एड्स फुल फॉर्म AIDS Full Form In Marathi

AIDS Full Form In Marathi आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एक भयंकर रोगाविषयी म्हणजे “एड्स” या रोगविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एड्स चा फुल्ल फॉर्म आणि एड्स रोगा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

AIDS Full Form In Marathi

एड्स फुल फॉर्म AIDS Full Form In Marathi

एड्स फुल्ल फॉर्म (AIDS full form)

एड्स (AIDS) चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “एक्वायर्ड इम्यूलनो डेफिसिएंशी सिंड्रोम” असा होतो. एड्स ही एचआईवी संक्रमणाची शेवटची स्टेप्स आहे. जेव्हा एचआईवी संक्रमणामुळे लोकांच्या शरीरातील रोग्रतिकारक शक्ती कमी होते ,तेव्हा त्यांना एड्स होतो.

एड्स रोग हा असुरक्षित संबंधामुळे होते ,तर काही वेळा एड्स रोग हा संक्रमित रक्तामुळे देखील होऊ शकतो. जर गरोदर आई एचआईवी पोजीटिव असेल तर त्या गरोदर आईच्या मुलाला देखील एड्स हा रोग होऊ शकतो. तसेच काहीवेळा संक्रमित सुई मुळे देखील एड्स रोग होऊ शकतो. एड्स रोगापासून वाचण्यासाठी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ,तसेच आपण नियमित व्यायाम किंवा योग केले पाहिजेत. जेणेकरून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनेल.

जागतिक एड्स दिवस (International AIDS Day)

दरवर्षी संपूर्ण जगामध्ये १ डिसेंबर दिवशी “जागतिक एड्स दिवस” साजरा केला जातो. या “जागतिक एड्स दिवशी” एड्स संबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी एड्स ला आळा घालण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून “जागतिक एड्स दिवशी” लोकांमधे एड्स रोगा संबंधी जागरूकता पसरवण्याचे काम देखील केले जाते.

एचआईवी (HIV in Marathi)

एचआईवी चा फुल्ल फॉर्म हा “ह्यूमन इम्युनो डेफिशिएंसी व्हायरस” असा होतो. एचआईवी हा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस संक्रमित शरीरातील पेशींना कमकुवत बनवतो. एचआईवी व्हायरस मुळे जेव्हा संक्रमित शरीरातील पेशी कमकुवत बनतात ,तेव्हा त्या व्यक्तीला इतर आजारांचा देखील सामना करावा लागतो.

जर आपल्या शरीरामध्ये एचआईवी व्हायरस ने प्रवेश केला आहे आणि आपण त्याचे निदान लवकर केले नाही ,तर आपल्याला एड्स हा रोग होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा एचआईवी व्हायरस ची लक्षणे आपल्या शरीरात जाणवू लागतील ,तेव्हा आपण त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

एचआईवी व्हायरस जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा ,तो केव्हाच बरा होऊ शकत नाही. म्हणजे आपण एकदा एचआईवी व्हायरस ने ग्रस्त झालो ,तर तो एचआईवी व्हायरस शेवटपर्यंत आपल्या शरीरामध्ये असतो ; परंतु काही औषधांचा मदतीने आपण आपल्या शरीरात होणारे एचआईवी व्हायरस चे संक्रमण रोखू शकतो.

पहिल्यांदा १९८१ मध्ये एचआईवी व्हायरस निदर्शनास आला होता. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन” च्या एका रिपोर्ट नुसार २०१८  वर्षाच्या शेवटी ३७.९ मिलियन पेक्षा जास्त लोक एचआईवी व्हायरस ने ग्रस्त आहेत.

एचआईवी व्हायरस खालील प्रकारे पसरू शकतो (HIV virus can spread in the following ways in Marathi)

१) असुरक्षित संबंध – जर एखादा एचआईवी पोजीटिव व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी असुरक्षित संबंध आला तर ,त्या दुसऱ्या व्यक्तीला देखील एचआईवी व्हायरस चे संक्रमण होऊ शकते.

२) रक्त संक्रमण – रक्त संक्रमणामुळे देखील एचआईवी व्हायरस एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जाऊ शकतो.

३) दूषित सुई – दूषित सुई मुळे किंवा वापरलेल्या सुई मुळे देखील एचआईवी व्हायरस एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो.

४) जर एखादी गरोदर स्त्री एचआईवी व्हायरस ने संक्रमित आहे ,तर तिच्या शरीरातील एचआईवी व्हायरस चे संक्रमण तिच्या होणाऱ्या बाळाला देखील होऊ शकते.

