आई.एम.एस) विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8

२)https://inhindiii.com/aiims-kya-hai/

३)https://www.extramarks.com/studymaterials/full-form/aiims-full-form/

४)https://byjus.com/full-form/aiims-full-form/

५)https://www.vedantu.com/full-form/aiims-full-form

Leave a Comment