एचआईवी ची लक्षणे (Symptoms of HIV in Marathi)

जेव्हा एखादा व्यक्ती एचआईवी व्हायरस ने संक्रमित होते ; तेव्हा पाहिले काही दिवस त्या व्यक्तीला एचआईवी ची कोणतेही लक्षणे त्याच्या शरीरामध्ये जाणवत नाहीत. दोन तीन आठवडे निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये हळू हळू एचआईवी व्हायरस ची लक्षणे जाणवू लागतात.

एचआईवी व्हायरस ने ग्रस्त झालेल्या व्यक्तीला सुरवातीला ताप येणे,डोकेदुखी ,थकवा येणे यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. जसे जसे शरीरामध्ये एचआईवी चे संक्रमण वाढत जाते ,तसे तसे त्या व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये रात्रीचा घाम येणे ,वजन कमी होणे ,यांसारखे लक्षण जाणवू लागतात. जेव्हा एचआईवी व्हायरस चे रूपांतर एड्स मध्ये होते, तेव्हा संक्रमित व्यक्तीला नियमित खोकला येणे ,श्वास घेताना त्रास होणे , सतत अंग गरम लागणे,इत्यादी यांसारखी लक्षणे जाणवू लागतात.

एड्स वरती उपाययोजना (Measures on AIDS in Marathi)

१) ज्या व्यक्तीला एड्स रोग झाला आहे ,तो व्यक्ती संपूर्णरित्या एड्स रोगातून मुक्त होऊ शकत नाही; परंतु काही औषधांच्या मदतीने त्या एड्स रोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. या औषधांमध्ये “एंटीरिट्रोवायरल थेरेपी” या औषधाचा समावेश आहे. या औषधाच्या मदतीने एड्स रोगामुळे लवकर मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते.

२) एड्स पासून वाचण्यासाठी आपण वेळेवर औषधे घेतली पाहिजेत ,तसेच आपण नियमित व्यायाम किंवा योग केले पाहिजेत. तसेच आपण नियमित ध्यान देखील केले पाहिजे. नियमित व्यायाम केल्यामुळे ,तसेच नियमित ध्यान केल्यामुळे आपले शरीर शारीरिक रित्या व मानसिक रित्या तंदुरुस्त राहते.

३) याचसोबत आपण आपला डाएट प्लॅन अशा पद्धतीने प्लॅन केला पाहिजे ,जेणेकरून आपल्या शरिराला योग्य ते सर्व पोषक तत्वे मिळतील. आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे ,तसेच आपण नियमित विविध प्रकारची फळे खाली पाहिजेत.

४) आपण जर एड्स रोगाने ग्रस्त असू तर ,आपण नियमित व्यायाम केल्याने , तसेच निरोगी आहार ग्रहण केल्याने आपल्याला आपल्या शरीरामध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसतील.

FAQ

एड्स चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एड्स चा फुल्ल फॉर्म “एक्वायर्ड इम्यूलनो डेफिसिएंशी सिंड्रोम” असा होतो.

एड्स रोग कशामुळे होतो ?

एड्स रोग विविध कारणांमुळे होऊ शकतो. परंतु यातील प्रमुख कारणे म्हणजे एचआईवी व्हायरस ने संक्रमित असणाऱ्या गरोदर स्त्री च्या शरीरातून एचआईवी व्हायरस चे संक्रमण त्या गरोदर स्त्रीच्या लहान बाळामध्ये होऊ शकते. तसेच असुरक्षित संबंधामुळे देखील एड्स रोग होऊ शकतो. याचसोबत दूषित किंवा वापरलेली सुई आणि संक्रमित रक्तामुळे देखील एड्स रोग होऊ शकतो.

एचआईवी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एचआईवी चा फुल्ल फॉर्म हा “ह्यूमन इम्युनो डेफिशिएंसी व्हायरस” असा होतो.

जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

“जागतिक एड्स दिवस” हा दरवर्षी १ डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये एड्स रोगा संबंधी जागरूकता पसरावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

एड्स रोगावर असणाऱ्या घरगुती उपाययोजना कोणकोणत्या आहेत ?

तुम्ही जर एड्स रोगाने ग्रस्त असाल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या. याव्यतिरिक्त तुम्ही नियमित व्यायाम किंवा योग केला पाहिजे. तसेच तुम्ही नियमित मेडीटेशन केले पाहिजे. याचसोबत तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा ,फळांचा ,डाळींचा समावेश केला पाहिजे.

आजच्या लेखामध्ये आपण एड्स रोगा विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एड्स चा फुल्ल फॉर्म ,जागतिक एड्स दिवस ,एचआईवी , एचआईवी ची लक्षणे ,एड्स वरती उपाय ,एड्स विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment